Horticulture

आपण नेहमी च "फळमाशी" हे नाव ऐकत असतो, पण ८० टक्के शेतकरी बंधूंना हा काय प्रकार आहे हे च माहीत नसते. तर आज आपण याबद्दल च माहिती देणार आहोत.

Updated on 12 October, 2021 6:00 PM IST

"फळमाशी..! वेलवर्गीय पीक असो वा फळवर्गीय पीक, सर्वामध्ये च एक प्रामुख्याने आढळणारी किड म्हणजे च फळमाशी चा प्रादुर्भाव. तर फळमाशी तयार कशी होते इथून आपण सुरवात करू.

फळमाशी जीवनक्रम (लाईफ सायकल)

            प्रामुख्याने   फळमाशी चे नर आणि मादी चे मिलन होते व त्यानंतर मादी जाऊन आपल्या फुलोऱ्यामध्ये आलेल्या पिकामध्ये आढळून येते. एकदम कळीतून बाहेर आलेल्या छोट्या अशा फळावर फळमाशी ची मादी डंख मारते आणि आतमध्ये अंडी घालते. एक दोन दिवसात म्हणजे च अंडी चा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यामधून अळी बाहेर येते व फळाच्या आतमध्ये च वाढ चालू होते.

जसे जसे फळ मोठे होईल तसतसे आतमध्ये अळी पण मोठी होत जाते (अर्थात च फळ आतून खायला सूरवात करते). व अळी चा कालावधी संपल्यानंतर अळी फळातून बाहेर जमिनीत पडते व कोषावस्थे मध्ये जाते ज्यातून पुन्हा नवीन प्रौढ फळमाशी तयार होते.

                   आता आपण पाहू फळमाशी पिकावर हल्ला कशा प्रकारे करते. तर वर आपण जाणून घेतले च आहे फळमाशी लहान फळात डंख मारून आत अंडी घालते वर अळी तयार होते तर ती च अळी आतमध्ये फळ खराब करत असते जे आपल्याला फळ मोठे झाल्यावर च दिसून येते. आता बऱ्याच जणांमध्ये गैरसमज असतो की फळ मोठे झाल्यावर अळी दिसते किंवा फळ खराब दिसते म्हणजे च आता च फळमाशी चा प्रादुर्भाव आहे पण मुळात फळ लहान असताना च केलेल्या हल्ल्याचा परिणाम आपल्याला नंतर दिसत असतो हे त्यामागील सत्य आहे.

फळमाशी नियंत्रण :

                 "फळमाशी सापळा" हा एक प्रकार आपण ऐकला असेल च, तर हा कामगंध सापळा आपण आपल्या पिकामध्ये एका एकर मध्ये "15 ते 20" लाऊन घ्यावे ज्याचा परिणाम सर्व फळमाशी चे नर त्यामध्ये पकडले जातात व मादीसोबत मिलन करू शकत नाहीत ज्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम आपल्या पिकाची फळमाशी पासून सुटका होते.

टीप : कोणाला फळमाशी विषयी अजून काही शंका असतील तर जरूर विचाराव्या..

श्री. ओंकार विलास पाटील

  ग्रीन रेव्होल्युशन"

    7020206602

 

 

English Summary: What does the fruitfly do
Published on: 12 October 2021, 06:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)