Horticulture

स्लरी ही कोणत्याही पिकाला खूप फायदेशीर ठरत आहे.स्लरीचा वापर शेतात केल्याने जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू ऍक्टिव्ह होतात तसे त्यांना ऊर्जा मिळते. या जिवाणूंमुळे जमिनीमध्ये अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात.स्लरी चे बरेच असे फायदे आहेत. या लेखात आपण पिकांना उपयुक्त अशा या स्लरीचे प्रकार आणि प्रत्येक प्रकारचे स्लरी बनवण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.

Updated on 21 October, 2021 2:03 PM IST

स्लरी ही कोणत्याही पिकाला खूप फायदेशीर ठरत आहे.स्लरीचा वापर शेतात केल्याने जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू ऍक्टिव्ह होतात तसे त्यांना ऊर्जा मिळते. या जिवाणूंमुळे जमिनीमध्ये अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात.स्लरी चे  बरेच असे फायदे आहेत. या लेखात आपण पिकांना उपयुक्त अशा या स्लरीचे प्रकार आणि प्रत्येक प्रकारचे स्लरी बनवण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.

स्लरी चे मुख्य प्रकार

  • मुख्य अन्नद्रव्यांची स्लरी
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचे स्लरी
  • जिवाणूंची स्लरी
  • कडधान्य सलरी
  • मुख्य अन्नद्रव्यांची स्लरी
  • या स्लरीचे महत्व

 या स्लरी मुळे रासायनिक खते पिकांना लवकर लागू होतात व त्यांची कार्यक्षमता वाढवते. पिकांच्या पांढऱ्या मुलींची भरपूर वाढ होते तसेच मुख्य अन्नद्रव्य आतील स्फुरदाचे स्थिरीकरण कमी करण्यास मदत होते व नत्राचे बाष्पीभवन होत नाही.

ही स्लरी कशी बनवावी?

 यामधे साधारण तीनशे ते साडेतीनशे फळझाडांसाठी ताजे शेण वीस किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर, निंबोळी पेंड 15 किलो, युरिया पाच किलो, सिंगल सुपर फॉस्फेट दहा किलो, पोटॅश 5 किलो आणि 200 ते 250 लिटर पाणी या पद्धतीने मुख्य अन्नद्रव्याचे स्लरी  बनवावी व साधारण  महिन्यातून एकदा तरी प्रति झाड एक लिटर या प्रमाणात वापरावी.

  • सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी
  • हि स्लरी मुख्यता झिंक व फेरस हे जमिनीमध्ये असेच दिल्यास ते पिकाला पूर्णतः आनू लागता जमिनीत दुसऱ्या फार्ममध्ये स्थिर होतात. म्हणून शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून देत असताना स्लरीचा स्वरूपात द्यावे.
  • त्यासाठी ताजे सेन 20 किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर, निंबोळी पेंड 15 किलो, झिंक सल्फेट पाच किलो, फेरस सल्फेट तीन किलो, मॅग्नीज दोन किलो, कॉपर सल्फेट 100 ग्रॅम व बोरॉन 30 ग्रॅम
  • दुय्यम अन्नद्रव्य स्लरी बनवतांना ताजे शेण वीस किलो,जनावरांचे मूत्र दहा लिटर, निंबोळी पेंड 15 किलो, कॅल्शियम 15 किलो, मॅग्नेशियम पंधरा किलो,गंधक दहा किलो आणि पाणी 200 ते अडीचशे लिटर घ्यावे.
  • ही स्लरी दिवसातून दोन वेळेस चांगली ढवळावी.
  • सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य स्लरी मध्ये दहा ते 12 दिवसांचेअंतर ठेवावे.
  • जिवाणू स्लरी

जिवाणू स्लरी चे फायदे

  • नत्रयुक्त जिवाणू स्लरी मुळेहवेतील नत्र शोषून आले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
  • अविद्राव्य स्वरूपातील स्फुरदविरघळून पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
  • सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन होते.
  • बियाण्यांच्या उगवण क्षमतेमध्ये वाढ होते.
  • पिकाची वाढ जोमदार होते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते व जमिनीचा पोत सुधारतो.
  • रासायनिक खतांवरील खर्च कपात होतो.

जिवाणू स्लरी बनवण्याची पद्धत

  • ताजे शेण 20 किलो,जनावरांचे मूत्रदहा लिटर,काळा गूळ दोन किलो, अझोटोबॅक्टर पाचशे ग्राम,फोस्फेटसोलुब्लिसिंन्गमायक्रो ऑरगॅनिझम500 ग्राम, पोटॅश मोबिलीझर 500 ग्रॅम,इ एम द्रावण एक लिटर व इतर जैविक बुरशीनाशके एक किलोग्राम व 200 ते 250 लिटर पाणी
  • शक्यतो जैविक खते व बुरशीनाशक एकत्र वापरू नयेत.

 

कडधान्य सलरी

एक एकर क्षेत्रासाठी कडधान्याची स्लरी

  • ताजेशेण20 किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर, ह्युमिक ऍसिड व वर्मी वाश दोन लिटर, भरडा कडधान्य प्रत्येकी एक किलो मुग, मठ,चवळी, हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद, इ एम द्रावण दोनशेलिटर ते 250 लिटर पाणी

टीप- वरील सर्व स्लरी द्रावण पाच ते सहा दिवस ठेवायचे. दिवसातून दररोज सकाळी दोन मिनिट हलवायचे व सातव्या दिवशी वापशावर जमिनीतून पिकाला ड्रेचींग करावी.

( संदर्भ- होय आम्ही शेतकरी )

English Summary: slury is useful for crop and kind of slury
Published on: 21 October 2021, 02:03 IST