संत्रा पिकामध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल ते मे महिन्यामध्ये बागेचे पाणी देणे थांबवले जाते व पानगळ करून झाडांना ताण दिला जातो. संत्रा पिकामध्ये मृग बहार घेण्यासाठी विद्यापीठे तेव्हा राष्ट्रीय लिंबूवर्गीय पीक संशोधन केंद्र इत्यादींच्या शिफारशीनुसार अन्नद्रव्य व खत व्यवस्थापन केल्यानंतर साधारण 10 सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये संत्रा फळांचे आकारमान वाढून फळांचा रंग पक्वतेच्या वेळी पिवळसर होण्यास सुरुवात होताना दिसत असते. सर्वाधिक फळांची गळ सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या वेळी पहावयास मिळते.
या फळगळ होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रसशोषक पतंगाचा वाढता प्रादुर्भाव हा असतो. जवळ जवळ दहा ते 15 टक्के फळ गळ या किडीमुळे होते.
रसशोषक पतंग – ओळख
संत्रा रस शोषक पतंगाच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यामुळे नुकसान करणाऱ्या ओथोरीस फुलोनिया आणि ओथॉरिसमेटरनाआणिओयोरीस होमीना इत्यादी प्रजातींची नुकसान क्षमता सर्वाधिक आहे. संत्रा फळ शोषक पतंग शरीराने मोठ्या व मजबूत आकाराचा असतो.
पतंगाच्या पंखांचा विस्तार साधारणता एक सेंटीमीटर पर्यंत आढळतो. पतंगाच्या पुढच्या पंखाच्या जोडीचा रंग तपकिरी किंवा हिरवा आढळतो आणि मागील जोडी चा रंग पिवळसर, नारिंगी असतो आणि पंखाच्या जोडीवर काळसर डाग व पट्टे आढळतात.
पतंगाची नुकसान क्षमता
रसशोषक पतंग किड संत्रा पिकामध्ये रात्रीच्यावेळी प्रादुर्भाव करीत असते. पतंग सोंडेच्या साहाय्याने फळांमधील रस शोषून घेत असते. पतंगाच्या प्रादुर्भाव फळ पक्वतेच्या वेळी सर्वाधिक आढळतो.
पतंग आणि सोंड खूप असल्याच्या ठिकाणी फळालाक्षीद्र पडते आणि त्याठिकाणी बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोग कारकांचा शिरकाव होऊन फळ सड आढळून येते व फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते.
कसे करावे या पतंगाचे नियंत्रण?
- संत्रारसशोषकपतंगकिडीसाठीसंत्रा पिकाच्या व्यतिरिक्त असलेल्या यजमान गवतांचा नाश करावा. उदाहरणार्थ भीर,बाऊची इत्यादी यजमान गवतावर ही कीड राहते.
- फळ पक्वतेच्या वेळी बागेच्या चारही कोपऱ्यामध्ये तसेच मध्यभागी एक मर्क्युरी प्रकाशाचे दिवे लावावे आणि दिव्यांच्या खाली पसरट भांड्यामध्ये केरोसीन ओतूनठेवावे.
- पक्वतेच्या वेळी शक्य असल्यास फळांना कागदाने झाकून टाकावे.
- फळ हिरवे रंगांमधून पिवळसर रंगांमध्ये रूपांतर होत असताना 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फळ तोडणी होईपर्यंत निंबोळी तेल दहा मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- साधारणतः सायंकाळच्या वेळी दोन तासासाठी बागेच्या बांधावर गवत पेटवून धूर करावा.
- निंबोळी तेल पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी केल्यानंतर देखील प्रादुर्भाव दिसत असल्यास फॅनप्रोप्याथिन(5 टक्के ) फोक्सिम(25 टक्के) इसी (मेयोथरीन) 2 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
Published on: 25 August 2021, 09:59 IST