Horticulture

जर आपण एकंदरीत भारताचा विचार केला तर पपईची लागवड आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल व बिहार इत्यादी राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर होते. आणि फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, पुणे, सातारा, जालना, सोलापूर या व इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पपईची लागवड केली जाते. जर तुमचा देखील पपई लागवड करण्याचा प्लान डोक्यात असेल तर तुमच्या माहितीसाठी या लेखामध्ये आपण तीन पपईच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या जातींची माहिती घेणार आहोत.

Updated on 21 October, 2022 4:12 PM IST

नक्की वाचा:आता सरकारकडून फळबागांची लागवड करण्यासाठी तब्बल 100 टक्के अनुदान; असा घ्या लाभ

 पपईच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या जाती

1- पुसा डेलिशियस( पुसा 1-15)- या जातीचे पपईचे झाड जास्तीत जास्त सात ते साडेसात फूट उंच वाढते व लागवडीपासून 8 महिन्यात फळे लागतात. या जातीच्या एका झाडावर नर आणि मादी असे दोन्ही प्रकारचे फुले असतात.

या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीला जमिनीपासून अवघ्या अडीच ते पावणेतीन फुटांवर फळे लागायला सुरुवात होते. या जातीच्या फळांची प्रत उत्कृष्ट असल्यामुळे बाजारपेठेत भाव देखील चांगले मिळतात. या जातीच्या फळांचा आतील गर नारिंगी असतो व चव व स्वाद उत्तम असतो. फळांचा आकार मध्यम व मोठा तसेच गोलाकार लांबोळी असतात. एका फळाचे वजन एक ते दोन किलोपर्यंत भरते.

नक्की वाचा:मुसळधार पावसाचा राज्यातील व्यापाऱ्यांनाही फटका! साठवलेला कांदा गेला वाहून; 3 ते 4 कोटींचे नुकसान

2- पुसा मॅजेस्टी (पुसा 22-3)- या जातीचे झाडे सहा ते साडे सहा फूटपर्यंत वाढते. या जातीच्या रोपांची लागवड केल्यापासून पाच महिन्यात जमिनीपासून दीड फूटावरून फळधारणा व्हायला सुरुवात होते. या जातीची फळे मध्यम, आकाराने गोलाकार तसेच गर हा घट्ट पिवळसर असतो.

साडेतीन सेंटीमीटर जाडीचा गर या जातीच्या फळाचा असून फळे एक किलो पासून तीन किलो पर्यंत असतात. या जातीच्या फळांमध्ये टिकाऊपणा जास्त असल्यामुळे साठवणुकीत फळे खराब होण्याचे प्रमाण नगण्य असते.

3- पुसा जायंन्ट ( पुसा 1-45 व्ही)- या जातीच्या पपईचे झाडे सात ते साडेसात फूट उंच वाढते व लागवड केल्यापासून साडेआठ महिन्यानंतर जमिनीपासून तीन फुटांवर फळे लागायला सुरुवात होतात.

या जातीच्या पपईच्या झाडाचे खोड मजबूत असल्यामुळे वाऱ्यामध्ये झाड पडत नाही. या जातीची फळे आकर्षक व मोठी असतात तसेच एका फळाचे वजन सव्वा ते तीन किलो वजना पर्यंत भरते. या जातीच्या फळांचा उपयोग भाजी व फॅनिंगसाठी केला जातो.या जातीच्या फळांचा गर नारिंगी रंगाचा असतो व जाडी 5 सेंटिमीटर असते.

नक्की वाचा:Papaya Farming: शेतकरी बंधुंनो! या महत्त्वपूर्ण 'ट्रिक्स' वाढवतील पपई बागेतून उत्पन्न, वाचा यासंबंधीची डिटेल्स

English Summary: this is three veriety of papaya crop is give more production and get more profit to farmer
Published on: 21 October 2022, 04:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)