केळी पिकाची लागवड हि भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात ह्याची लागवड हि विशेष उल्लेखनीय आहे. खान्देश केळीच्या उत्पादणासाठी वैश्विक पातळीवर ओळखला जातो. जळगावने केळी उत्पादनात आपली ओळख निर्माण केली आहे. एवढेच नाही तर जळगावच्या केळीला जिआय टॅग अर्थात जिओग्राफिकल आडेंटिफिकेशन देखील प्राप्त आहे आणि हे नक्कीच येथील शेतकऱ्यांचे एक मोठे यश आहे
केळी फळाला देशभरात मोठी मागणी आहे तसेच एक्स्पोर्टसाठी देखील ह्याला खुप वाव आहे त्यामुळे ह्याची लागवड करून शेतकरी बांधव चांगली तगडी कमाई करत आहेत. असे असले तरी पपई लागवड करतांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, पपई लागवडित जर आम्ही आपणांस सांगू त्या गोष्टींची काळजी घेतली तर आपणही ह्यातून चांगली कमाई करू शकता. चला तर मग जाणुन घेऊया पपई लागवडीत काळजी घेण्यासारख्या गोष्टी.
»कृषी शास्त्रज्ञ सांगतात की, केळीचे झाड हे चार महिन्यांचे झाल्यास त्याला ऍझोस्पिरिलम आणि फॉस्फोबॅक्टेरिया हे प्रत्येकी 30 ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा व्हिराईड हे प्रत्येकी 30 ग्रॅम 5-10 किलो चांगल्या क्वालिटीचे जुने कंपोस्ट किंवा चांगले क्वालिटीचे शेणखत प्रत्येक झाडाला लावा. ह्यामुळे केळीच्या उत्पादनात वाढ होईल आणि ह्यातून चांगले उत्पन्न मिळेल.
रासायनिक खत-खाद्य आणि सेंद्रिय खतांचा वापर करताना शेतकरी बांधवानी एक काळजी घ्यावी ती म्हणजे जेव्हा तुम्ही रासायनिक खत लावणार आणि त्यानंतर तुम्हाला जर जैविक खतांचा वापर करायचा असेल तर त्यामध्ये किमान 2 ते 3 आठवड्यांचे अंतर ठेवावे. »केळीचे जे आपले मुख्य झाड असते त्याच्या शेजारी वाढणाऱ्या फांदया (साइड डकर्स) वेळोवेळी जमिनीलगत कापून टाकाव्यात आणि त्यावर 2 मिली केरोसीन टाकावे.
»पपईच्या बागेत रोगाने, किडीने, बुरशीने ग्रसित झाडे दिसल्यास, ती ताबडतोब उपटून टाका आणि त्यांना समूळ नष्ट करा आणि किडी मारण्यासाठी कोणत्याही आवश्यक कीटकनाशकाची फवारणी करा. त्यामुळे रोगावर नियंत्रण प्राप्त करता येते आणि कुठलाही विषाणू जणीत रोग दुसऱ्या झाडावर लागत नाही आणि पिकाची होणारी नुकसान कमी करता येते. त्यामुळे उत्पादनात घट होत नाही.
»केळीचे झाडे पाच महिन्यांचे झाल्यावर, खतांचा दुसरा डोस 150:150 ग्रॅम युरिया आणि एमओपी + 300 ग्रॅम निंबोळी पेंड प्रत्येक झाडाला लावा. ज्याप्रकारे आपण डाळिंबला खड्डे करून खत लावतो त्याप्रमाणे केळीच्या झाडाच्या खोडापासून सुमारे 45 सेंटीमीटर अंतरावर खड्डा करून लावा.
»केळीच्या झाडावर असलेली कोरडी व रोग असलेली पाने नियमितपणे कापून टाकावी आणि केळीच्या बागातून दुर जाऊन नष्ट करावी. त्यामुळे रोगाचे संक्रमण होत नाही.
»केळी पिकाला खते देण्यापूर्वी बागेत तन नियंत्रण करणे आवश्यक असते त्यामुळे खते लावण्यापूर्वी पपई बागांची खुरपणी/निंदनी करून तन काढून घ्यावे. पपई पिकाला 50 ग्रॅम चुना आणि 25 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति झाड लावावे. तसेच पपई झाडाच्या सूक्ष्म पोषक गरजा पूर्ण कराव्या त्यामुळे त्यांची कमतरता दूर होईल आणि उत्पादन दर्जेदार मिळेल.
»पपई पिकात भुंगे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यात प्रमुख आहे स्टेम विवील (stem weevil) स्टेम विवील देठावर हल्ला करते. त्यांचा हल्ला टाळण्यासाठी व अंडे देण्यापासून रोकण्यासाठी निमोसोल 12.5 मिली/लिटर किंवा क्लोरपायरीफॉस 2.5 मिली/लिटर हे प्रमाण घेऊन फवारणी करावी. यामुळे भुंग्यावर नियंत्रण प्राप्त करता येऊ शकते.
Published on: 28 October 2021, 09:26 IST