Horticulture

जर आपण कोरडवाहू जमिनीतील लागवड योग्य फळबागाचा विचार केला तर सिताफळ लागवडीचा प्राधान्याने विचार करावा लागेल. कारण बऱ्याच प्रमाणात असलेल्या उथळ व हलक्या जमिनीत पारंपारिक पिके घेणे ऐवजी कोरडवाहू फळबागांची लागवड खूप महत्त्वपूर्ण ठरू शकते. या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर कोरडवाहू फळ पिकातील महत्त्वाचे पीक म्हणजे सिताफळ हे होय.

Updated on 01 November, 2022 5:18 PM IST

जर आपण कोरडवाहू जमिनीतील लागवड योग्य फळबागाचा विचार केला तर सिताफळ लागवडीचा प्राधान्याने विचार करावा लागेल. कारण बऱ्याच प्रमाणात असलेल्या उथळ व हलक्या जमिनीत पारंपारिक पिके घेणे ऐवजी कोरडवाहू फळबागांची  लागवड खूप महत्त्वपूर्ण ठरू शकते. या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर कोरडवाहू फळ पिकातील महत्त्वाचे पीक म्हणजे सिताफळ हे होय.

नक्की वाचा:Coconut Farming: शेतकरी बंधूंनो! नारळ फळबागात होतो 'या' रोगांचा प्रादुर्भाव, अशा पद्धतीने कराल नियंत्रण तर मिळेल फायदा

हे समशितोषण कोरड्या प्रदेशातील फळपिक असून  महाराष्ट्रातील हवामान हे सिताफळ लागवडीसाठी खूप फायदेशीर आहे. साधारण प्रमाणे पाचशे ते साडेसातशे मिमी पाऊस पडणाऱ्या भागात सिताफळाची उत्कृष्ट प्रकारे लागवड यशस्वी होते. या दृष्टिकोनातून या लेखामध्ये आपण सीताफळाच्या दोन महत्त्वाच्या उत्पादनक्षम जातींची माहिती घेणार आहोत.

 सिताफळाच्या दोन महत्त्वपूर्ण जाती

1- अर्का सहन- या जातीचे सिताफळ गुणवत्तेच्या बाबतीत खूप सरस असून यामध्ये गोडपणा जास्त असतो. या जातीच्या एका सिताफळाचे वजन एक ते दीड किलोपर्यंत भरते. साखरेचे प्रमाण 22% पेक्षा जास्त असून यामध्ये बिया खूप कमी असतात.

म्हणजेच एकूण फळाच्या वजनाच्या केवळ दहा टक्के बिया असतात. या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या परागीकरणास हाताने परागीकरण करावी लागते जेणेकरून फळांची वाढ योग्य रीतीने होऊन फळांचे चांगले उत्पादन वाढते व उत्पादनही चांगले मिळते.

नक्की वाचा:Papaya Veriety: पपई लागवडीतून भरघोस उत्पादन मिळवायचा प्लान आहे तर 'या' तीन जाती ठरतील उपयुक्त,वाचा डिटेल्स

अशाप्रकारे परागीकरण केल्यामुळे या जातीच्या सिताफळाला बाजारपेठेत खूप चांगला भाव मिळतो. जर आपण उत्पादनाचा विचार केला तर आठ वर्षात 40 ते 45 किलो उत्पादन एक झाड देते व एकरी उत्पादन 10 टन इतके मिळते.

2- बाळानगर- महाराष्ट्रामध्ये ही जात अतिशय प्रसिद्ध असून या जातीच्या एका फळाचे सरासरी वजन 360 ग्रॅम असते व सरासरी 40 बिया असतात.

या जातीच्या सीताफळाची वैशिष्ट्य म्हणजे बी कमी व गर जास्त असतो. या फळाच्या गरात साखरेचे प्रमाण साधारण असते व टिकाऊपणा जास्त असतो. सिताफळ प्रक्रिया उद्योगांमध्ये बाळानगर या वाणाचा गर जास्त प्रमाणात वापरला जातो. इतर सीताफळच्या जातींपेक्षा या सीताफळाला बाजार भाव चांगला मिळतो.

नक्की वाचा:Farming Tips: 'अशा' पद्धतीने कराल स्ट्रॉबेरीची लागवड तर पडीक जमिनीत देखील पिकेल सोने, वाचा डिटेल्स

English Summary: this is two veriety of custerd apple is so productive and get more profit to farmer
Published on: 01 November 2022, 05:18 IST