Horticulture

राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे हक्काचे पीक म्हणून मका या पिकाकडे बघितले जाते. जनावरांचे खाद्य म्हणून देखील याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच मकेची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते.

Updated on 14 March, 2022 10:25 AM IST

राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे हक्काचे पीक म्हणून मका या पिकाकडे बघितले जाते. जनावरांचे खाद्य म्हणून देखील याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच मकेची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या वाढत्या वातावरणामुळे आता मका पिकावर मर आणि कोरडी मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे उत्पादनावर तर परिणाम होणार आहेच पण चारा पीक म्हणूनही त्याचा उपयोग होतो की नाही याबाबत शंका आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर मकाचे अधिक उत्पादन घेतले जात आहे. मात्र सध्या मर रोगामुळे अडचणी वाढल्या आहेत. असे असताना आता त्या ठिकाणी 5 ट्रायकोडर्मा प्रति हेक्टरी 100 किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावे लागणार आहे. मात्र, याचे प्रमाण वाढले तरी कोणताही विपरीत परिणाम न होता जैविक बुरशी अधिक परिणामकारक ठरते. मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच शेतामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक 1 टक्का या प्रमाणात फवारावी किंवा ठिबकद्वारेही देता येणार आहे.

तसेच कार्बेन्डसीम 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. अनेक ठिकाणी ढगाळ पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच रब्बी हंगामातील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी महिनाभर कोणतेही पीक न घेता शेतजमिन तापविणे महत्वाचे आहे. यामुळे या रोगाचा मारा कमी होणार आहे. बुरशीजन्य अंड्याचा बंदोबस्त होणार आहे.

मकेला सध्या चांगले वातावरण आहे. यामुळे सध्या याचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे ज्वारीला पर्याय म्हणून समोर आलेले पीक म्हणजे मका आहे. येथील पोषक वातावरणामुळे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन मिळत आहे. तसेच जनावरांच्या मुरघासासाठी देखील हे उपयुक्त आहे. सध्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये हरभऱ्याचे क्षेत्र विक्रमी वाढले आहे तर दुसरीकडे कडधान्यावर भर दिला आहे. यामुळे मकाचे क्षेत्र वाढले आहे.

English Summary: Summer maize is in full swing but due to death disease, farmers are in a coma
Published on: 14 March 2022, 10:25 IST