News

भीमा कृषी प्रदर्शन (Bhima Agriculture Exhibition) गुरुवारी 26 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे यावर्षी काय आकर्षण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेरी वेदर मैदानावर हे प्रदर्शन भरणार आहे.

Updated on 23 January, 2023 10:54 AM IST

भीमा कृषी प्रदर्शन (Bhima Agriculture Exhibition) गुरुवारी 26 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे यावर्षी काय आकर्षण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेरी वेदर मैदानावर हे प्रदर्शन भरणार आहे.

हे प्रदर्शन रविवारी 29 जानेवारीपर्यंत सुरू असणार आहे. या प्रदर्शनात आधुनिक शेती, पशुपालन, कृषी उत्पादने यांची विविध दालने असतील, तसेच सेंद्रिय शेती, गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, मत्स्यपालन याचे प्रात्यक्षिक बघायला मिळणार आहेत.

तसेच प्रदर्शनामध्ये 250 जनावरे असतील. यामध्ये तब्बल 12 कोटी किंमतीचा जगातील सर्वांत उंच बादशाह रेडा आणि प्रतिलिटर 31 लिटर दूध देणारी बिजली म्हैस हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

यावेळी महाडिक म्हणाले की, कोरोनामुळे दोन वर्षे हे भीमा कृषी प्रदर्शन घेता आले नाही. मात्र, यंदा शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा ही पर्वणी उपलब्ध झाली आहे. प्रदर्शनात ड्रोन टेक्नॉलॉजीची माहिती देणारे दालन आहे.

शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा मिळाच पाहिजे, शेतकरी संघटना आक्रमक..

प्रदर्शनात तृणधान्याचे प्रकार, उत्पादने, खाद्यपदार्थ यांची माहिती देणारे स्वतंत्र दालन येथे असणार आहे. म्हशी, रेडे, गायी, बैल, शेळ्या, कोंबड्या, परदेशी पक्षी प्रदर्शनात असतील. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
हुरडा पार्ट्यांचा फक्कड बेत, गावाकडे अनेकांनी थाटली दुकाने, मिळतात चांगले पैसे..
शेतकऱ्यांनो शेती सोबत एक पोल्ट्री टाकाच, रोज एक कोटी अंड्यांचा आहे तुटवडा..
काय ते कृषी प्रदर्शन, काय ते सगळं नियोजन, काय ते राजेंद्रदादांच कृषी विषयाच ज्ञान, सगळं काही ओकेच..!!

English Summary: 12 crores buffalo 31 liters milk!! attention turned Bhima Agriculture Exhibition
Published on: 23 January 2023, 10:54 IST