सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या वरच्या थरात असलेल्या जिवाणू आणि विविध कीटकांच्या माध्यमात कार्यरत असतो. हे उपयोगी जीव सेंद्रिय घटकांमध्ये असलेली सर्व मूलद्रव्य विघटन क्रियेमधून वनस्पतींच्या मुळाना उपलब्ध करून देत असतात आणि ती मृत झाल्यावर त्यांच्या वीघटनांमधून ही सर्व मूलद्रव्य पिकांना पूर्ण सहजपणे उपलब्ध होतात.
निसर्गाची ही निरोगी अन्नसाखळी सुपीक जमिनीमध्ये अखंड चालू असते. परंतु रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्यादित वापर होतो तेव्हाही अन्नसाखळी तुटते आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊ लागते. या लेखात आपण सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उपाय आणि फायदे जाणून घेणार आहोत.
सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उपाय
- सेंद्रियखताकडे वनस्पतींना अन्नद्रव्य पुरवणारे स्त्रोत एवढ्या पुरतेच पाहू नये. जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास साठी त्यांचे मोठे योगदान आहे. हे दोन्ही गुणधर्म चांगले असल्यास रासायनिक जमिनीचे गुणधर्म सुधारून जमिनीतील स्थिर झालेली अन्नद्रव्ये उपलब्ध स्थितीत येतातव पिकांना उपलब्ध होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कडील शेणखत चांगल्या प्रतीचे कसे निर्माण होईल याकडे लक्ष द्यावे.
- जास्त पावसाच्या प्रदेशात शेतकऱ्यांनी ढीग पद्धतीने खत तयार करावे. याउलट कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खड्डा पद्धतीने शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करावे.
- सेंद्रिय खत चांगले कुजवावे अन्यथा शेणखतातील तणांच्या बियांमुळे शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढेल.
- बरेच शेतकऱ्यांकडे शेणखतामध्ये सामान्यतः कुजण्याच्या स्थितीनुसार तीन प्रकार पडतात. खड्ड्यातील वरचा थर न कुजलेला मधील थर कुजलेला तर शेवटचा खालचा थर न कुजलेला अशी परिस्थिती असते. अशा खतांमधून तने,किडी व अपायकारक बुरशीचा प्रसार होतो.
- सेंद्रिय खत तयार करताना ते शेतावरच तयार करावे किंवा अर्धवट कुजलेल्या शेणखतापासून गांडूळ खत तयार करावे.
- हिरवळीची खते,शेतातील पिकांचे अवशेष, काडीकचरा व पालापाचोळा यांच्यावर कुजण्याची प्रक्रिया करून यांचाही वापर सेंद्रिय कर्बाचे निर्मितीसाठी करता येतो.
सेंद्रिय कर्बाचे फायदे
- पोषकद्रव्यांची उपलब्धता वाढवते.
- जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे वापरामुळे 90 ते 95 टक्के नायट्रोजन, 15 ते 80 टक्के फॉस्फरस आणि 50 ते 20 टक्के सल्फरचे स्तरीकरण करते.
- जमिनीच्या अनेक भागातून खाली द्रव्याची स्थिरता आणि मातीतील संपूर्ण धनभारित विद्युत कनांची वाहन क्षमता वाढवते.
- जमिनीमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशियम, पोटॅशियम व इतर सर्व मूलद्रव्याचे स्थिरीरीकरण करते.
- पोषक द्रव्यांची धारण क्षमता वाढते व त्यांना एकत्र धरून ठेवते.
- रोपांना जमीनीतील निष्क्रिय खनिजद्रव्ये सक्रिय स्वरुपात उपलब्ध करून देतात.
- मातीतील सूक्ष्म करांना प्रोत्साहित करून निष्क्रिय खनिजद्रव्ये सक्रिय स्वरूपात रोपांना उपलब्ध करून देतात.
- जमिनीचा सामू चे निष्क्रियकरन थांबवण्याला मदत होते.
- जमिनीतील सामू मध्ये होणाऱ्या जोरदार बदलाला प्रतिरोध करते.
Published on: 14 December 2021, 01:49 IST