Horticulture

बऱ्याचदा बाजारात भाजीपाल्याची जास्त आवक झाली असता भाजीपाल्याचे भाव पडतात अशा वेळेस बराच भाजीपाला कमी किमतीतशेतकऱ्याला विकावा लागतो.त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. यासाठी भाजीपाला प्रक्रिया विशेषता भाजीपाला सुकविणे हा एक उत्तम पर्याय आहे.

Updated on 19 December, 2021 2:38 PM IST

 बऱ्याचदा बाजारात भाजीपाल्याची जास्त आवक झाली असता भाजीपाल्याचे भाव पडतात अशा वेळेस बराच भाजीपाला कमी किमतीतशेतकऱ्याला विकावा लागतो.त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. यासाठी भाजीपाला प्रक्रिया विशेषता भाजीपाला सुकविणे हा एक उत्तम पर्याय आहे.

शेतमालावर प्रक्रिया केल्यास किमतीच्या चढ-उतारावर नियंत्रण ठेवता येते.याशिवाय हंगामी भाज्या ग्राहकांना बिगर हंगामात देखील उपलब्ध होऊ शकतात.

 भाजीपाला सुकविण्यासाठी दोन पद्धतींचा उपयोग करतात…..

1-उन्हात भाजीपाला सुकविणे.

2- नियंत्रण तापमान आणि आर्द्रताराखून यंत्राच्या साहाय्याने भाजीपाला सुकविणे.

उन्हात भाजीपाला सुकविणे

साहित्य- भाज्या, स्टेनलेस स्टील चाकू,पिलर,डब्बा,ताटे,टॉवेल, सुकविण्यासाठी नायलॉनची बारीक जाळी  (1 मी मी ),प्रोलीप्रोप्लिनपिशव्या( 50 किंवा 100 ग्रॅम आकाराच्या)इत्यादी साहित्य आवश्यक असते. यासाठी प्रथम चांगल्या अवस्थेतील भाज्या निवडाव्यात.

  • भाज्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. त्यानंतर साल व देठाजवळील भाग काढावा.भाज्यांच्या पातळ चकत्या कापाव्यात.पालेभाज्यांची पाने खुडून घ्यावी.बटाटा, गाजर, भेंडी,फुलकोबी यासारख्या भाज्या उकळत्या पाण्यात चार ते पाच मिनिटे ठेवून ब्लिचिंग करावे.0.125 टक्के पोटॅशिअम मेटाबायसल्फाईटच्या द्रावणात दहा मिनिटे बुडवून ठेवून सल सल्फायटिंग करावे. एक किलो फोडीसाठी अर्धा किलो द्रावण घ्यावे. फोडींना दोन ग्रॅम गंधकाचे दोन तास धुरी द्यावी. त्यानंतर त्या चकत्या उन्हात जाळीवर थर देऊन वाळत घालावेत. कडकडीत वाढल्यावर प्रॉलीप्रोप्लिनपिशवीत भराव्यात.

हिरव्या भाज्यांसाठी प्रक्रिया

  • साहित्य- हिरवी भाजी, मीठ,सायट्रिक आम्ल,मॅग्नेशियम ऑक्साईड, सोडियम कार्बोनेट,पोटॅशिअम मेटाबायसल्फेट, प्लास्टिक पिशवी व वाळवणी यंत्र
  • कृती-भाज्या अगोदर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. भाजीच्या देठाजवळील भाग काढून टाकावा.भाजी सुकविणे पूर्वीमीठ एक टक्के सायट्रिक आम्ल 0.1 टक्के+ मॅग्नेशियम ऑक्साईड 0.1 टक्के+ सोडियम कार्बोनेट 0.1 टक्के गरम पाण्यात घालून भाज्या सुमारे 30 सेकंद बुडवून नंतर पाणी निचरून घेऊन भाज्या थंड कराव्यात.भाज्या 30 सेंटिग्रेड  तापमानास सुमारे तीस सेकंद बुडवून घेण्यासाठी भाज्या बुडतील अशा प्रमाणात पाणी द्यावे पाण्यात वरील रसायने टाकावे. वाळवणी यंत्राच्या ट्रेमध्ये भाज्या एक सारख्या पसरवून वाळवणी यंत्रामध्ये पंचेचाळीस सेंटीग्रेड तापमानाससुमारे 15 ते 18 तास सुकवाव्यात. सुकलेल्या हिरव्या पालेभाज्या प्लास्टिक पिशवीत हवाबंद करून थंड व कोरड्या जागी साठवाव्यात.
English Summary: vegetable dyhydration is useful for long lasting storage for more benifit
Published on: 19 December 2021, 02:38 IST