Market Price

सध्या पालेभाज्यांना चांगला दर मिळत असताना पाहायला मिळत आहे. आपण पाहिले तर यामध्ये कोथिंबीर, मेथी आणि पालक या पालेभाज्यांना चांगला दर मिळत आहे.

Updated on 16 September, 2022 10:47 AM IST

सध्या पालेभाज्यांना चांगला दर मिळत असताना पाहायला मिळत आहे. आपण पाहिले तर यामध्ये कोथिंबीर, मेथी आणि पालक या पालेभाज्यांना चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

कोथिंबीरीला आज किमान 800 तर कमाल भाव दोन हजार रुपये मिळाला. मेथीला किमान भाव (Minimum price fenugreek) 800 तर कमान भाव अठराशे रुपये मिळाला. तसेच पालक ला किमान भाव 600 तर कमाल भाव दोन हजार रुपये इतका मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे गवारीला पुन्हा एकदा चांगला कमाल भाव मिळत आहे.

महत्वाचे! PM आवास योजनेअंतर्गत घर मिळाले नसेल तर 'या' नंबरवर करा कॉल

गवारीला किमान भाव 3 हजार आणि कमाल भाव 6 हजार रुपये मिळाला. मटारला किमान 4 हजार आणि कमाल 8 हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. तर घेवड्याला किमान 2 हजार आणि कमाल 5 हजार रुपयांचा दर मिळाला आहे.

कांदा उत्पादक शेतकरी संकटात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला 'हा' निर्णय

हिरवी मिरचीला किमान 3 हजार आणि कमाल 3 हजार रुपयांचा भाव आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (Pune Agricultural Produce Market Committee) इथे मिळाला आहे. तर शेवग्याला देखील चांगला भाव मिळतोय शेवग्याची आज 62 क्विंटल इतकी आवक झाली असून याकरिता किमान भाव 5 हजार रुपये आणि कमाल भाव हा 16 हजार रुपये मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या 
'या' सरकारी योजनेतुन वृद्धांना दरमहा 9 हजार रुपयांपर्यंत मिळते पेन्शन; असा करा अर्ज
सावधान! आज आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
शेतकऱ्यांसाठी किसान विकास पत्र योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; गुंतवणूकदारांचे पैसे होतात दुप्पट

English Summary: shevga price 16 thousand rupees market price leafy vegetables
Published on: 16 September 2022, 10:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)