बरेचदा पावसाळ्यामध्ये पावसाचा खंड पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहते. अशावेळी तात्पुरत्या उपाययोजनांचा युद्धपातळीवर वापर केला गेला पाहिजे.जेणेकरूनशेतातील पिकांना जीवदान मिळेल.
पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची साठवणूक वैयक्तिक किंवा सामुदायीक शेततळ्यांमध्ये करता येऊ शकते जेणेकरून या साठवलेल्या पाण्याचा वापर हा पावसाचा खंड पडला तर करता येऊ शकते. या साठवलेल्या पाण्याचा वापर हा तुषार सिंचनाच्या मदतीने जर केला तर पिकांना जीवदान देता येईल. पाऊस येईपर्यंत पिकांना जगता यावे या उद्देशाने असे सिंचनाचा वापर करता येऊ शकतो. बाहेरून आणलेले पाणी साठवून हवे तेव्हा पिकांच्या गरजेप्रमाणे सूक्ष्म सिंचनाद्वारे देता येते. बरेच शेतकरी बाहेरून पाण्याचा टँकर मागवून तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी देऊ शकतात.पोर्टेबल लिफ्ट इरिगेशन या संकल्पनेकडे पावसाच्या पाण्यावर एक उपाय म्हणून देखील पाहता येऊ शकते.. ज्या ठिकाणी उत्तम पाऊस झाला आहे किंवा पूरस्थिती आहे अशा ठिकाणाहून कमी पाऊस असलेल्या ठिकाणी पाणी वाहून नेऊन पिकांवरील पाण्याचा ताण कमी करणे, तलाव, बंधारे तसेच शेततळे भरून देणे असे प्रयत्न करता येऊ शकतात.या लेखात आपण तुषार सिंचनाचा पाण्याच्या खंड पडला तर कसा वापर करता येईल याबद्दल माहिती घेऊ.
पोर्टेबल तुषार सिंचन पद्धत
या पद्धतीत धरणांमधून केव्हा नदीतून पाणी वाहून नेऊन तलावात किंवा टाकीत साठवून पोर्टेबल पाइपच्या साह्याने तुषार सिंचनासाठी वापरता येऊ शकते.यामध्ये तुम्ही एचडीपीईकिंवा पीव्हीसी पाइपचा वापर करू शकता.तुषार सिंचनामध्ये पाण्याचे पिकावर पावसासारखे फवारले जाते.त्यामुळे बारा महिने शेतकरी उपलब्ध पाण्यामध्ये पीक घेऊ शकतात.तसेच अधिक जमीन ओलिताखाली आणून उत्पादनात वाढ करू शकतात.
तुषार सिंचनाचे फायदे
- पाण्याची बचत चांगली होते.
- उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत वाढ होऊशकते.
- वेगवेगळ्या जमिनीतमाती प्रकाराप्रमाणे पाणी शोषणाच्या प्रमाणे सिंचनकरता येते.
- आवश्यक तेवढेच पाणी देता येत असल्यामुळे जमिनीतील महत्वाचे मूलद्रव्य पाण्याबरोबर खोलवर मुरुनवाया जात नाहीत.
- पिकांवर पावसाप्रमाणे पाणी फवारणी जात असल्यामुळे रोगांचे प्रमाण कमी आढळते.
- कमी वेळेत जास्त क्षेत्राचे सिंचन करता येत असल्यामुळे विजेची व मजुरांची बचत होते.
- या पद्धतीमध्ये पाण्यासाठी पाट, सॉरी आणि वरंबा इत्यादींची गरज पडत नसल्यामुळे दहा टक्के जास्त क्षेत्र लागवडी खाली येते व उत्पन्न वाढते.
- पिकांच्या मुळाशी वाफसा स्थिती कायम राहते त्यामुळे पिकांच्या मुळांद्वारे अन्न ग्रहण करण्याची क्षमता वाढते.
- माती भुसभुशीत राहते.
तुषार सिंचन संच बसवण्यापूर्वी घ्यायची काळजी
- च्या शेतात सिंचन करायचे आहे त्याच्या आकारानुसार संचाचा आराखडा करणे गरजेचे आहे. जेणेकरून सिंचनाला जास्तीत जास्त कार्यक्षम होईल.
- योग्य त्या अश्वशक्तीचा पंपाची योग्य व गरजेनुसार निवड करावी.
- उपलब्ध पंप योग्य दाब देतो का? याची देखील चाचणी करणे गरजेचे आहे जेणेकरून ऊर्जेचा चुकीचा वापर होणार नाही.
- तुषार सिंचन शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावे जेणेकरून वाढत्या तापमानाचा व वाऱ्याच्या वेगाचा परिणाम कमी राहील.
- वाऱ्याची गती कायम जास्त राहिलाच पाईप ची जोडणी त्रिकोणी प्रकारात करावी. जेणेकरून सगळीकडे समप्रमाणात पाणी पडेल.
- संच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काळजीपूर्वक व पूर्ण सुटा करून वाहून न्यावा व नवीन जागी पुन्हा जोडावा. जोडताना दोन पाईप मध्ये कचरा किंवा माती राहणार नाही याची काळजी घ्यावी.
- पाईप जोडतांना पाण्याची गळती होणार नाही याची तंतोतंत काळजी घ्यावी व त्याप्रमाणे कपलर् जोडावीत.
- तुषार सिंचनाद्वारे पाणी देताना त्या अस्वच्छ असल्यास फिल्टरचा वापर करावा.
- तुषार संच यामध्ये योग्य दाब मिळेल त्याप्रमाणे तुषार तोट्या ची संख्या निवडावी.
- एका हंगामात संच वापरून झाल्यास दुसऱ्या हंगामासाठी संच वापरण्यापूर्वी उपवाहिनी प्रवेश करून सर्व घाण बाहेर पडल्याची खात्री करून घेऊन मगच बंद करून घ्यावा.
- संचवापरत असताना तो नेहमी जोडलेल्या अवस्थेत ठेवावा. जेणेकरून उंदीर व इतर किडे तुषार तोटी खराब करणार नाहीत.
Published on: 19 January 2022, 02:21 IST