Horticulture

डाळिंबाची लागवड महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात केली जाते. जर आपण यामध्ये विशेष हा नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर कळवण, सटाणा, मालेगाव तसेच चांदवड आणि येवला या चारही तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डाळिंब पिकवला जातो. अख्ख्या महाराष्ट्राला डाळिंब पुरवण्याची क्षमता या चार तालुक्यांमध्ये आहे. परंतु मागील काही वर्षापासून मर व तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या.

Updated on 21 July, 2022 3:23 PM IST

डाळिंबाची लागवड महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात केली जाते. जर आपण यामध्ये विशेष हा नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर कळवण, सटाणा, मालेगाव तसेच चांदवड आणि येवला या चारही तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डाळिंब  पिकवला जातो. अख्ख्या महाराष्ट्राला डाळिंब पुरवण्याची क्षमता या चार तालुक्यांमध्ये आहे. परंतु मागील काही वर्षापासून मर व तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या.

परंतु आता बरेच शेतकरी नवीन लागवड करत असून जर त्यांनी काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर डाळींब फळबागेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकर आर्थिक समृद्धी येणे शक्य आहे. या लेखात आपण अशाच छोट्या छोट्या गोष्टींचा मागोवा घेऊ.

 डाळिंब लागवडीतील महत्त्वाच्या गोष्टी

1- हवामानाचा करा व्यवस्थित विचार- डाळिंब लागवडीसाठी सौम्य हिवाळा सोबत आद्रता आणि उष्ण हवामान वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते.

25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान आणि पाचशे ते आठशे मिमी पाऊस असलेल्या ठिकाणी डाळिंबाची लागवड खूप यशस्वी केली जाऊ शकते. फळ वाढीच्या कालावधीत उष्ण व कोरडे हवामान खूप महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:फळे पिकवणे: फळे कृत्रिमरित्या पिकवण्याचे सुरक्षित आणि सोपे मार्ग,नक्कीच होईल फायदा

2- जमिनीची निवड पहिला महत्त्वाचा टप्पा- डाळिंब तस पाहायला गेले तर विविध प्रकारच्या जमिनीमध्ये येतो. मध्यम, चिकन माती आणि साडेसात सामू असलेल्या चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनी मध्ये डाळिंबाची वाढ खूप चांगली होते.

3- नेहमी पिकांप्रमाणे जमिनीची तयारी आवश्यक- लागवड करण्याआधी जमिनीची खोल नांगरणी, नंतर चांगली कुळवणी व जमिनीचे सपाटीकरण करून घेणे महत्त्वाचे असते. तसेच तण काढून जमिनीची तयारी करावी.

4- लागवड करताना रोपांचे प्रमाणे अंतर-जमिनीच्या प्रकाराप्रमाणे लागवडीचे अंतर साधारण पणे शेतकरी ठेवतात.

5- आंतर मशागत आहे महत्त्वाचे-वळण आणि छाटणी ही दोन महत्त्वाची कामे डाळिंबावर केली जातात. एकेरी  खोडावर किंवा अनेक खोड प्रणालीवर रोपे वळण केली जातात.

जमिनीवरील शोषणाऱ्या वनस्पती तसेच पाण्यावरील कोंब, छेदणाऱ्या फांद्या, वाळलेल्या व रोगग्रस्त काटक्या काढण्यासाठी व झाडाला व्यवस्थित आकार यावा यासाठी छाटणी आवश्यक असते.

6- अन्नद्रव्य व्यवस्थापन उत्पादनाचा पहिला टप्पा-डाळिंबाला खूप जास्त प्रमाणात पोषक घटकांची आवश्यकता असते. खतांच्या शिफारशी केलेल्या मात्रा देणे महत्त्वाचे आहे.

600 ते 700 ग्रॅम नत्र, 200 ते 250 ग्रॅम स्फुरद आणि 200 ते 250 ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने खत व्यवस्थापन  करणे खूप गरजेचे आहे.

7- डाळिंब लागवडित या पोषक घटकांचा करा बारकाईने विचार- नत्र,स्फुरद, पालाश तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशियम, गंधक आणि लोह, मॅगेनीज, तांबे, झिंक आणि बोरान यांचे व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने करावे.

नक्की वाचा:Orange Cultivation : संत्रा लागवड; कलमांची निवड आणि कशाची घ्याल काळजी

8- योग्य पाण्याचे व्यवस्थापन- फुलांची गळ होऊ नये व फळाला तडे जाऊ नये यासाठी फुल येण्यापासून ते काढणीपर्यंत पाण्याची नियमित पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.

तुम्हाला जर भरपूर उत्पादन हवे असेल तर सिंचन व्यवस्थित असणे आवश्यक आहे. जर आपण डाळिंबाच्या झाडाचा विचार केला तर हेक्टरी दरवर्षी सहाशे पन्नास मिमी पाणी लागते. पाण्याचे व्यवस्थापन ठिबक सिंचनाने करावे.

9- डाळिंबावरील पिठ्या ढेकूण फुलपाखरू यांचे व्यवस्थापन- फुलपाखरू व्यवस्थापन- सर्व प्रभावीत फळे काढून टाकावे व नष्ट करावेत. जेव्हा फुलपाखरांची हालचालींची वेळ असते तेव्हा तीन टक्के कडुनिंबाचे तेल आणि पाच टक्के एनएसकेइ फवारावे.

आवश्यकता वाटल्यास 15 दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी. ज्या झाडावर 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त फळे तयार झाली असतील तर या स्थितीला डिकामेथ्रीन 0.0028% आणि दोन आठवड्यानंतर कार्बरील 0.2 टक्के किंवा फेनवालेरेट 0.005% फवारावे.

पिठ्या ढेकूण नियंत्रण- पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव झालेले खोड व लहान फांद्या काढून टाकाव्यात व मोनोक्रोटोफास किंवा क्लोरोपायरीफॉस यांची फवारणी करावी.

10- फळांची काढणी- फळाचे वजन व आकार तसेच रंग पाहून फळांची प्रतवारी केली जाते. कोल्ड स्टोरेज मध्ये दोन महिन्यापर्यंत किंवा पाच अंश सेंटिग्रेड ला दहा आठवड्यापर्यंत साठविता येतात त्यामुळे तणाव थंडावा  यामुळे होणारी इजा आणि वजनाच्या नुकसान टाळण्यासाठी अधिक दीर्घ काळ स्टोरेज 10 अंश  सेंटीग्रेड आणि 95 टक्के आर्द्रतेवर करावे.

नक्की वाचा:पपई फळबागेला रोगांपासून वाचवायचे असेल तर 'या' आहेत हिट उपायोजना, नक्कीच होईल फायदा

English Summary: this is small but very important thing in pomegranet cultivation
Published on: 21 July 2022, 03:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)