Horticulture

आंबा हा भारताचे राष्ट्रीय फळ आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, इतकेच नाही तर आंबा हे शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्वाचे फळपीक आहे. आता शेतकरी फक्त पारंपरिक पिकच घेत नाहीत तर आता शेतकऱ्यांचा कल हा फळबाग कडे हळूहळू झूकू लागला आहे. आता अनेक शेतकरी द्राक्षे, डाळिंब, पपई, आंबा इत्यादी फळबागांची लागवड करण्यासाठी आपला इन्टेरेस्ट दाखवत आहे.

Updated on 14 September, 2021 11:30 AM IST

आंबा हा भारताचे राष्ट्रीय फळ आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, इतकेच नाही तर आंबा हे शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्वाचे फळपीक आहे. आता शेतकरी फक्त पारंपरिक पिकच घेत नाहीत तर आता शेतकऱ्यांचा कल हा फळबाग कडे हळूहळू झूकू लागला आहे. आता अनेक शेतकरी द्राक्षे, डाळिंब, पपई, आंबा इत्यादी फळबागांची लागवड करण्यासाठी आपला इन्टेरेस्ट दाखवत आहे.

आणि फळांची मागणी बाजारात नेहमीच असते विशेषतः आंब्याची मागणी ही खुप जास्त असते, म्हणुन जरी आंबा लागवडीचे क्षेत्र वाढले असले तरी आंबासाठी खुप मोठी बाजारपेठ देखील आहे. भारतामध्ये आंब्याच्या दसहरी, मलिहाबाद, अल्फोन्सो किंवा केसर, इतर अनेक अतिशय चांगल्या चवदार जाती आहेत ज्या आपल्या सर्वांना माहित असणे आवश्यक आहे, कारण आंब्याच्या लागवडीची वेळ निकट आली आहे. आंबा लागवड करण्यापूर्वी, आंब्याच्या विविध जाती माहित असणे आवश्यक आहे.

जाणुन घ्या आंब्याच्या टॉपच्या जाती.

•अल्फान्सो - महाराष्ट्राची शान असे म्हटले तरी काही हरकत नाही कारण ही वाण महाराष्ट्रात जास्त लावली जाते आणि ह्या जातीला महाराष्ट्राचे वातावरण खूपच पसंत आहे. साहजिकच ही महाराष्ट्र राज्याची प्रमुख व्यापारी वाण आहे आणि देशातील सर्वात पसंतीची वाण आहे. ही वाण वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. बदामी, गुंडू, खादर, अप्पा, हाप्पू आणि कागदी हापूस.

  या जातीची फळे मध्यम आकाराची, अंडाकृती आयताकृती आणि केशरी-पिवळ्या रंगाची असतात.  फळांची गुणवत्ता उत्कृष्ट असते. ही जात पेट्या पॅक करण्याच्या हेतूसाठी चांगले असल्याचे आढळून आले आहे. ही जात प्रामुख्याने ताजे फळ म्हणून इतर देशांमध्ये निर्यात केले जाते, ही मध्य-हंगामातील जात आहे.

•मंकुरद: आपल्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात व आपले शेजारी राज्य गोव्यात यांची लागवड मोठया प्रमाणात केली जाते.या जातीचे महाराष्ट्रात आणि गोव्यात व्यापारी महत्त्व आहे.

पावसाळ्यात या जातींच्या फळांच्या सालीवर काळे डाग तयार होतात. फळे मध्यम आकाराची, अंडाकृती आकाराची आणि पिवळ्या रंगाची असतात. फळांची गुणवत्ता खूप चांगली असते पण फळे लवकर खराब होतात. ही मध्य-हंगामातील जात आहे.

 दशहरी: या जातीचे नाव लखनौजवळील दसहरी गावाच्या नावावरून पडले आहे असे सांगितले जाते. ही उत्तर भारतातील एक प्रमुख व्यापारी तत्वावर पिकवली जाणारी वाण आहे आणि आपल्या देशातील सर्वोत्तम जातींपैकी एक आहे.

या जातीच्या फळाचा आकार लहान ते मध्यम, आयताकृती असतो आणि फळाचा रंग पिवळा असतो. फळांची गुणवत्ता उत्कृष्ट असते आणि फळे टीकायला चांगले असतात. ही मध्य-हंगामाची वाण आहे.

केशर: ह्या जातीच्या फळावर लालसर लाली असते. ही गुजरातची एक प्रमुख जात आहे. फळे मध्यम आकाराची, आयताकृती असतात आणि चांगला बहार लागतो.

English Summary: the kind of mango benificial for farmer
Published on: 14 September 2021, 11:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)