आजच्या युगात आपण अनेक ठिकाणी ऐकले आहे की तरुण पिढी नोकरी सोडून शेती करत आहे, सुरुवातीला थोडी अडचण येतेय पण हळू हळू मार्गदर्शन घेऊन अनेक प्रकारची शेती ते करतात तसेच त्यामधून उत्पादन सुद्धा भेटत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्धल सांगणार आहोत ज्या व्यक्तीने नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज ते वार्षिक उत्पन्न ५० लाख एवढे घेत आहे.
एकाच झाडाला वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची कलम केली:
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंतराळ या गावातील काकासाहेब सावंत असे या शेतकर्याचे नाव आहे, त्यांनी एकाच आंब्याच्या झाडावर २२ प्रकारच्या जातीच्या आंब्याचे(mango) उत्पन्न घेतले आहे. काकासाहेब यांनी एकाच झाडाला ४४ प्रकारच्या जातीची कलम केली आहेत, या ४४ पैकी २२ कलमे या झाडाला लागून यावेळी एकाच झाडाच्या आंब्याला २२ प्रकारची आंब्याची फळे लागली आहेत. हे एक नवलच आहे.
हेही वाचा:पपई पिकावरील रिंग स्पॉट व्हायरस किंवा पपया मोझॅक रोगाचं कसं कराल व्यवस्थापन
चला मग पाहू नक्की कोणत्या कोणत्या जातीची फळे लागली आहेत:
केशर, हापूस, सिंधू, रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिश, पायरी, बारोमाशी,वनराज, मलगोबा,मालिक्का, तोतापुरी इ. प्रकारच्या जातींची फळे लागली आहेत.या जातीतील काही आंब्यांचा तोडा झाला आहे, या २२ जातीची सर्व मिळून कमीतकमी ७०० आंबे लागले आहेत. त्यामधील काही जातींची ४-५ डझन फळे लागली आहेत तर काही जातींची २-३ डझन फळे लागली आहेत. या मधून काकासाहेबांना चांगलेच उत्पन्न भेटले आहे.
जाणून घेऊया काकासाहेब सावंत यांच्या प्रवास:
काकासाहेब जत तालुक्यातील असून त्यांनी नोकरी सोडून शेती करण्यास प्राधान्य दिले, त्यांनी थोड्याच दिवसात शासनमान्य बनशंकरी या नावाने नर्सरी उभा केली. जत तालुक्यात जास्त पाणी नसल्यामुळे येथील प्रत्येक शेतकऱ्यांची शेती निसर्गावर अवलंबून आहे तरीही काकासाहेबांनी धाडस करून नर्सरी चालू केली. काकासाहेबांनी नर्सरी मधून वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपये काढले आहे.
Published on: 14 June 2021, 10:47 IST