सध्याच्या काळात ड्रगन फुट हे भारतीय शेततळ्यासाठी व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे पीक ठरले आहे. ड्रगन फुट हे मूळ फळ आहे मेक्सिको देशातील पण या फळाची लागवड ही दक्षिण आशिया, पूर्व आशिया खंड, श्रीलंका, फिलीपिन्स या वेगवेगळ्या खंडातील देशामध्ये केली जाते. तसेच चीन, भारत या देशात सुद्धा लागवड ही दिसून येते. भारतात सुद्धा आता हे पीक व्यापारी दृष्टीने घेतले जात आहे.
ड्रगन फ्रुट ही एक निवडुंग प्रकारातील एक काटेरी वनस्पती आहे. आणि संपूर्ण जगात यांच्या जातीमध्ये खूप विविधता आढळणे पण आपल्या भारत देशात आणि महाराष्ट्रात रेड आणि रेड व्हाईट याच दोन प्रकारच्या जातींना मागणी आहे. आज आपण याच पिकाविषयी काही निवडक माहिती घेणार आहोत. हे फळ मुळचे मेक्सीकोचे पण कालांतराने या फळाचा प्रसार हा हळूहळू संपूर्ण जगभर होऊ लागला.
ठळक वेशिष्टये:-
1. भारतीय व्यापारपेठेत जास्त मागणी.
2. महाराष्ट्रीयन व भारतीय हवामान अतिशय चांगले.
3. कमी पाण्यात जास्त वाढते.
4. मजुरांची व मशिनची गरज जास्त भासत नाही.
5. उत्कृष्ठ प्रकारची जेविक खते वापरून उत्पन्न केल्यासचांगला नफा ही मिळतो.
हवामान
आपल्या येथील हवामान हे उष्णकटिबंधीय आणि कटिबंधीय असल्यामुळे या फळ पिकासाठी योग्य आहे. साधारणता 20-30 सें. तापमान, जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश आणि 100-150 सें. मी. पाऊस पिकाच्या वाढीस अनुकूल आहे. धुके आणि जास्त पावसाचा प्रदेश यास अनुकूल नाही. दिवसाचे सर्वात कमी आणि अधिक तापमान हे पिकाच्या वाढीस हानिकारक आहे. अधिक पाऊस झाल्यास फुल आणि फळ यांची गळ होते.
लागवड करण्याची पद्धत:
लागवड करण्याआधी जमीनपूर्णपणे मशागत करून घ्यावी. दोन वेळा खोल नागरणी करावी व नंतर रोटावेटरच्या साह्याने ती माती मऊ करुण घ्यावी. नंतर सिमेंटचे पोल वरतीचोकोनी किवा गोल थाळी असावी एक ते दीड फुट रेडीअसचे असावेत. त्याची उंची साधारण सहा फुट असावी व ते पोल बसवत असताना जमिनीत तीन फुट खोल बसवावेत जेनेकरुण पिकाचे वजन वाढल्यानंतर ते हलणार नाहीत व प्रत्येक पोलखाली चार रोपे लावावीत व ती रोपे पोलच्या असणाऱ्या गोलमधुन बाहेर येईपर्यंत काळजी घ्यावी व व्यवस्थित नियोजन करावे. अश्या प्रकारे लागवड करावी.
जाती
याच्या जातींमध्ये खूप विविधता आढळते, त्यामध्ये याचे वर्गीकरण तीन प्रकारांत केले आहे.
-वरून लाल रंग आतील गर पांढरा.
-वरून लाल रंग आतील गर लाल.
-वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा.
-यामध्ये वरून लाल रंग आतील गर पांढरा ही जात भारतामध्ये प्रसिद्ध आहे.
अभिवृद्धी:
याची अभिवृद्धी हि कटिंग्स आणि बियापासून केली जाते. बियापासून अभिवृद्धी केल्यास झाडा-झाडामध्ये वेगवेगळे पणा दिसून येतो, त्यामुळे हि पद्धत प्रचलित नाही. म्हणून याच्या अभिवृद्धीसाठी व्यवसायिक दृष्ट्या कटिंग्स हि पद्धत वापरली जाते.
लागवडीसाठी वापरणारी रोपे:-
लागवडीसाठी वापरणारी रोपे हि रोगमुक्त व सशक्त घ्यावीत.
लागवडीचे अंतर:-
दोन झाडामधील साधारण अंतर दहा फुट असावे. दोन ओळीमधील अंतर वीस फुट असावे जेनेकरुण त्यात आपण कोणतेही आंतरपिक घेऊ शकतो.
दोन झाडामध्ये आपण शेवगा व पपई या सारखी पिके घेऊन उत्पन्न वाढवू शकतो.
या पपई व शेवगा याच्या सावलीमुळे ड्रगनची वाढ सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होते.
वाढ व आकारासाठी योग्य बांधणी:
ड्रगन फ्रुटची योग्य वाढीसाठी सिमेंटच्या पोलची अत्यंत आवश्यकता आहे व मर्यादित तीन ते चार मूळ खोडाची वाढ करावी व उपमुख्य खोडे हे व्यवस्थित प्रकारे नायलॉन दोरीने ने बाधावीत.
खत व्यवस्थापन
शेणखत व गाडूळखत याचा योग्य प्रकारे वापर केल्यास त्यांची वाढ अत्यंत चांगली होते. त्याचबरोबर रासायनिक खतांची आवश्यकता ही वाढीसाठी असते नत्र: स्फुरद: पालश याचा डोस हा पाने बघुन व्यवस्थित द्यावा व जेविक खतांचा वापर हा जास्त प्रमाणात करावा.
पाणी व्यवस्थापन:
या पिकाला पाणी हे कमी प्रमाणात लागते. त्यामुळे यासाठी जास्तीत जास्त ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा व फुल येण्यावेळी व फळ वाढीवेळी कोणत्याही प्रकारचा खताचा वापर हा करू नये. फक्त योग्यप्रकारे पाणी द्यावे. या पिकाला ठिबक सिंचन हे प्रभावी ठरते.
छाटणी करणे
लागवडीपासून 2 वर्षानंतर हलक्या प्रमाणात छाटणी करावी. रोगीट व वाकड्या-तिकड्या वाढलेल्या फांद्याची छाटणी करावी. 3 वर्षानंतर झाडाला छत्री सारखा आकार द्यावा. छाटणी केल्यानंतर छाटलेल्या फांदीला बुरशीनाशक लावावे.
उत्पादन-
फळाचे असणारे उत्पन्न हे एकरी दोन ते तीन टन अपेक्षित आहे. (झाडांच्या वयो मर्यादेवर ते अवलंबून आहे) हे फळ साधारण २५० ते ६०० ग्राम वजनाचे असते. प्रत्येक हंगामात एक झाड शंभरपेक्षा जास्त फळांचे उत्पादन देत असल्याने प्रति एकर एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
मिश्रपिके:-
1. ओळीमधील अंतर वीस फुट असल्याने तिथे आपण बटाटा, कांदा, टोमॅटो, भुईमुंग, अननस सारखी पिके होऊन उत्कृष्ट उत्पन्न काढू शकतो.
2. दोन झाडामधील अंतर दहा फुट असल्यास तिथे आपण पपई, शेवगा अशी उंच वाढणारी पिके घेऊन उत्पन वाढवू शकतो.
आरोग्यासाठी उपयोग:-
1. हे फळ मधुमेह नियंत्रित करते.
2. कोलेस्ट्रोल कमी करते.
3.दमा या आजारासाठी उपयुक्त.
3. शरीरातील प्लेटलेट पेशीची संख्या वाढते.
4. पोटांचा विकार कमी होतात.
5. संधीवातास उपयुक्त.
Published on: 16 July 2021, 04:18 IST