जर आपण नारळ फळबागांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये नारळ फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. परंतु आता नारळाची लागवड महाराष्ट्रातील इतर भागात देखील बऱ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे तसेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधांवर वगैरे मिळून देखील शेतामध्ये 10 ते 20 झाडे असतातच.
जर आपण नारळ या फळ पिकाचा विचार केला तर यावर देखील इतर फळबागांप्रमाणे काही रोगांचा प्रादुर्भाव होत असतो व त्यामुळे बरेच नुकसान होते. त्यामुळे या लेखामध्ये आपण नारळ फळबागेतील काही महत्त्वाचे रोग व त्यावरील नियंत्रणाचे उपाय याबद्दल माहिती घेऊ.
नारळ झाडावरील काही महत्त्वाचे रोग
1- नारळाची फळगळ- हा रोग नारळाच्या कोवळ्या फळाच्या देठावर होतो, त्यामुळे नारळाचे फळे गळून पडतात. सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये नारळाच्या झाडांना फळ धरण्यासाठी मादी फुलांना नर फुलातील पुकेसर न मिळाल्यामुळे फळांची नैसर्गिक गळ होते. तसंच काही बुरशीजन्य रोगांमुळे देखील फळगळ होते.
त्यावरील नियंत्रणाचे उपाय
या रोगाच्या नियंत्रणासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाच्या दोन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने फवाराव्यात. पहिली फवारणी पावसाळ्याच्या सुरुवातीला व त्यानंतरची एक महिन्यानंतर करावी. बऱ्याचदा नारळाच्या फळांची गळ प्रामुख्याने उंदरांच्या प्रादुर्भावामुळे होते.
यामध्ये उंदीर नारळाची कोवळी फळे पोखरतात. उंदरांच्या बंदोबस्तासाठी झावळ्या स्वच्छ ठेवाव्यात. औषध दिल्यानंतर 45 दिवस नारळ काढू नये तसेच नारळास दहा किलो निंबोळी पेंड, झिंक, बोरॉन आणि कॉपर सारखे अति सूक्ष्म अन्नद्रव्य 200 ग्रॅम प्रति झाड दरवर्षी द्यावे.
नक्की वाचा:Crop Management: शेतकरी बंधूंनो! 'या' कारणांमुळे होते मोसंबी बागेतील फळगळ, वाचा डिटेल्स
2- नारळाच्या झाडावरील करपा रोग- बऱ्याचदा नारळाच्या झाडाच्या पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. यामुळे पानावर लालसर तपकिरी रंगाचे ठिपके पडून पाने पिवळी होतात. अशा ठिपक्यांचे प्रमाण हे पक्व असलेल्या पानांवर जास्त प्रमाणात दिसून येते. सुरुवातीला हे ठिपके अतिशय लहान असतात परंतु नंतर ते वाढत जाऊन एकमेकांमध्ये मिसळतात व पूर्ण पान करपून जाते.
यावरील नियंत्रणाचे उपाय
करपा रोगाचा प्रादुर्भाव हा पाण्याच्या आणि खताच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे पावसाळ्यानंतर बागेला नियमितपणे पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असून शेणखत आणि रासायनिक खते योग्य प्रमाणात द्यावीत.
एवढेच नाही तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी रोगग्रस्त झाडावरील करपलेल्या झावळ्या काढून माडाच्या निरोगी पानांवर एक टक्के तीव्रतेचे बोर्ड मिश्रण आता दोन ग्रॅम मॅन्कोजॅब एक लिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Published on: 30 October 2022, 09:26 IST