मल्चिंग पेपर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मल्चिंग पेपर चे अनेक फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मल्चिंग पेपर याच्या वापराने पाण्याचे बाष्पीभवन नव्हता झाडांच्या मुळा भोवती ओलावा टिकून राहतो व उगवणारे तन नियंत्रणात राहते.
तसेच तापमान नियंत्रित ठेवता येते. योजना प्लास्टिक मल्चिंग फिल्म साठी असून या मल्चिंग पेपर च्या साह्याने आपण उत्पादन बऱ्याच प्रमाणात वाढू शकतो. आपण जर पाहिले तर शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर हा भाजीपाला पिकांसाठी जास्त प्रमाणात करताना दिसतो.
प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना नेमकी काय आहे? याबद्दल माहिती घेऊ
- या योजनेद्वारे मिळणार अनुदान:
प्लास्टिक मल्चिंग पेपरचा हेक्टरी खर्च हा बत्तीस हजार असून त्यावर 50 टक्के अनुदान मिळते. यानुसार जास्तीत जास्त हेक्टरी 16 हजार रुपये अनुदान मिळू शकते.
.तसेच डोंगराळ भागांमध्ये प्रतिहेक्टरअनुदानाचे प्रमाण हे 36 हजार आठशे रुपये इतक्या मापदंडानुसार असेल. या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 18 हजार चारशे रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन एकर साठी हे अनुदान डोंगराळ भागासाठी देय राहणार आहे.
- या योजनेसाठी कोण पात्र आहेत?
शेतकरी,बचत गट,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी समूह, सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकतात.
- या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्यांची आधार कार्ड ची झेरॉक्स कॉपी
- आधार लिंक असलेल्या बँक खात्याच्या पासबुक झेरॉक्स
-
- लाभार्थ्यांना जमिनीचा सातबारा उतारा
- 8- प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक माहिती साठी कुठे संपर्क करावा?
या योजनेच्या माहितीसाठी व करावयाच्या अर्जासाठी संबंधित कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा व या योजने विषयी अधिक माहिती मिळवावी.
Published on: 01 September 2021, 03:50 IST