Horticulture

आपल्याला माहित आहेच कि पिकांच्या वाढीसाठी नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्य महत्त्वाचे आहेत. यांच्या उपलब्धतेसाठी निसर्गात कार्यरत जीवाणूंचा वापर करणे शक्य आहे.प्रयोगशाळेमध्ये वाढ करून,योग्य अशा वाहका मध्ये मिसळून जिवाणू खते तयार केले जातात

Updated on 03 February, 2022 1:51 PM IST

आपल्याला माहित आहेच कि पिकांच्या वाढीसाठी नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्य महत्त्वाचे आहेत. यांच्या उपलब्धतेसाठी निसर्गात कार्यरत जीवाणूंचा वापर करणे शक्य आहे.प्रयोगशाळेमध्ये वाढ करून,योग्य अशा वाहका मध्ये मिसळून जिवाणू खते तयार केले जातात

.बीज प्रक्रिया वेळी अत्यंत कमी प्रमाणात वापरली असता पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत रासायनिक खतांची बचत होते.  या लेखात आपण काही जिवाणू खतांचे प्रकार व महत्त्व जाणून घेऊ.

 जिवाणू खतांचे महत्वाचे प्रकार

  • अझोटोबॅक्टर- या जीवाणूचा शोध 1901 मध्ये सर्वप्रथम बायजेरीकिया या शास्त्रज्ञाने लावला.हे जिवाणू शेंगवर्गीय पिके वगळता इतर एकदल व तृणधान्ये पिकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने नत्रवायू चे अमोनियात रूपांतर करतात. त्यामुळे नत्र पिकांना उपलब्ध होते.ज्वारी,बाजरी, ऊस,गहू, मका,कांदा,बटाटा, सूर्यफुलवांगी,मिरची तसेच फुलझाडे व फळझाडांसाठी वापरावे.
  • अझोस्पिरिलम( सहजीवी)- हे जिवाणू तृणधान्यांच्या व भाजीपाला पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती राहुनसहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करते. हे अझोटोबॅक्टर पेक्षा अधिक कार्यक्षम असून दीड ते दोन पट अधिक प्रमाणात नत्रपिकांना उपलब्ध करून देतात.हे प्रामुख्याने ज्वारी पिकाचा पेरणीच्या वेळी बीजप्रक्रियेसाठी वापरतात.
  • बायजेरिकिया (असहजीवी)- हे जिवाणू मुख्यतः आम्लधर्मी जमिनीत आढळतात. शेंगवर्गीय पिके वगळून एकदल व तृणधान्ये पिकासाठी वापरतात.
  • रायझोबियम- हे सहजीवी जीवाणू द्विदलवर्गीय वनस्पतीच्या मुळावर गाठी करून राहतात.हे जिवाणू अन्नवनस्पती कढुन घेतात.वनस्पतीच्या मुळावर ग्रंथीनिर्माण करतात. 

या ग्रंथीद्वारे हवेतील मुक्त नायट्रोजनचे स्थिरीकरण करूनअमोनिया च्या रूपाने पिकास उपलब्ध करतात.पिकांच्या मुळांवरील एका गाठीत लाखो जिवाणू असतात. पूर्ण वाढलेल्या गाठी लोह हिमोग्लोबिन मुळे गुलाबी दिसतात.या जीवाणूंना रोपा शिवाय स्वतंत्रपणे नत्र स्थिर करता येत नाही. म्हणून त्यांना सहजीवी जीवाणूम्हणतात. हे जिवाणू खत फक्त द्विदल / शेंगवर्गीय पिकांसाठी उपयुक्त असतात. वेगवेगळ्या पिकांसाठी ठराविक प्रकारचे रायझोबियम गटाचे जिवाणू खत वापरावे लागत.

English Summary: the important of becterial fertilizer and crucial in growth in crop
Published on: 03 February 2022, 01:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)