Horticulture

हवामान बदलाचा परिणाम हा फळपिकांवर सुद्धा होत आहे त्यामुळे फळपिकांचा ही विमा उतरन्यावर शेतकऱ्यांनी या वर्षी भर दिला आहे. राज्यात फळपिकांच्या आंबिया बहारासाठी फळ पिक विमा योजनेतील नोंदणी अर्जलासुरुवात झाली आहे.

Updated on 30 October, 2021 2:53 PM IST

हवामान बदलाचा परिणाम हा फळपिकांवर सुद्धा होत आहे त्यामुळे फळपिकांचा ही विमा उतरन्यावर शेतकऱ्यांनी या वर्षी भर दिला आहे. राज्यात फळपिकांच्या आंबिया बहारासाठी फळ पिक विमा योजनेतील नोंदणी अर्जलासुरुवात झाली आहे.

या फळ पीक विमा योजनेअंतर्गत डाळिंब, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा,पपई व स्ट्रॉबेरी या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या लेखात आपण आंब्या बहारा साठी असलेल्या फळ पिक विमा बद्दल माहिती घेऊ.

आंबियाबहारासाठीसाठी फळपिक विमा योजना

 आंबिया बहर हा नोव्हेंबर डिसेंबर किंवा डिसेंबर ते जानेवारी मध्ये घेतले जाणारे फळ पीक आहे. ज्या वेळी आंब्याला बहर येतो त्या दरम्यान हे फळ पीक बहरात येते.

या फळ पीक विमा साठी लागणारी कागदपत्रे

  • यामध्ये बिगर कर्जदारांना सहभाग घ्यायचा असल्यास आधार ओळखपत्र
  • सातबारा उतारा
  • 8अ चा उतारा
  • पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र
  • फळबागेचा टॅगिंग चिन्हांकित केलेले छायाचित्र
  • बँकेचे खाते पुस्तक
  • तुम्ही या फळ पीक विम्याचा अर्ज गावातील सीएससी सेंटर वर भरू शकता.
  • कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी देखील ही योजना ऐच्छिक आहे.

 

या योजनेत कसा घ्याल सहभाग?

शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या साईटचा उपयोग होणार आहे. केंद्र सरकारने hhhps://pmfby.gov.in या साइटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तर राज्य सरकारने https://www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर पीक विमा कंपन्या, जिल्हे आणि विमा प्रतिनिधी यांचे नावे दिलेली आहेत.

English Summary: you can take advantage of fruit insurence to aanbiya spring
Published on: 30 October 2021, 02:53 IST