Horticulture

संजीवकांचा द्राक्षबागेत समंजसपणे आवश्यक त्या अवस्थेत व योग्य त्या प्रमाणात वापर करायला पाहिजे व संजीवके वापरताना त्यांच्या कार्यपद्धतीचे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. अलीकडे द्राक्ष पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या संजीवकांचा वापर उच्च दर्जाचे द्राक्ष उत्पादनासाठी केला जातो. संजीवकांचा नेमका वापर करता न आल्यास वेगळेच अनिष्ट परिणाम द्राक्षवेलीवर दिसून येत आहे. त्यामुळे संजीवकांचा वापर समंजसपणे करायला हवा. संजीवके ही तीव्र परिणामी असतात जरी त्याचे प्रमाण अत्यंत कमी लागत असले तरी त्यामुळे अलीकडील काळात पाने जळण्याची, पाने आकसल्यासारखी होणे, काडीची जाडी वाढणे व नंतर त्यावर गाठी येणे अशा प्रकारचे आनिष्ठ परिणाम दिसत आहे.

Updated on 13 October, 2018 4:23 PM IST


संजीवकांचा द्राक्षबागेत समंजसपणे आवश्यक त्या अवस्थेत व योग्य त्या प्रमाणात वापर करायला पाहिजे व संजीवके वापरताना त्यांच्या कार्यपद्धतीचे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. अलीकडे द्राक्ष पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या संजीवकांचा वापर उच्च दर्जाचे द्राक्ष उत्पादनासाठी केला जातो. संजीवकांचा नेमका वापर करता न आल्यास वेगळेच अनिष्ट परिणाम द्राक्षवेलीवर दिसून येत आहे. त्यामुळे संजीवकांचा वापर समंजसपणे करायला हवा. संजीवके ही तीव्र परिणामी असतात जरी त्याचे प्रमाण अत्यंत कमी लागत असले तरी त्यामुळे अलीकडील काळात पाने जळण्याची, पाने आकसल्यासारखी होणे, काडीची जाडी वाढणे व नंतर त्यावर गाठी येणे अशा प्रकारचे आनिष्ठ परिणाम दिसत आहे.

संजीवकांचे मुख्य कार्य हे द्राक्षवेलीत निर्माण होत असलेल्या अन्नद्रव्याचे वहन द्राक्ष मन्यांकडे करणे हे आहे. म्हणजेच संजीवकांमुळे अन्ननिर्मिती होत नाही. त्यामुळे आवश्यक ती गुणवत्ता साधताना त्या वेलीवरील पानांची संख्या प्रथम विचारात घेतली जाते. पानांच्या संख्येवरून वेलीच्या वाढीची परिस्थिती लक्षात येते. त्यामुळे बागेच्या परिस्थितीनुसार संजीवकांचा वापर करणे जास्त गरजेचे आहे.

अ.क्र

छाटणीनंतरचे दिवस

वाढीचा कालावधी

रसायने

संजीवकांचे प्रमाण

1

1-2

छाटणी नंतर

हायड्रोजन साईनामाईडचा

30 ते 40 मिली प्रती लिटर

2

17-18

घडाचा पोपटी रंग

जी.ए

10-15 पीपीएम

3

23-27

दुसरा डीप किंवा स्प्रे (प्री ब्लुम अवस्थेतील)

युरिया फॉस्फेट जी.ए सोबत

1000 पीपीएम

4

48-50

3-4 मिमी आकार
हिरव्या जातीसाठी
रंगीत जातीसाठी

जी.ए 3 
सीपीयू
सीपीयू

40 पीपीएम
2 पीपीएम
0.5 पीपीएम

5

60-62

6-7 मिमी  मणी आकार
हिरव्या जातीसाठी
रंगीत जातीसाठी

जी.ए 3 
सीपीयू
सीपीयू

40 पीपीएम
2 पीपीएम
0.5 पीपीएम

6

70-90

पाणी उतरण्याच्या आधीची अवस्था
(एकदाच)

कॅल्शियम नायट्रेट

5,000+10,000 पीपीएम


निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी घड सुटसुटीत असायला पाहिजेत, द्राक्ष मण्यांचा आकार, वजन रंग योग्य असायला पाहिजे, साखर व आम्ल यांचे प्रमाण तसेच मन्यातील गराचे प्रमाण या गुणवत्तेबरोवरच इतर कार्यासाठी सुद्या संजीवकांचा उपयोग केला जातो. यामध्ये पानगळ करणे, डोळा फुट करण्यासाठी, घड न जिरवण्यासाठी व साठवणीत मणिगळ होऊ नये इत्यादीसाठी संजीवकांचा वापर केला जातो. या प्रत्येक बाबी कशा साधल्या जातात याविषयी सविस्तर माहिती पुढे दिली आहे. 

  • एकसारख्या प्रमाणात डोळ्यामधून फुट निर्मितीसाठी संजीवकांचा वापर:
    फळ छाटणीनंतर लगेचच वरच्या बाजूच्या दोन ते तीन डोळ्यावर हायड्रोजन साईनामाईडचा 30 ते 40 मिली प्रती लिटर किंवा काडीच्या जाडीनुसार उपयोग करावा.

  • घडाचा पोपटी रंग:
    घडाचा पोपटी रंगाच्या अवस्थेमध्ये जीए. 10 पीपीएम व चार ते पाच दिवसांनी जीए-3 15 पीपीएम इतक्या प्रमाणात फवारणी करावी. या फवारणीमुळे पाकळ्यांची लांबी वाढविण्यासाठी मदत होते. व त्यानंतर घडाच्या देठाची लांबी वाढविण्यासाठी 20 पीपीएम जीए-3 ची फवारणी करावी त्यासाठी द्रावणाचा सामू 5.5 ते 6.5 इतका असावा.

  • मण्यांचा विरळणीसाठी संजीवकांचा वापर:
    घडाची वाढ होऊन घडावरील मणी फुलोरा अवस्थेत येणे यासाठी घडातीलमणी जेव्हा 50 टक्के फुलोरा अवस्थेत असतात. तेव्हा 40 पीपीएम जीए ची फवारणी करावी त्यासाठी द्रावणाचा सामू 5.5 ते 6.5 इतका असावा.

  • मण्यांची लांबी वाढविण्यासाठी सुरुवातीपासून जीएचा वापर :
    फुलोरा अवस्थेच्या सुरुवातीपासून जीएचा वापर 10:15 आणि 20 पीपीएम या प्रमाणात करावा यामुळे लांबोळे मणी तयार होतात. हे सोनाका, माणिक चमन, व काळ्या द्राक्षाच्या जातींसाठी करावे.

  • मण्यांचा आकारमान वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर:
    गुणवत्तायुक्त घडनिर्मितीसाठी मण्यांचे आकारमान अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यासाठी 3 ते 4 मिमी या मण्यांच्या अवस्थेमध्ये जीए 40 पीपीएम + सिपिपियु 1-2 पीपीएम चा पहिला डीप घावा. त्यानंतर 6 ते 8 मिमी मण्यांच्या अवस्थेमध्ये जीए 30 पीपीएम+सीपीयू 1-2 पीपीएम इतक्या प्रमाणात दुसरा डीप घावा. या स्थितीमध्ये सीपीयूचा उपयोग अत्यंत महत्वाचा आहे. कारण मण्यांचा हिरवा रंग टिकून राहतो.

  • साठवणीतील कालावधी वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर:
    साठवणीतील कालावधी वाढविण्यासाठी फळ छाटणीनंतर 75 ते 105 दिवसात एकदाच अंतराने कॅल्शियम नायट्रेट 1 टक्केचा डीप घ्यावा व काढणीच्या 10 दिवस अगोदर एन.ए .ए. या संजीवकांची 100 पीपीएम या प्रमाणात दोन वेळा फवारणी बेदाण्याच्या द्राक्षासाठी करावी.

घ्यावयाची दक्षता:

  1. जीएची पहिली फवारणी 10 पीपीएम या प्रमाणात घडाचा रंग पोपटी असताना करावी. त्यानंतर पाकळ्यांची लांबी वाढविण्यासाठी दुसरी जीएची फवारणी 15 पीपीएम 4 ते 5 दिवसांनी करावी.
  2. जीएच्या द्रावणाचा सामू 5.5 ते 6.5 समतोल राहण्यासाठी सायट्रिक आम्ल, फॉस्फेट एकदाच वापरावे.
  3. जीए 40 पीपीएम ची फवारणी 50 % फुलोरा असतानाच करावी.
  4. फळधारक काडीवर घडासमोर 10 पाने असावीत.
  5. मण्यांचा आकार 3-4 मिमी इतका झाल्यानंतर मजुरांच्या सहाय्याने विरळणी करावी.

श्री. शक्तीकुमार आनंदराव तायडे
पीएच.डी.विद्यार्थी, उद्यानविद्या विभाग 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

English Summary: use of plant growth regulator in grape for exportable production
Published on: 31 August 2018, 04:36 IST