काही दिवसांपूर्वी सांगोला हा डाळिंबासाठी जगभरात ओळखला जात होता. असे असताना ही ओळख पुसण्याच्या मार्गावर आहे. सांगोल्याचे डाळिंब थेट सातासमुद्रापार असलेल्या युरोपच्या बाजारात भाव खात होते. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी देखील आली. तसेच महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असेही अनेकांनी म्हटले. आता मात्र परिस्थिती खुपच भयानक आहे. मात्र नैसर्गिक बदलामुळे डाळिंब बागा अडचणीत आल्याने निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्रातील डाळिंब बागा जळून गेल्या आहेत.
यामध्ये ५० हजार एकर वरील डाळिंब बागा तील निम्म्यापेक्षा जास्त बागा या खोडकिडीमुळे जाळून गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. तेल्या, कधी मर, कधी कुजवं आणि आता पिन होल बोअर अर्थात खोडकिडीमुळे डाळिंब बागा उध्वस्त होऊ लागल्या आहेत. यामुळे डाळींबाची शेती करणे अवघड झाले आहे.
यामुळे पूर्वीच्या तुलनेत केवळ २० टक्केच बागा उरल्या आहेत. या तालुक्यात डाळींबाची उलाढाल ही जवळपास ४ हजार कोटीवर गेली होती. आता मात्र कसे तरी 500 कोटी रुपयाचे उत्पन्न हाती लागणार आहे. यामुळेच वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता थेट बागांवर ट्रॅक्टर चालवण्यास सुरुवात केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात यामध्ये अजूनच घट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील डाळिंबाच्या एकूण उप्तादनापैकी जवळपास 25 टक्के हिस्सा असणाऱ्या सांगोला तालुक्यातून होत असे. मात्र आता यामध्ये बदल होत आहे. आता या रोगराईमुळे डाळिंब जर हद्दपार होत असेल तर कृषी विभागाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. यावर लवकरात लवकर काही केले नाही तर मात्र येणाऱ्या काळात डाळींब शेती पूर्णपणे बंद होईल.
येथील शेतकरी आता आंबा, पेरू, केळी अशा फळबागांकडे वळू लागले आहेत. डाळिंबाला पोषक असणारी मुरमाड जमीन, कोरडे हवामान, कमालीची उष्णता आणि पाण्याची कमतरता यामध्ये डाळिंबातून पूर्वी लाखो रुपये मिळविले आहेत. आता मात्र या पिकांमधुन शेतकऱ्यांना उत्पादन मिळेल की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. अनेक शेतकरी याठिकाणी डाळींबाच्या शेतीत तरबेज मानले जात होते.
महत्वाच्या बातम्या;
महावितरणच्या थकबाकीत पश्चिम महाराष्ट्र पहिल्या नंबरवर, थकबाकीचा आकडा वाचून व्हाल थक्क..
मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करणारांना मोठा धक्का! डिझेलच्या दरात 25 रुपयांनी वाढ..
म्हणाले होते सगळ्यांचा ऊस तोडणार आता १३ कारखान्यांची धुराडी बंद, आता ऊस तोडणार तरी कोण?
Published on: 22 March 2022, 12:34 IST