डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासोबतच बदलते हवामान आणि ढगाळ वातावरण यांचा प्रभावामुळे बुरशी आणि कीड सारख्या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता.
तसा जोराचा वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे आंब्याचा मोहर सुद्धा बऱ्याच प्रमाणात गळून गेला होता. परंतु येणाऱ्या काही दिवसात वातावरण स्वच्छ असल्याने पुन्हा एकदा आंब्याला मोहर बहरू लागले आहेत. तसेच यासाठी औषध फवारणी करणे सुद्धा गरजेचे आहे. असे आवाहन कृषी विद्यापीठाने सुद्धा केलेली आहे.तसेच शेतकरी वर्गाने कृषी विद्यापीठाचा त्रिसूत्री कार्यक्रम देखील अमलात आणला आहे. हा त्रिसूत्री कार्यक्रम आंबा पिकाला नवसंजीवनी मिळवून देऊ शकेल. या लेखात आपण या त्रिसूत्री विषयी माहिती घेऊ.
तापमान बागायतदारांसाठी पंचसूत्री कार्यक्रम…
- व्यवस्थापन- पावसाने उघडीप दिली त्यामुळे वातावरण दोन स्वच्छ आणि कोरडा आहे. तसेच कोकणातील भागात 19 ते 23 सेल्सिअस तापमान वर्तवण्यात आले आहे त्यामुळे आंबा बागेचे व्यवस्थापन करण्यासाठी हे वातावरण खूप पोषक ठरत आहे. तसेच गरजेनुसार छाटणी, रासायनिक खतांचा योग्य वापर,संजीवकांचा वापर, आंबा मोहर संरक्षण आणि फळांची व्यवस्थापन या खूप महत्वाच्या प्रक्रिया आहेत आंब्याच्या कैऱ्या या सुपारीच्या आकाराच्या झाल्याकिप्रत्येक झाडाला शंभर ते दीडशे लिटर पाणी द्यावे. पंधरा दिवसांच्या काळामध्ये कमीत कमी तीन ते चार वेळा पाणी द्यावे. यामुळे फळांचा आकार लवकर वाढेल आणि फळ गळतीचे प्रमाण सुद्धा कमी होईल. आंब्याच्या मोहराचा संरक्षण करण्यासाठी तिसऱ्या आणि सहाव्या फवारणीच्या वेळी युरियाचे मिश्रण करावे आणि फवारणी करावी. त्यामुळे आंब्याची वाढ लवकरात लवकर होतं.
- आंबेमोहरा साठी पोषक वातावरण- डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आंब्याच्या मोहरासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे बागायतदार चिंतेत होता परंतु आता आंब्याला मोहर बहरूलागले आहेत. तसेच वातावरणात पोषक वातावरण असल्यामुळे ते मोहरा साठी खूप उपयुक्त आहे.मोहराच्या वेळी झाडावर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. त्यामुळे झाडाला एकसारखा मोहर लागण्यास मदत होते.
- कीड, कृषी व्यवस्थापन गरजेचे- सध्या वातावरणामध्ये आंब्यासाठी पोषक असे पाणी उपलब्ध नाही. वातावरणामध्ये जर उष्णता निर्माण झाली तर आंब्याच्या मोहरावर कीड पडण्याची दाट शक्यता असते. यासाठी कीड नियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामध्ये रासायनिक खतांचा योग्य वापर,छाटणी आणि कीटकनाशकांची फवारणी करावी. सध्या वातावरण पोषक आहेत त्यामुळे योग्य व्यवस्थापन करून आपण आंब्याचे उत्पादन वाढवू शकतो.
Published on: 05 January 2022, 06:06 IST