Horticulture

आंबा लागवड ही एक शेतकऱ्यांसाठी फायद्याचे निर्णय ठरू शकतो. आंबा हे आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे चार हजार वर्षापासून आंब्याची लागवड अस्तित्वाठत आहे.लागवडीखालील क्षेत्राच्या बाबतीतजर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 4.85 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासून 12.12 लाख टन उत्पादन मिळते.

Updated on 03 November, 2021 7:41 PM IST

आंबा लागवड ही एक शेतकऱ्यांसाठी फायद्याचे निर्णय ठरू शकतो. आंबा हे आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे चार हजार वर्षापासून आंब्याची लागवड अस्तित्‍वात आहे.लागवडीखालील क्षेत्राच्या बाबतीतजर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 4.85 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासून 12.12 लाख टन उत्पादन मिळते.

जर आपण आंबा लागवडीच्या पारंपरिक पद्धतीचा विचार केला तर यामध्ये आंब्याची अभिवृद्धी आंब्याच्या कोया पासून केली जाते. कोय कलम,मृदूकाष्ट कलम, विनियर कलम या पद्धतीद्वारे कलमे तयार करून  अभिवृद्धी करण्यात येते.या लेखात आपण आंबा लागवडी विषयी माहितीघेऊ.

आंब्याच्या सुधारित व संकरित जाती

 आंबा लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रतीची, दीड ते दोन मीटर खोलिची,पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.जरा आंब्याच्या सुधारित व संकरित जातींचा विचार केला तर यामध्ये हापूस,केसर,रत्ना,सिंधू, कोकण रुची,कोकणा राजा,सुवर्णा,सम्राट,पायरी,लंगडा,वनराज या आंब्याच्या चांगल्या जाती आहेत.

लागवड व खते

10×10 मीटर भारी जमिनीत लागवड अंतर

9×9 मीटर मध्यम जमिनीत

1×1×1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन 40 ते 50 किलो शेणखत + पोयटा माती+ दोन किलो सिंगल सुपर फास्फेटया मिश्रणाने खड्डे भरावेत.एक वर्षे वयाच्या झाडास 15 किलो कंपोस्ट खत,दीडशे ग्रॅम नत्र,50 ग्रॅम स्फुरद,100 ग्रॅम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चर खोदून द्यावे. दरवर्षी ही मात्रा समान प्रमाणात वाढवून दहाव्या वर्षापासून प्रत्येक झाड 50 किलो कंपोस्ट खत,दीड किलो नत्र, 500 ग्रॅम स्फुरद व एक किलो पालाश बांगडी पद्धतीने जून महिन्यात घ्यावे.

पाणी व्यवस्थापन व आंतरपीक

 पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर तीन ते चार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आंबा बागेत दहा वर्षापर्यंत भाजीपाला,द्विदल,शेंगवर्गीय,तागइत्यादी  आंतरपिके म्हणून घेता येतात.

फळांची काढणी

 आंबा फळे 14 आणे( 85 टक्के)पक्वतेची काढावी. यावेळी फळांना लाल रंगाची छटा येते. फळांचा रंग गर्द हिरव्या पासूनफिक्कटहोतो.तसेच फळांच्या देठाजवळ खोलगट भाग तयार होतो. यावेळी फळांची विशिष्ट घनता 1.02 ते 1.04 एवढी असावी.

फळांची काढणी देठासहित करावी तसेच फळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चारनंतर काढा. 350 ग्रॅम, 300 ते 351 ग्रॅम, 251 ते 300 ग्रॅम व 250 ग्रॅम पेक्षा कमी वजनाची अशी प्रतवारी करा. प्रतवारी झाल्यावर फळे 500 पीपीएम कार्बनडेंझिम(0.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम एक लिटर पाण्यात ) च्या द्रावणात दहा मि. बुडवावे. त्यामुळे काढणी नंतर फळे कुजण्याचे प्रमाण कमी होते. त्यानंतर फळे पंख्याखाली वाळवून खोक्यांमध्ये भरा.

( संदर्भ-मीE शेतकरी)

English Summary: use this process to cultivate mango and earn more money
Published on: 03 November 2021, 07:41 IST