Horticulture

सध्याच्या काळात बरेच शेतकरी आपल्या शेतात निर्यातक्षम आणि दर्जेदार फळे, भाजीपाला पिकवून त्याची निर्यात करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. कारण एका चांगल्या उत्पन्नासाठी निर्यातहाचांगला पर्याय आहे. कारण आपण पिकवलेल्या मालाची बऱ्याच दरस्थानिक मार्केटमध्ये म्हणावे तसे दर न मिळाल्याने बऱ्याच प्रकारचे आर्थिक नुकसान होते.

Updated on 01 December, 2021 9:49 PM IST

सध्याच्या काळात बरेच शेतकरी आपल्या शेतात निर्यातक्षम आणि दर्जेदार फळे,  भाजीपाला पिकवून त्याची निर्यात करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. कारण एका चांगल्या उत्पन्नासाठी निर्यातहाचांगला पर्याय आहे. कारण आपण पिकवलेल्या मालाची बऱ्याच दरस्थानिक मार्केटमध्ये म्हणावे तसे दर न मिळाल्याने बऱ्याच प्रकारचे आर्थिक नुकसान होते.

परंतु यामध्ये जरा पिकवलेल्या माल दर्जेदारआणि  निर्यातक्षम असेल तर मालाची निर्यात करून आपणही चांगला आर्थिक नफा मिळवू शकतो. या लेखात आपण डाळिंबाची निर्यात करण्याची प्रक्रिया कशी आहे? याबद्दल माहिती घेऊ.

 अशा पद्धतीने करतात निर्यातक्षम डाळिंब बागांची नोंदणी

 डाळिंब निर्यात करु इच्छिणार्‍या बागायतदारांनी त्यांच्या डाळिंब बागेची नोंदणीही कृषी विभागाकडे अनार नेट द्वारे करणे आवश्यक आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना ताजी फळे व भाजीपाला निर्यात करू इच्छिणार्‍या बागायतदारांना त्यांच्या बागांची,शेताची नोंदणी आणि नूतनीकरण,हॉर्टीनेट ट्रेसेबिलिटी प्रणाली मध्ये नोंदणी करण्याकरीता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नोंदणी अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागणार आहे.या प्रक्रियेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी म्हणून दूरदर्शन, आकाशवाणी तसेच स्थानिक वर्तमानपत्रांमधून प्रसिद्धी देण्यात येत आहे.यासाठी कृषी विभागाकडे निर्यात करण्याच्या अर्जासोबत संबंधित बागेचा स्थळदर्शक नकाशा व गाव नमुना नंबर सातबारा उताऱ्याची  प्रत जोडणे आवश्यक आहे तसेचएका हेक्टरवरील डाळिंबासाठी नोंदणीची पन्नास रुपये आकारले जाते.

 आवश्यक कागदपत्रे

  • विहित प्रपत्रात अर्ज
  • सातबारा उतारा
  • बागेचा स्थळदर्शक नकाशा
  • तपासणी अहवाल प्रपत्र (4 अ)
  • एका हेक्‍टरवरील क्षेत्राकरिता शेतकऱ्यांना पन्नास रुपये मोजावे लागतील

 मंजुरीची प्रक्रिया

 सगळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हा अर्ज मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागतो

.त्यानंतर मंडळ कृषी अधिकाऱ्यांमार्फत बागेची प्रत्यक्ष तपासणी करून प्रपत्र(4 अ) मध्ये तपासणी अहवाल तयार  करून संबंधित शेतकऱ्यांचा प्रस्ताव नोंदणीकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठवल्या नंतर अनारनेट ऑनलाईन नोंदणी करण्यात येते. संबंधित शेतकऱ्यांना एक वर्षाकरिता युरोपियन देशांना डाळिंब कोड,तालुका कोड,,गाव कोड, फार्म व प्लॉट कोड नंबर संगणकाद्वारे देण्यात येतो.त्या नंबर नुसार पुढील सर्व कार्यवाही ऑनलाइन द्वारे करण्यात येते.

 (संदर्भ- हॅलो कृषी)

English Summary: you can pomegranet export pls this process follow and export your export
Published on: 01 December 2021, 09:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)