Horticulture

जर आपण सध्या तरुणाईचा ओढा पाहिला तर बऱ्यापैकी आता शेतीकडे वळताना दिसत आहे. परंतु तरुणांच्या मनामध्ये जे काही परंपरागत पद्धत आणि पिके आहेत, त्यांना तिलांजली देऊन आधुनिक पद्धतीने शेती करून नवनवीन पिके घेण्याकडे कल आहे. जर सध्याची परिस्थिती पाहिली तर जास्तकरून तरुणाई फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे. परंतु फळबाग लागवड करताना कोणत्या फळबागाचे लागवड करावी हे जेवढे महत्त्वाच्या आहे.

Updated on 24 September, 2022 12:36 PM IST

जर आपण सध्या तरुणाईचा ओढा पाहिला तर बऱ्यापैकी आता शेतीकडे वळताना दिसत आहे. परंतु तरुणांच्या मनामध्ये जे काही परंपरागत पद्धत आणि पिके आहेत, त्यांना तिलांजली देऊन आधुनिक पद्धतीने शेती करून नवनवीन पिके घेण्याकडे कल आहे. जर सध्याची परिस्थिती पाहिली तर जास्तकरून तरुणाई फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे. परंतु फळबाग लागवड करताना कोणत्या फळबागाचे लागवड करावी हे जेवढे महत्त्वाच्या आहे.

त्यासोबतच  आपण लागवड करत असलेला फळबाग नेमका कोणत्या जमिनीत चांगला येईल? याचा विचार करणे देखील खूप गरजेचे असते. याबाबतीत आपण द्राक्ष बागाचा विचार केला तर याच्या लागवडीसाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची काळजी घ्यावी लागते व याची माहिती आपण या लेखात बघू.

नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो तंत्रशुध्द पध्दतीने ज्वारीची लागवड करा; मिळेल अधिक उत्पन्न

 या गोष्टींचा अभ्यास महत्त्वाचा

 द्राक्ष लागवडीची निवडच का महत्वाची हे आपण काही गोष्टींच्या आधारे समजू….

1- तुम्ही द्राक्षबागांचे लागवड केली तर पहिले पीक साधारणतः दीड वर्षात हातात येते.

2- एकदा द्राक्षाची लागवड केली तर कमीत कमी दहा वर्षापर्यंत एक चांगला आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत मिळणे शक्य आहे.

3- द्राक्ष बागेत वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे कामे असतात त्यामुळे मजुरांच्या हाताला देखील वर्षभर काम उपलब्ध होते.

4- आपल्या जवळ उपलब्ध असलेले पाणी, जमीन आणि मनुष्यबळ यांचा चांगल्या पद्धतीने मेळ घालता येतो.

5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे द्राक्षबाग हे एक प्रतिष्ठितपणाचे  तसेच अभ्यासूपणाचे द्योतक आहे.

लागवड करायची परंतु सुरुवातीला किती क्षेत्रात?

 हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असून यामध्ये द्राक्ष बाग लागवड करण्याआधी आपली एकूण जमीन किती आहे? ती बागायत आहे का? इत्यादी गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे द्राक्ष बागेची लागवड करताना 34 / 37/42/46 गुंठे असे अडनिड क्षेत्र निवडू नका.

 द्राक्ष बाग नेमकी कोणत्या ठिकाणी लावावी?

 समजा बऱ्याचदा जमिन एका ठिकाणी नसते तर ते दोन ते तीन ठिकाणी असते तर अशावेळी एकाच कुठल्यातरी ठिकाणांची निवड करणे अपेक्षित असते.

जमिनीची निवड करताना त्या जमिनीचे क्षेत्र, या जमिनीचा सुपीकता व त्या जमिनीला असलेल्या पाणीपुरवठा साधनांची सोय व वाहतुकीसाठी रस्ता इत्यादी बाबींचा विचार करणे खूप गरजेचे आहे.

नक्की वाचा:Custerd Apple: सिताफळ लागवडीचा प्लान असेल तर 'या'चार जाती नक्कीच ठरतील शेतकऱ्यांसाठी वरदान

 द्राक्ष बाग नेमकी कोणत्या वेळी लावावी?

 द्राक्ष बागेची लागवड तुम्ही कधीही करू शकतात. परंतु काही अपवाद वगळता मध्य ऑक्टोबर ते जानेवारीच्या मध्यात तुम्ही लागवड करू शकतात. जर तुम्ही डिसेंबर, जानेवारीत लागवड केली तर अधिक यशस्वी होते व पहिले पीक 15 महिन्याच्या आत हातात देऊ शकते.

 द्राक्ष बाग लावताना द्राक्ष जातींची योग्य निवड

 या जाती प्रचलित आहेत त्यामधून निवड करणे उत्तम असते. नवीन द्राक्ष बाग लागवड करताना नवीन, पहिल्यांदा माहीत असलेली द्राक्ष जात लावू नये. प्रचलित जातींपैकी थॉमसन सीडलेस, सोनाका, माणिक चमन, शरद सीडलेस इत्यादी जातींची निवड महत्त्वाची ठरते.

 लागवड किती अंतरावर करावी?

 द्राक्षांची लागवड करताना दोन ओळीत आठ फूट व दोन वेलीत सहा फूट अंतर असणे गरजेचे आहे. रूट स्टॉक वापरायचा असेल तर दोन ओळींत बारा फूट आणि दोन वेलीत 8 फूट अंतर ठेवावे.

लागवड खड्डे खोदून करावी की चरात?

 द्राक्ष लागवडीसाठी खड्डे यापेक्षा चरांची निवड करणे फायद्याचे असते. चर पद्धती सर्व प्रकारच्या जमिनीसाठी उपयुक्त आहे.

चराचे माफ घेताना तुमच्या जमिनीचा प्रकार कसा आहे यावर ते सगळे अवलंबून असते. याची रुंदी दोन फूट  व खोली अडीच फूट किंवा रुंदी अडीच फूट व खोली दोन फूट ठेवावी. जमिनीच्या उतारानुसार चराची लांबी ठरवणे गरजेचे असते. साधारणतः ती शंभर फुटांपेक्षा जास्त असू नये.

 चरात कोणती खते द्यावीत?

 यासाठी तुमच्या जमिनीचा पोत व तुमच्या जमिनीचा माती परीक्षण अहवाल यांचा विचार करावा. परंतु तरीही खतांचा विचार केला तर चांगले कुजलेले कंपोस्ट खत बारा टन, जिवाणू युक्त सेंद्रिय खते पाचशे ते एक हजार किलो, कडू पेंड पाचशे ते एक हजार किलो व त्यासोबतच हिरवळीचे खत एका एकरातील एका एकरासाठी वापरावे.

नक्की वाचा:Mango Cultivation: आंबा लागवडीसाठी वापरा 'ही'पद्धत, मिळवा कमी क्षेत्रात भरपूर उत्पादन

English Summary: take precaution to before cultivate grape orchred and get more benifit
Published on: 24 September 2022, 12:12 IST