आवळ्याचे झाड अत्यंत काटक असल्यामुळे या फळाची फारशी काळजी न घेता येईल या फळे झाडापासून चांगले उत्पादन मिळते.आवळ्यापासून कमी खर्चात मिळणारे उत्पादन, आहार दृष्ट्या महत्त्व आणि औषधी उपयुक्तता यामुळे आवळा या फळपिकाच्या लागवडीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
या लेखात आपण आवळा फळपिकाच्या चांगले उत्पन्न देऊ शकतील अशा जातींविषयी माहिती घेणार आहोत.
या आहेत आवळ्याच्या बंपर उत्पादन देणाऱ्या जाती
- बनारसी- उत्तर प्रदेशात बनारसी जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या जातीची फळे आकाराने मोठी असून चकचकीत,पिवळसर रंगाचे असतात. या जातीच्या फळांचे वजन 40 ते 45 ग्रॅम असते.या जातीची फळे मुरब्बा आणि लोणच्यासाठी उत्तम समजली जातात.या जातीच्या फळांचा 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 650 मिलिग्रॅम क जीवनसत्व असते.
- कृष्णा(एन. ए.-5) या जातीची फळे मध्यम ते मोठ्या आकाराचे,मऊ सालीची, चमकदार,पिवळसर रंगाची, लाल छटा असलेले असतात. या जातीच्या फळाचे वजन 35 ते 40 ग्रॅम असते. मुरब्बा सारखे टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी ही जात उत्तम आहे. या जातीच्या फळात साखरेचे प्रमाण 11.5 टक्के आणि आम्लता 1.4टक्के असते.
- चकिया- ही जात उशिरा तयार होणाऱ्या असून नियमित आणि भरपूर उत्पादन देणारी आहे.या जातीची फळे मध्यम आकाराचे,चपटी आणि रंगाने हिरवट असतात.फळांचे वजन 30 ते 32 ग्रॅम असते. लोणच्यासाठी आणि तर टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी ही जात उत्तम असून नेक्रोसिस या रोगास ही जात बळी पडत नाही. या जातीत फळगळ होत नाही. म्हणून आवळ्याच्या व्यापारी उत्पादनासाठीया जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
- कांचन( एन.ए.-4)- ही जात भरपूर उत्पन्न देणारी असून या जातीची फळे मध्यम आकाराची आणि पिवळसर रंगाचे असतात. या जातीच्या फळांचे वजन तीस-बत्तीस ग्रॅम असते. फळांमध्ये साखरेचे प्रमाण दहा टक्के आम्लता 1.45 टक्के असते. ही जात त्रिफळा चूर्ण आणि लोणच्यासाठी उत्तम आहे.
- नरेंद्र आवळा-7- ही जात फ्रान्सिस आवळ्याच्या जातीपासूनसंशोधित केलेली आहे.ही झाडे सरळ वाढतात. नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये फळे तयार होतात.फळे मोठ्या आकाराचे असतात.
- फळाचे वजन 40 ते 50 ग्रॅम असते.फळांचा आकार लंबगोल आकार असतो. पृष्ठभाग चमकदार, फिक्कट पिवळ्या रंगाचा असतो.गरात रेषा अजिबात नसतात. ही जात सुद्धा फ्रान्सिस जाती प्रमाणे नेक्रोसिस रोगास बळी पडत नाही.
- आनंद-1- या जातीचे झाड मध्यम उंचीचे असते.फांदया पसरणाऱ्या असतात. खोडाची साल पांढरी असते. फळे मोठी गोल,सफेद रंगाची, रेषा हिन,गुलाबी छटा असलेली पारदर्शक असतात. फळाचे वजन 35 ग्रॅम असून जीवनसत्व क 770 मिलीग्रामप्रति 100 ग्रॅम असते. बी लहान असते तसेच उत्पादन शक्ती चांगली असते.प्रत्येक झाडास 75 ते 80 किलो फळे येतात.
English Summary: the veriety of aamla is more production to aamla benifit to farmer
Published on: 15 October 2021, 01:59 IST
Published on: 15 October 2021, 01:59 IST