पूर्वी च्या काळी अन्न प्रक्रिया व्यवसायात निर्जंतुकिकरण निर्जलीकरण आणि गाळप या विविध प्रक्रिया कराव्या लागत होत्या. या पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी खूप वेळ लागतो.येत्या च्या काळी या विभागात सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली येत आहे. त्यातील एक नवीन तंत्रज्ञान म्हणजे कंपित विद्युत प्रभाव क्षेत्र प्रक्रिया होय.
अमेरिका, कॅनडा, युरोप, चीन आणि युरोपियन देशामध्ये बटाटा प्रक्रिया उद्योजक उष्णता म्हणजे गरमी देण्यासाठी ही पर्यायी पद्धत वापरत आहेत.या प्रकियेमुळे पदार्थाच्या प्रक्रियेत सच्छिद्रता येते त्यामुळं कमी पाण्यामध्ये शुद्ध याची प्रक्रिया योग्य प्रकारे होते. या प्रक्रियेमुळे प्रक्रिया केलेल्या पदार्थाची गुणवत्ता ढासळत नाही. त्याचबरोबर त्यामध्ये असलेले जीवनसत्वाचे प्रमाण सुद्धा कमी होत नाही.इंग्लिश भाषेत याला पल्सड इलेक्ट्रिक फील्ड प्रोसेसिंग असे म्हणतात. या तंत्रामध्ये फळे आणि भाज्यांचे तापमान न कमी करता पेशींचे कंपन केले जाते.
कंपित विद्युत प्रभावक्षेत्र या तंत्राचा वापर करून ही कामे शक्य होतात:-
- या तंत्रामुळे स्नायू आणि द्रव रूपातील पदार्थ वेगवेगळे मिळवता येतात. उदारणार्थ दारू निर्मिती,फळातून सुक्रोज मिळवणे, किंवा टाकाऊ पासून नवीन खाद्य लायक पदार्थ बनवणे.
- बटाट्याचे तुकडे करणे आणि ते फ्रीझिंग आणि द्राय करणे.
- पदार्थ गोठवून ठेवणे आणि साल काढण्याची प्रक्रिया.
कंपित विद्युत प्रभावक्षेत्र प्रक्रिया या तंत्राचे फायदे:-
- फूड प्रक्रिये मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते.
- प्रक्रियेचा वेग मोठ्या प्रमाणात वाढतो.
- अन्नपदार्थाचा दर्जा सुधारतो.
- प्रक्रिया करताना पदार्थाचे किंवा घटकांचे प्रमाण कमी ठेवता येते.
जाणून घ्या,कार्य कश्या प्रकारे होते:-
- या प्रक्रियांमध्ये 100 किलो वॅट प्रत्येक सेमिपेक्षा कमी प्रमाणात विद्युत प्रवाह दोन इलेक्टरो मध्ये ठेवलेल्या पदार्थावर सोडला जातो. त्यामुळं फूड प्रक्रियेसाठी लागणार वेळ हा 1 सेकंडपेक्षा ही कमी वेळेत प्रक्रिया पूर्ण होते.
- हे तंत्र विकसित झाले असले तरी याचा जास्त ठिकाणी उपयोग होत नाही. या तंत्राचा उपयोग फक्त बटाटा प्रक्रियेसाठी वापरले जाते.
साठवण कालावधीत वाढ:-
- अन्न प्रक्रिया उद्योगामुळे एक पदार्थ जास्त वेळ आहे तसा आणि योग्य प्रकारे अन्न ठेवता येते. त्यामुळे हे खूप फायदेशीर आहे.
- फळांपासून तयार केलेली रस, प्युरी,स्मूदिज यांच्या साठवण्याचा काळ वाढवण्यासाठी उच्च विद्युत प्रभाव क्षेत्र आणि कंपणाची गरज खूप आवश्यक असते.
- कंपित विद्युत प्रभावक्षेत्र प्रक्रियाचा वापर अनेक ठिकानी होऊ लागला आहे. भाजीपाला ,फळांचे रस, मुरब्बे अश्या अनेक प्रक्रियेत याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. फूड प्रक्रिया उद्योगात हे तंत्रज्ञान खूपच आवश्यक आणि महत्वाचे आहे.
Published on: 23 June 2021, 08:49 IST