Horticulture

सीताफळ हे अत्यंत काटक, हलक्यात मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारी आहे.तसेच दुष्काळातही तग धरून राहते. वातावरणातील बदल पाहता दिवसेंदिवस पर्जन्यमानात कमी-जास्त बदल होत आहेत. परंतु या पर्जन्यमानाचा, वातावरणाचा सिताफळा वर कुठलाही परिणाम होत नाही

Updated on 14 October, 2021 12:24 PM IST

सीताफळ हे अत्यंत काटक, हलक्‍या मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारी आहे.तसेच दुष्काळातही तग धरून राहते. वातावरणातील बदल पाहता दिवसेंदिवस पर्जन्यमानात कमी-जास्त बदल होत आहेत. परंतु या पर्जन्यमानाचा, वातावरणाचा सिताफळा वर कुठलाही परिणाम होत नाही

.सिताफळाची लागवड भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र,कर्नाटक,राजस्थान,तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते.या लेखात आपण सिताफळाच्या महत्त्वाच्या पाच जातीपाहणार आहोत.

 सिताफळाच्या महत्त्वाच्या पाच जाती

  • धारूर-6- मराठवाडा कृषी विद्यापीठाने मराठवाडा विभागाच्या लागवडीसाठीप्रसारित केलेली ही एक प्रमुख जात आहे. या जातीची फळे आकाराने मोठी असून गराचे प्रमाण यामध्ये चांगल्याप्रकारे असते.तसेच विद्राव्य घटकांचे प्रमाण खूप जास्त आहे.इतर जातींच्या तुलनेने फळांची गोडी अधिक असून साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे.
  • टी. पी.-7-सीताफळाची ही जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्ष 2000 मध्ये शिफारशीतकेली आहे. या जातीच्या फळाचे वजन 400 ते 500 ग्रॅम आहे. यातील विद्राव्य घटकांचे प्रमाण 48 टक्के असून गराचे प्रमाण 55 टक्के आहे. या जातीची फळे हिरव्या रंगाची असून याचे प्रमाण खूप कमी आहे.प्रत्येक झाडापासून 70 ते 100 फळे उत्पादन मिळते.
  • बाळानगर- महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली व आंध्र प्रदेशात विकसित केलेली ही जातआहे. या जातीच्या फळाचे सरासरी वजन 266 ग्रॅम असून गराचे प्रमाण 48 टक्के असून प्रत्येक झाडापासून 50 ते 60फळे मिळणे अपेक्षित आहे. फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण आणि 27 टक्के असून बियांचे प्रमाण हे तीन टक्केएवढे आहे.
  • अर्का सहान- सीताफळाची जात भारतीय बागवानी संस्था बंगलोर येथे विकसित केली गेली आहे.या जातीची फळे दिसायला आकर्षक गोलाकार असून फळांचा रंग फिक्कट हिरवा तर डोळे पसरट चपटे असतात. फळाचे वजन 400 ते 500 ग्रॅम असून गराचे प्रमाण 48 टक्के आहे.या जातीची फळे फारच गोड असतात तसेच बियांचे प्रमाण खूपच कमी असून आकाराने लहान असतात फळांवरील दोघांमधील अंतर कमी असल्यानेपिठ्या ढेकूण या किडीचे प्रमाण कमी आढळते. इतर जातींपेक्षा या जातीची फळे अधिक काळ टिकतात.
  • फुले पुरंदर-फुले पुरंदर ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सन 2014 मध्ये महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केली आहे.या जातीची फळे आकर्षक, आकाराने मोठी असून फळाचे वजन हे 360 ते 388 ग्रॅम असून गराचे प्रमाण हे 45 ते 48 टक्के आहे.प्रत्येक झाडापासून 118 ते 154 फळांचे उत्पादन मिळते.फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण 22 ते 24 टक्केआहे.फळे घट्ट रसाळ, आल्हाददायक असतो.गराच्या पाकळ्या पांढरीशुभ्र असून त्यांची संख्याही जास्त आहे.फळात बियांची संख्या अतिशय कमी असूनया जातीच्या फळांचागरा पासून तयार केलेल्या रबडी ला जास्त मागणी आहे.
English Summary: the five benificial veriety of custerd apple
Published on: 14 October 2021, 12:24 IST