Horticulture

कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजीर लागवडीकडे वळत आहेत. बरेच शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत.त्यातल्या त्यात सध्या औषधी वनस्पती लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

Updated on 10 December, 2021 11:33 AM IST

कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजीर लागवडीकडे वळत आहेत. बरेच शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत.त्यातल्या त्यात सध्या औषधी वनस्पती लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

अंजीर ही एक औषधी वनस्पती आहे. याच्या  व्यावसायिक शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकरी नफा कमवू शकतात. अंजिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे  एकदा  लागवड केल्यास अंजिरापासून कमीत कमी 30 वर्षांपर्यंत उत्पादन मिळते. या लेखात आपण अंजीर लागवड विषयी माहिती घेऊ.

 अंजीर लागवडीविषयी माहिती

  • हवामान- अंजीर पिकाला उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. त्यामुळे महाराष्ट्रात हे फळ आणखी मोठ्या क्षेत्रात करायला भरपूर वाव आहे. कमी उष्ण तापमान या पिकाला घातक ठरत नाही, परंतु ओलसर दमट हवामान मात्र निश्चितपणे नुकसानदायी ठरते. आज या क्षेत्रात कमी पाऊस पडतो अशा मध्ये ऑक्टोबर ते मार्च पर्यंत पाण्याची थोडीफार सोय असली तरी अशा ठिकाणी अंजीर  लागवडीस वाव आहे.
  • उपयुक्त जमीन-हलक्‍या माळरान यापासून ते मध्यम काळ्या व तांबड्या जमिनीपर्यंत अंजीर  लागवड शक्‍य आहे. भरपूर चुनखडी असलेल्या तांबूस काळ्या जमिनीत अंजीर उत्तम वाढते. चांगल्या पाण्याचा निचरा होणारी एक मीटरपर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजिरा साठी उत्तम होय. मात्र या जमिनीत पाण्याचे प्रमाण असावे. खूप काळ या मातीचे जमीन या फळाला योग्य नाही. खोलगट आणि निचरा नसलेल्या जमिनीत हे झाड पाहिजे तसे चांगले वाढत नाही.
  • सुधारित जाती- अंजिराचे अनेक जाती आहेत. त्यामध्ये सिमरना, कालिमिरणा, कडोटा, काबुल,मार्सल्सइत्यादी जाती प्रसिद्ध आहेत. पुणे भागातील पूना अंजीर नावाने प्रसिद्ध असलेली जात किंवा कॉमन या प्रकारातील असून महाराष्ट्रात मुख्यत आहेत जात लावली जाते.
  • रोपवाटिकेत अंजीर झाड तयार करणे- अंजीर वनस्पती प्रामुख्याने एक ते दोन सेंटीमीटर जाड,पंधरा ते वीस सेंटीमीटर लांबीच्या परिपक्व कलमांद्वारे तयार होतात. हिवाळ्यातील मादा झाडांपासून कलम घेतले जाते व ते एक ते दोन महिन्यांपर्यंत कॅल्सीनिंगसाठी जमिनीत दाबले जातात.तापमानफेब्रुवारी ते मार्च पर्यंत वाढू लागताच या कलमांना 15×15 सेंटीमीटर च्या अंतरावर रोपवाटिकेत लावली जातात.
  • अंजीर लागवड- शेताची तयारी करताना खोदलेल्या खड्ड्यात असंतुलित खत व खाद्य टाकून  रोपे लावा.8×8मीटर अंतरावर लागवड योग्य आहे.लागवड करण्याची वेळ डिसेंबर ते जानेवारी किंवा जुलै-ऑगस्ट मध्ये करावे.
  • अंजिराची लागवड- उपउष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्येवसंत ऋतूमध्ये येणारी फळे मे ते ऑगस्ट दरम्यान पिकून तयार होतात. जेव्हा फळे पूर्णपणे पिकतात तेव्हा त्याची काढणी करावी. अंजीर फळ तोडल्यानंतर 400 ते 500 ग्रॅम पेक्षा जास्त फळ कंटेनरमध्ये ठेवू नये.जर फळे मोठ्या प्रमाणात काढायचे असतील तर ती पाण्याने भरलेल्या भांड्यात गोळा करावीत.
English Summary: through fig cultivation earn more money and profit and management
Published on: 10 December 2021, 11:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)