सीताफळे गाळाच्या जमिनीत, पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत किंवा लाल मुरमाड, हलक्या, खडकाळ व डोंगर काठाच्या जमिनीत निकल चांगले येते. कोरडे व उष्ण हवामान सीताफळाच्या झाडांच्या व फळांच्या वाढीसाठी पोषक असते. 500 ते 750 मिलिमीटर पर्जन्यमान असणाऱ्या भागांमध्ये उत्कृष्ट प्रकारे लागवड करता येते. या लेखात आपण सिताफळ फळपिकाची बहार व्यवस्थापनाबद्दल माहिती घेऊ.
सीताफळ पिकाची भारी व्यवस्थापन
सीताफळ पिकाचे प्रामुख्याने उन्हाळी व पावसाळी असे दोन बहार घेतले जातात. उन्हाळी बहर घेत असताना जानेवारी ते मे महिन्यात बागेचा ताण सोडण्यात येतो. या बहराचे उत्पादन जून ते ऑक्टोबर कालावधीत घेण्यात येते. पावसाळी बहर जून जुलै या कालावधीत पावसाच्या आगमनाची सोबत सुरू होतो. या बहरचे उत्पादन ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत उपलब्ध होते.
सिताफळ फळबागेच्या बहार व्यवस्थापनातील काही टिप्स
- बहर घेताना त्या भागातील तापमान, आद्रता,पर्जन्यमान,सूर्यप्रकाश,वाऱ्याचा वेग, अवकाळी पाऊस, धोके यांचा अभ्यास दर्जेदार उत्पादनासाठी गरजेचा आहे.
- सूर्यप्रकाश हा फळांच्या वाढीतील मुख्य घटक असून बहराचे पाणी सुरू करण्यापासून ते फळे काढणीपर्यंत चांगला सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे.
- आद्रता हा महत्वाचा घटक आहे.झाडांची वाढ, फळधारणा, फळांची वाढ, कीड व रोगांचा उपद्रव या बाबतीत तो परिणाम घडवून आणत असतात. जमिनीलगत असलेला आद्रते मुळे सिताफळा सर्वात अधिक फळधारणा जमिनीलगतच्या भागात आढळून येते.
- बहराचे पाणी सोडण्यापूर्वी झाडाची खोडे दोन फुटांपर्यंत पूर्ण रिकामी करावीत. त्यावर बोर्डो मिश्रण, बुरशीनाशक व कीटकनाशक युक्त लेप द्यावा.
- बागेची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. बागेत पडलेली रोगट पाने, फळे, झाडावर लटकलेली काळी फळे बागेबाहेर नेऊन त्यांचा नायनाट करावा. मित्रकीटकांची हानी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
- झाडांना योग्य वळण व आकार देणे महत्त्वाचे आहे. झाडांची उंची दहा फुटांपर्यंत ठेवावी. झाडावर बांडगुळ असेल तर ते पूर्ण नष्ट करावे.
- बागेत हवा खेळती राहील याकडे लक्ष द्यावे. सिताफळ बहर घेताना आच्छादनाचा वापर खूप महत्त्वाचा आहे. जिवाणू संवर्धनात त्याचे अधिक महत्त्वाचे स्थान आहे.
Published on: 12 December 2021, 10:09 IST