Horticulture

कलिंगड हे फळ कुकुरबिटासी कुटुंबातील आहे. या फळाचा रंग विविध जातींमध्ये वेगवेगळा असतो. तो कॅरोटेनोईडच्या प्रमाणावर अवलंबून असतो. कलिंगडाच्या गराचा रंग पांढरा, नारंगी, तांबूस पिवळट, फिकट गुलाबी, कॅनरी पिवळा आणि लाल असतो.

Updated on 26 September, 2020 6:59 PM IST


कलिंगड हे फळ कुकुरबिटासी कुटुंबातील आहे. या फळाचा रंग विविध जातींमध्ये वेगवेगळा असतो. तो कॅरोटेनोईडच्या प्रमाणावर अवलंबून असतो.  कलिंगडाच्या गराचा रंग पांढरा, नारंगी, तांबूस पिवळट, फिकट गुलाबी, कॅनरी पिवळा आणि लाल असतो. लायकोपीन हेलाल गराच्या कलिंगडाचे प्रमुख रंगद्रव्य आहे. कलिंगड सामान्यतः रिफ्रेश करणारे फळ मानले जाते तसेच मिष्ठान्न फळ, कोशिंबीर, न्याहारी म्हणून किंवा स्नॅक म्हणून नियमित सेवन केले जाते. ताज्या कलिंगडाचे पीएच मूल्य

५.२ ते ५५६ असते. कलिंगडामध्ये साखर असते जी त्याच्या गोडपणा कारणीभूत असतो.  ( ०.६ ग्राम ग्लुकोज आणि २.८  ग्रॅम्स सुक्रोज प्रति १०० ग्रॅम फळ) कलिंगडात विपुल प्रमाणात पोषक घटक असतात.  जे बिया, गरवरील घटक जाड आवरणात आढळतात.

     कलिंगडाची कापणीनंतर घ्यावयाची काळजी

  • लागवडीच्या अवस्थेपासून बाजारपेठेची परिपक्वता गाठण्यासाठी कलिंगडाला अनुक्रमे ६५,७५ आणि ९५ दिवस लागतात. तर कलिंगड कापणीचा परिपक्वता निर्देशांक हा गराचा रंग ( ७५% लाल) आणि एकूण विद्राव्य घटक १०% यावर अवलंबून असतो. अनेक शेतकरी कलिंगडाचे उत्पादन घेत असतात, परंतु काढणी केल्यानंतर काय काळजी घ्यावी याची माहिती नसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत असते.
  • काढणी पश्‍चात हाताळणीच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात कलिंगड खराब होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. कलिंगडाच्या रसाची बिघाड हा कॅण्डिडा सुडोट्रोपिलिसिस, कॅण्डिडा ट्रॉपिकलीस, स्याचरोम्यसेस सेरेवासीया प्रजाती आणिसॅप्रोफिटीकस सूक्ष्मजीवांमुळे होते. कलिंगड हे फळ शित कक्षात १० ते १५ डिग्री सेल्सिअस तापमान व सापेक्ष आर्द्रता ९० टक्केपर्यंत ठेवून १४  ते २१ दिवस जतन केले जाऊ शकते.
  • कलिंगड धुणे आवश्यक नसते, परंतु जेव्हा जास्त प्रमाणात माती लागलेली असते तेव्हा अशा परिस्थितीत स्वच्छ पाणी वापरले पाहिजे.  कलिंगडाचे वर्गीकरण कलिंगडाचे शारीरिक स्वरूपावर आधारित असते.  काढणी पश्‍चात हाताळणी दरम्यान, फळांचे ओरखडे टाळले पाहिजेत. रोगाचा प्रसार टाळण्यासाठी रोगग्रस्त फळे इतर चांगल्या फळांमधून काढून टाकावे.  कलिंगडावर सामान्य बुरशीजन्य आजार हा ब्लॅक रॉट, स्टेम एंड रॉट आणि अँथ्रॅकनोज यामुळे होऊन त्याचा परिणाम काढणी पश्‍चात आयुष्यात होतो.  मऊ रॉट हा सर्वात सामान्य जिवाणूजन्य रोग आहे.  ज्यामुळे वरील आवरणाचा क्षय होतो.  कलिंगडावर परिणाम करणारे पोस्ट हार्वेस्ट डिझ  ऑर्डर यांत्रिक जखम, शीतकरण इजा आणि इथिलिन नुकसान हे आहेत.  फळ आणि भाज्यांचे शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी असेप्तिक पॅकेजिंग, क्रायोजेनिक रेसिंग, डीप फ्रीझिंग आणि नियंत्रित वातावरणात साठवण यासारख्या आधुनिक तंत्रावर भर देण्यात यावा. कलिंगडाच्या कापलेल्या फोडीचे आयुष्य हे दोनच दिवस असते.  तथापि हे ओझोन ट्रीटमेंट आणि पॉलिथिलीन पॅकेजिंगमध्ये ४ डिग्री सेल्सिअस तापमानावर सात दिवसापर्यंत वाढवली जाते. ओझोन ट्रीटमेंट सूक्ष्मजीव भार कमी करते.
  • काढणीनंतर कलिंगडामध्ये अंतर्गत साखर वाढ किंवा रंगाचा विकास होत नाही, यामुळे कलिंगडाची पूर्ण वाढ झाल्यावर काढणी केली पाहिजे.  कलिंगडावर आढळून येणारी सामान्य विकृती म्हणजे यांत्रिक जखम होय. याचे मुख्य कारण योग्य पोस्ट हार्वेस्ट हाताळण्याचे कमतरता.  कमी तापमानात साठवणुकीमुळे शीतकरण इजा, इथिलीन संपर्कात येणे यामुळे येथील यांचे नुकसान आणि आतील पोकळपणा.  सूक्ष्मजीव कलिंगडाच्या बाह्य पृष्ठभागावर आढळतात. त्यात मुख्य सुडोमोनॉस, ई. कोलाई आणि इंटरोबॅक्टर यांचा समावेश असतो.  हेच सूक्ष्मजीव ताजी कापलेल्या कलिंगडाच्या पृष्ठभागावर आढळतात आणि यामुळे कलिंगडची काप लवकर खराब होते.  रंग बदल होणे तसेच घट्टपणा कमी होणे हे सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे होते.

लेखक:

डॉ. नितीन गोविंद प्रभू सुरडकर

( एम. टेक., नेट, पीएचडी)

 सहाय्यक प्राध्यापक, एमआयटी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद.

डॉ. ए. बी. रोडगे

( एम. एस. कॅनडा, एम. टेक. पीएचडी)

 प्राचार्य, एमआयटी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद.

 

English Summary: Water lemon farming, how to take care of the crop after harvest
Published on: 26 September 2020, 06:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)