Market Price

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाला कवडीमोल मिळत असलेल्या दरामुळे आर्थिक फटका बसत आहे. राज्यातील अनेक शेतकरी बांधव सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून आहे.

Updated on 08 September, 2022 10:36 AM IST

सोयाबीन (soyabean) उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाला कवडीमोल मिळत असलेल्या दरामुळे आर्थिक फटका बसत आहे. राज्यातील अनेक शेतकरी बांधव सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) होणाऱ्या घसरणीमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आपण पाहिले तर गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.

दररोजच्या प्रमाणेच सोयाबीन बाजारात आजदेखील साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासचं सोयाबीन विकला जात आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भविष्यात सोयाबीनचे दर कसे मिळतील याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Ganesh Visarjan 2022: लाडक्या बाप्पाचे विसर्जन करताना 'हे' 12 नियम लक्षात ठेवा

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) 5255 रुपये प्रति क्विंटल कमाल बाजार भाव तर 4750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5075 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती

सोयाबीनला पाच हजार 135 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव तर 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4917 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.

केंद्र सरकारने सादर केला अहवाल; नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात चांगली वाढ

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती

सोयाबीनला 5464 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव तर 5150 रुपये प्रति क्विंटल (per quintal) एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

5225 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन मिळाला आहे. तसेच 5190 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या 
सरकारच्या 'या' योजनेत फक्त 240 रुपये गुंतवा; मिळणार 50 लाखांचा नफा
'या' दोन राशीच्या लोकांना मिळणार करियरमध्ये संधी, पैसाही मिळणार चांगला
शेतकऱ्यांनो शेतीच्या बांधावर निवडुंगाची लागवड करून मिळवा लाखों रुपयांचा नफा

English Summary: Soybeans fetching bargain prices sold price
Published on: 08 September 2022, 10:21 IST