Horticulture

आधुनिक शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे.शेतीमध्ये विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो.या आधुनिक शेतीचा जास्त महत्त्वाचा भाग आहेत ते म्हणजे संजीवके.संजीवके बाजारामध्ये वेगवेगळ्या नावांनी मिळतात.

Updated on 06 December, 2021 5:25 PM IST

आधुनिक शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे.शेतीमध्ये विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो.या आधुनिक शेतीचा जास्त महत्त्वाचा भाग आहेत ते म्हणजे संजीवके.संजीवके बाजारामध्ये वेगवेगळ्या नावांनी मिळतात.

.संजीवकांचा योग्य प्रकारे वापर केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते. वनस्पतींच्या अंतर्गत शारीरिक किती असतात त्या क्रियांवरबाबा ठेवणारी काही रासायनिक द्रव्ये नैसर्गिक रित्या वनस्पतींमध्ये तयार होत असतात. या द्रव्यांना संजीवके किंवा वनस्पती वृद्धी संप्रेरके या नावाने ओळखलेजाते.या लेखात आपण संजीवकांचे काही महत्त्वाचे प्रकार जाणून घेणार आहोत.

 संजीवकांच्या प्रकार

  • ऑक्सिन्स- याच्या वापरामुळे वनस्पतींच्या पेशींची लांबी वाढते.कलम करताना आपण वेगवेगळ्या वनस्पतींच्या पेशींना एकजीव करण्याचा प्रयत्न करतो. विविध प्रकारचे फळपिके,विविध शोभेच्या झुडपांच्या व फळझाडांची अभिवृद्धी मध्येऑक्सिनचावापर करता येतो. पिकाच्या पानांवर व फळांवर ऑक्सिनचीची फवारणी केल्यामुळे फळांची व पानांची आकाळी गळती टाळता येते. वनस्पतींच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी तसेच मुळांच्या संख्येत गुणात्मक वाढ करण्याकरिता अंजीर,सफरचंद,अननस,गुलाब,चहा इत्यादी झाडांच्या छाट कलमान्नामुळे फुटण्यासाठी याचा वापर केला जातो.2,4- डी आणि एन ए ए च्या वापरामुळे टोमॅटो,वांगीयांचे फळधारणा सुधारण उत्पन्न वाढते.
  • सायटोकायनिन्स-या संजीवकाचा मध्ये वनस्पती पेशी विभाजनाची क्षमता आहे.वनस्पतींच्या पेशींची वृद्धावस्था टाळणे, बिजांकुरणा साठी बीजांची सुप्तावस्था लवकर संपते.प्रकाश संश्लेषण योग्य प्रकारेहोण्याच्या कामी सायटोकायनिन उपयोगी ठरते.
  • जिबरेलिन- या संजीवकाचा मध्ये वनस्पतीच्या पेशी विभाजन करण्याचीव त्यांची लांबी वाढवण्याचे अथवा या दोन्ही क्रिया करण्याची क्षमता आढळते. बीजाची सुप्तावस्था मोडण्यासाठी जिबरेलिन गटातीलसंजीवअका मध्ये बिया काही काळ भिजवल्यास बियांची उगवण चांगली व लवकर झालेली आढळते. वाढीचा वेग वाढवणे तसेच बिया विरहित फळप्राप्त करण्यासाठी जिबरेलिन उपयोगी आहे. काकडी वर्गीय पिकांमध्ये फळधारणेसाठी स्त्रीलिंगी फुलापासून फळे मिळतात म्हणून पुल्लिंगी फुलांचे प्रमाण व वाढ कमी करून स्त्रीलिंगी फुलांची संख्या अधिक प्रमाणात व लवकर आणण्यासाठी100 पीपीएम जिब्रेलिक आम्ल वापरतात.

वाढरोधक संप्रेरके

 1-ॲवसिसीक ॲसिड-हे वाढ रोधक संप्रेरक आहे.याच्या वापराने पेशींना वृद्धावस्था येतो.अति प्रखर उन्हात पानगळ करूनबास्फोश्वासथांबवून पाण्याची बचत करण्यासाठी हे फायदेशीर आहे.

2- इथिलीन- हे वाढ रोधक संप्रेरक आहे. वनस्पती मधील इतर संप्रेरकापैकी फक्त इथिलिननैसर्गिक स्थितीत वायुरूपात असते. फळांचा परिपक्व होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी( फळे लवकर पिकवण्यासाठी)हे उपयोगी आहे.

English Summary: the importancce of crop analeptic for all type of crop and orchred
Published on: 06 December 2021, 05:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)