Market Price

गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सतत घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना काळजी लागली आहे. महिन्याभरापूर्वी 7 हजार रुपये प्रति क्‍विंटलच्या घरात असणारा सोयाबीन आता चक्क 3 हजार रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपला आहे.

Updated on 10 September, 2022 12:16 PM IST


गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सतत घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना काळजी लागली आहे. महिन्याभरापूर्वी 7 हजार रुपये प्रति क्‍विंटलच्या घरात असणारा सोयाबीन आता चक्क 3 हजार रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपला आहे.

आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 3 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव (Soybean Bajarbhav) मिळाला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती

कारंजा एपीएमसीमध्ये आज एकूण 800 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज कारंजा एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 5 हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 4 हजार 695 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच साध्या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5 हजार 45 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

तुळजापूर एपीएमसीमध्ये आज 85 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज तुळजापूर एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या
एलआयसीच्या 'या' योजनेत फक्त 122 रुपये गुंतवा आणि मिळवा 26 लाख रुपयांचा परतावा
महाराष्ट्रात 'यलो अलर्ट' जारी; नागरिकांना सतर्क राहण्याचा हवामान विभागाकडून इशारा
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे नवीन दर

English Summary: Big fall soybean prices Soybean fetching price
Published on: 10 September 2022, 12:08 IST