Horticulture

स्ट्रॉबेरी तसे पाहिले तर थंड हवामानातील पीक आहे. स्ट्रॉबेरीची लागवड ही ठराविक ठिकाणी होत असते. पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीच्या फळाभोवती आकर्षणाचे वलय निर्माण झाले आहे.

Updated on 15 December, 2021 1:18 PM IST

स्ट्रॉबेरी तसे पाहिले तर थंड हवामानातील पीक आहे. स्ट्रॉबेरीची लागवड ही ठराविक ठिकाणी होत असते. पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीच्या फळाभोवती आकर्षणाचे वलय  निर्माण झाले आहे.

कारण या फळाचे नाविन्य, त्यातील पोषणमूल्य आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली चांगली मागणी यामुळे भारताचा स्ट्रॉबेरी खालील क्षेत्रात वाढ होत आहे. या लेखात आपण स्ट्रॉबेरी लागवड व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती घेऊ.

 स्ट्रॉबेरी साठी लागणारी जमीन

 स्ट्रॉबेरीचा उत्तम वाढीसाठी पाण्याचा निचरा होणारी, हलकी, मध्यम काळी तसेच वालुकामय पोयटा आणि गाळाची जमीन असावी.जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक 5.5 ते 6.5 या दरम्यान योग्य असतो.भुसभुशीत वालुकामय जमिनीत स्ट्रॉबेरीचे रोपांची मुळे जोमाने वाढतात.

 स्ट्रॉबेरी पिकासाठी अनुकूल हवामान

या पिकासाठी थंड हवामान चांगले मानवते.हिवाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या दिवसात दहा अंशते 25 अंश सेंटिग्रेड तापमानातस्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी होते तसेच उष्ण हवामानात20 ते 25 अंश सेंटिग्रेड असेल तर फुलनिर्मिती होऊन फळधारणा दीर्घकाळ चालू राहते.यासाठी जास्त काळथंडी मिळाली तर उत्तम असते.

स्ट्रॉबेरी पिकाची लागवड पद्धत

या पिकाची गादीवाफ्यावर 60 बाय 30 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी. स्ट्रॉबेरीची मुळे मातीच्या वरच्या पंधरा ते वीस सेंटीमीटर पर्यंत थरात वाढतात.स्ट्रॉबेरीच्या चांगल्या वाढीसाठी मऊ आणि भुसभुशीत गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड दोन ओळी, तीन ओळी अथवा चार ओळी पद्धतीने सुद्धा केली जाते.त्यानुसार योग्य आकाराचे वाफे तयार करावेत. दोन ओळी पद्धतीसाठी 90 सेंटिमीटर रुंद व 30 ते 45 सेंटिमीटर उंची असलेल्या  एका दिवसावर दोन रोपातील अंतर 30 सेंटिमीटर व दोन ओळींतील अंतर 60 सेंटिमीटर असावे. दोन ओळी पद्धतीत प्रति एकर 22 ते 25 हजार रोपे लागतात. तीन ओळी पद्धतीसाठी 120 सेंटिमीटर रुंद व 30 ते 45 सेंटिमीटर उंचीचे गादी वाफे करावेत. चार ओळी पद्धतीने लागवड होत असली तरी अंतर मशागत, फळ तोडणी, गादीवाफ्यात प्लास्टिक मल्चिंग करणे यामध्ये अडचणी येत असल्याने प्रामुख्याने दोन ओळी पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते.

स्ट्रॉबेरी साठी खत व्यवस्थापन

 या पिकाची लागवड करतानाजमिनीत कुजलेल्या शेणखताचा जास्त वापर करावा.40 ते 50 टन तसेच एकरी दीडशे किलो युरिया,200 किलो सुपर फॉस्फेट आणि 100 किलो पोटॅश द्यावे.त्यातली 200 किलो सुपर फॉस्फेट,50 किलो पोटॅश आणि 50 किलो युरिया लागवडीच्या वेळी द्यावे.50 किलो पोटॅश 45 दिवसांनी द्यावे.तसेच विद्राव्य खते ठिबक सिंचन मधून द्यावे. ठिबक सिंचन मधून दिली जाणारी खते रोपांची चांगली वाढ होण्यासाठी 19:19:19 या विद्राव्य खताची मात्रा ठिबकद्वारे एक दिवसाआड दोन ते तीन किलो द्यावे.तसेच 0:52:34 या खताची 15 लिटर च्या पंपाला 40 ग्रॅम घेऊन फवारणी करावी त्यामुळे फळांचा आकार वाढीसाठी मदत होते.

 स्ट्रॉबेरी साठी पाणी व्यवस्थापन

 स्ट्रॉबेरी पिकात जास्त पाणी लागत नाही. तसेच जास्त काळ ओलावा राहिलास रोपांची मर आणि फळकुज होते. म्हणून पिकाच्या आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे.

तसेच पाण्याचा फूल व फळ धारणेच्या वेळी ताण पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. रोपांची लागवड झाली की दोन ते तीन दिवस रोज पाणी द्यावे. नंतर जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे.

 स्ट्रॉबेरी वरील रोग नियंत्रण

  • पानावरील ठिपके- यासाठी उपाय म्हणून रिमोन 25 ते 30 मीली घेऊन फवारणी करावी.
  • ठीपके फळकुज- या रोगामध्ये फळांची कुज होऊन ते सडतात.

उपाय- बाविस्टीन 40 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

 स्ट्रॉबेरीचे उत्पादन व काढणी

 स्ट्रॉबेरीची पक्व झालेली फळे काढून पारदर्शक प्लास्टिकच्या कोरोगेटेड बॉक्स मध्ये प्रतवारी करून पॅकिंग करावे. साधारणपणे एका झाडापासून चाळीस ते पन्नास फळे येतात व सर्व साधारण आठ ते 12 टन उत्पादन मिळते.

English Summary: the management of strawberry cultivation for more profit
Published on: 15 December 2021, 01:18 IST