निसर्गाच्या अनियमितपणामुळे जसे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे सध्याच्या वातावरणामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून कडाकड्याची थंडी वाढत असल्याने द्राक्षांच्या मन्यात फुगवण झाली आहे तसेच त्यामध्ये साखर सुद्धा उतरत नाही. या ढगाळ तसेच अवकाळी पाऊसामुळे मण्यांचे तडे जात आहेत आणि याच परिणाम द्राक्षच्या उत्पादनावर होत आहे. एका बाजूला हे तर दुसऱ्या बाजूला खानदेशात वाहत्या वाऱ्यामुळे केळीची पाने फाटत आहेत आणि याच परिणाम केळी च्या उत्पादनावर होत आहे. अजून पुढचे तीन दिवस अशीच थंडी राहील असे हवामान खात्याने मत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजूनच वाढ झालेली आहे त्यामुळे आता कोणत्याही प्रकारे पिकाचे सरंक्षण केल्याशिवाय पर्याय च शेतकऱ्यांकडे राहिला नाही.
वातावरणातील बदलाने द्राक्ष मण्यांना तडे :-
द्राक्षांच्या मन्यांवर जो परिणाम होत आहे तो फक्त थंडीमुळे च नाही तर सकाळी पडत असलेले धुके असो आणि दुपारी द्राक्षाला चटके देणारे ऊन यामुळे द्राक्षेच्या मन्यांवर बर्निंग आणि उकड्याचा प्रादुर्भाव होत आहे. या कारणास्तव द्राक्षांच्या मन्यांना तडे जात आहेत तसेच साखरेचे प्रमाणही कमी उतरत आहे. सध्याच्या वातावरणाचा परिणाम द्राक्षाच्या मण्यांच्या फुगवट्यावर होत असून योग्य तो पाणीपुरवठा करून बागांच्या पेशी कार्यन्वित ठेवणे गरजेचे आहे नाहीतर तडे गेल्यावर त्याचा परिणाम थेट दरावर सुद्धा होणार आहे.
पपई, केळी फळावर पॉलिथिन चे आवरण गरजेचे :-
मागील चार दिवसांपासून सातपुडा डोंगराळ भागात कडाक्याची थंडी पडली असल्याने त्याचा परिणाम तेथील शेतकऱ्यांच्या जीवनावर होत आहे. त्या भागात ८ अंश तापमान असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पपई आणि केळीच्या बागा सध्याच्या स्थितीला अंतिम टप्यात आहेत मात्र या बदलत्या हवामानामुळे तसेच वाऱ्यामुळे केळीची पाने फाटत आहेत त्यामुळे बागा न बागा उध्वस्त आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पॉलिथिनचे आवरण घालून पिकांचे सरंक्षण करावे म्हणजे पिकांच्या उत्पादनात घट होणार नाही असा सल्ला कृषितज्ञ प्रा डॉ.पद्माकर कुंदे यांनी दिला आहे.
पॉलिथिनच्या आवरणामुळे होणार सरंक्षण :-
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे तसेच अचानक होत असलेल्या अवकाळी पाऊसामुळे फळबागांचे नुकसान होत आहे तर वाऱ्यामुळे केळीचे पाने फुटत आहेत त्यामुळे केळीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. जर शेतकऱ्यांनी या बागांना पॉलिथिन चे आवरण घातले तर त्याचे सरंक्षण होईल असे कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. त्यामुळे आता शेतकरी सध्या या घाई गडबडीत असताना दिसत आहे.
Published on: 27 January 2022, 05:01 IST