Horticulture

सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण शेतकरी बंधूंचा विचार केला तर अनेक मोठमोठे बागायतदार शेतकरी त्यांनी पिकवलेले फळे आणि विविध प्रकारचा भाजीपाला हा निर्यात करण्याच्या दृष्टीने जास्त भर देत आहेत. जर आपण शेतमाल निर्यातीचा विचार केला तर बराचसा शेतमाल हा नाशवंत असल्यामुळे त्यासाठी खूप वेगळ्या आणि तंत्रज्ञानयुक्त सुविधा असणे गरजेचे असते. तरच शेतमाल निर्यात करणे शक्य होते. कारण तुम्ही निर्यात करत असलेला शेतमाल हा दर्जेदार असेल तरच त्याचा अपेक्षित लाभ तुम्हाला मिळतो. बऱ्याच शेतकऱ्यांना निर्यातीची इच्छा असते.

Updated on 08 November, 2022 3:19 PM IST

सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण शेतकरी बंधूंचा विचार केला तर अनेक मोठमोठे बागायतदार शेतकरी त्यांनी पिकवलेले फळे आणि विविध प्रकारचा भाजीपाला हा निर्यात करण्याच्या दृष्टीने जास्त भर देत आहेत. जर आपण शेतमाल निर्यातीचा विचार केला तर बराचसा शेतमाल हा नाशवंत असल्यामुळे त्यासाठी खूप वेगळ्या आणि तंत्रज्ञानयुक्त सुविधा असणे गरजेचे असते. तरच शेतमाल निर्यात करणे शक्य होते. कारण तुम्ही निर्यात करत असलेला शेतमाल हा दर्जेदार असेल तरच त्याचा अपेक्षित लाभ तुम्हाला मिळतो. बऱ्याच शेतकऱ्यांना निर्यातीची इच्छा असते.

नक्की वाचा:Raju Shetti : "शेतकऱ्यांना लुटून हाच पैसा राजकारणात वापरला जातो"

 परंतु बाहेर देशांमध्ये विक्री व्यवस्था कशी असते किंवा विक्री कशा पद्धतीने करावी लागते याबाबत पुरेशी माहिती बऱ्याच जणांकडे नसते. तसेच शेतमाल निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्त्वाच्या सुविधा प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे उपलब्ध असतीलच असे नाही.

त्यामुळे बरेच शेतकरी शेतमाल निर्यातीपासून लांब राहणेच पसंत करतात. परंतु शेतकऱ्यांची ही समस्या ओळखून ते दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. नेमके या निर्यात सुविधा केंद्रांचे स्वरूप काय असते व त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो याबद्दलची या लेखात माहिती घेऊ.

 काय आहे नेमके शेतमाल निर्यात सुविधा  केंद्रांचे स्वरूप

 जर आपण शेतमाल निर्यात सुविधा केंद्रांचा विचार केला तर शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहेत. शेतमाल निर्यातीमध्ये ज्या देशाला तुम्ही निर्यात करणार आहात त्या देशांच्या आयात धोरण अगोदर नेमके काय आहे? याबद्दल पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:NMNF पोर्टल लाँच: नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून NMNF पोर्टल सुरू, शेतकऱ्यांना होणार फायदा

कारण तुम्ही पाठवत असलेल्या शेतमालाची प्रत दर्जेदार असणे गरजेचे असून फळे डागाळलेली नसावी, इत्यादी गोष्टींना खूप महत्त्व आहे. तसेच तुम्ही वापरत असलेले पॅकेजिंग साहित्य सुद्धा दर्जेदार असणे गरजेचे आहे. ताजी फळे तसेच भाजीपाला व फुले यांचे निर्यात करण्याकरता त्यांचे हाताळणी योग्य रीतीने होणे गरजेचे असते

तसेच शेतमालाची प्रतवारी व साठवणूक इत्यादी काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच मालाची ग्रेडिंग, त्याची पॅकिंग, पूर्व शीतकरण व शीतगृह यासारख्या सुविधा उपलब्ध असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे असा नाशवंत शेतमालाच्या ठिकाणी उत्पादित होतो,त्या ठिकाणीच शीतगृहाची उभारणी खूप महत्त्वाची आहे. कारण आपण पाहतो की  बऱ्याच ठिकाणी कोल्ड स्टोरेजची वानवा आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने राज्याच्या विविध भागांमध्ये त्या त्या भागातील फळे तसेच भाजीपाला व फुले यांच्या उत्पादनास असणारी पोषक हवामान इत्यादी महत्त्वपूर्ण गोष्टींचा विचार करून निर्यात सुविधा केंद्र, फळे व भाजीपाला आधुनिक निर्यात सुविधा केंद्र व फुले निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी केलेली असून या केंद्रांमध्ये प्रशीतकरण तसेच कोल्ड स्टोरेज,

फळांसाठी रायपनिंग चेंबर, हाताळणी यंत्रणा तसेच प्रतवारी व पॅकिंग त्यासाठी लागणारी आधुनिक यंत्र साम्राज्य उभारणी या माध्यमातून करण्यात आले आहे. या निर्यात सुविधा केंद्रांवर कोल्डरूम तसेच प्रशीतकरण, प्लास्टिक क्रेट इत्यादी आवश्यक सुविधा देखील पुरवल्या जातात तसेच यासाठी 

लागणारा विद्युत पुरवठा हा देखील कृषिधराप्रमाणे ठेवण्यात आलेला आहे. काही निर्यात सुविधा केंद्रांवर एक्सप्रेस फिडरवरून विजेचा पुरवठा घेण्यात आला आहे. या सर्व सोयींनी युक्त अशा निर्यात सुविधा केंद्रांचा जास्तीत जास्त उपयोग शेतकऱ्यांनी करून घ्यावा व शेतमाल निर्यातीस शेतकरी बंधूंनी चालना द्यावी.

नक्की वाचा:Pollution: विषारी हवेत श्वास घेणे कठीण! प्रदूषणापुढे हतबल दिल्ली..

English Summary: state goverment provise this some important facility for vegetable and fruit export
Published on: 08 November 2022, 03:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)