स्लरी हे कोणत्याही पिकाला फार फायदेशीर आहे.परंतु अजूनही शेतकरी त्याकडे पूर्ण लक्ष देतांना दिसत नाही. स्लरी चे जर बहुरंगी उपयोग पाहिले तर स्लरीशिवाय पर्याय नाही असे दिसून येते. या लेखामध्ये आपण स्लरी कशी बनवतातव तिचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.
1) स्लरी चे वापराचे फायदे:
जर स्लरीचा उपयोग शेतात गेला तर जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू कार्यप्रवण होतात. कारण त्यांना ऊर्जा मिळते व त्या जिवाणूंमुळे जमिनीतील महत्त्वाचे अन्नद्रव्य पिकांना सहजरीत्या उपलब्ध होतात. असे स्लरी जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म वाढविते. स्लरीचा वापराने जमिनीतील पोकळी वाढवून हवा खेळती राहते. स्लरी मुळे मीनेरालीझेशन ची क्रिया लवकर होते. कारण हेच तयार झालेले इन ऑरगॅनिक स्वरूपातील अन्नद्रव्य विकत घेत असतात. तसेच लहरींमुळे जमिनीतील कर्ब आणि नत्र यांचे गुणोत्तर टिकून असते. जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट जास्त प्रमाणात असेल तर पिकाच्या मुळ्या ब्लॉक होतात. जर स्लरीचा वापर केला तर संबंधित प्रॉब्लेम येत नाही.
नक्की वाचा:किसान क्रेडिट कार्ड: शेतकरी या कामांसाठी KCC कर्ज घेऊ शकतात
2) स्लरी कशी बनवावी?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये मलमूत्र साठवण्याची योग्य अशी सोय असावी. तसेच जनावरांची ताजी शेन उन्हात न ठेवता सावलीत ठेवावे. स्लरी बनवण्यासाठी मुख्यत: 300 ते 400 लिटर सिमेंटची टाकी असावी. स्लरी बनवतांना 20किलो शेन, दहा लिटर गोमूत्र, 200 ते 250 लिटर पाणी, सिमेंटच्या टाकीत टाकून चांगले हलवुन घ्यायचे. तसेच साधारणत: 300 ते 350 फळझाडांसाठी ताजी शेन 20 किलो, जनावरांचे गोमूत्र 10 लिटर, निंबोळी पेंड 15 किलो, युरिया पाच किलो, सिंगल सुपर फास्फेट 10 किलो, पोटात पाच किलो आणि दोनशे ते अडीचशे लिटर पाणी या पद्धतीने मुख्य अन्नद्रव्यांची स्लरी बनवावी. व साधारणपणे महिन्यातून एकदा तरी प्रति झाड एक लिटर याप्रमाणे वापरावी.
3) स्लरी चे प्रकार :
1) जिवाणू स्लरी व तिचे प्रकार:- नत्रयुक्त जीवाणू स्लरी मूळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते. अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिले जाते. सेंद्रिय पदार्थाचे जलद विघटन होते. बियाण्यांची उगवण क्षमता वाढवते. पिकांची जोमदार वाढ व रोग प्रतिकार शक्ती वाढते.जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.तसेच रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो.
4) जिवाणू स्लरी कशी बनवावी?
ताजे शेन 20 किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर,काळा गूळ दोन किलो, अॅसेतोबॅक्टर 500 ग्रॅम, फास्फेट सोलुब्लेसिंग मायक्रो ऑरगॅनिझम 500 ग्रॅम, पोटॅश मोबिलीझर 500 ग्रॅम, ई एम द्रावण एक लिटर व इतर जैविक बुरशीनाशके एक किलो ग्रॅम, दोनशे लिटर पाणी.
5) सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य स्लरी :
सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्यत: झिंक फेरस हे जमिनीमध्ये असेच दिल्यास ते पिकाला पूर्णत: न लागता जमिनीत दुसऱ्या रूपात स्थिर होतात. म्हणून शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून देत असताना स्लरीच्या स्वरूपात द्यावे. हि स्लरी बनवताना 20 किलो ताजे शेण, जनावरांचे मूत्र दहा लिटर, निंबोळी पेंड 15 किलो,झिंक सल्फेट पाच किलो, फेरस सल्फेट तीन किलो, मॅगनीज दोन किलो, कॉपर सल्फेट 100 ग्रॅम वजन 30 ग्रॅम.
दुय्यम अन्नद्रव्य स्लरी बनवताना ताजे शेण 20 किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर, निंबोळी पेंड 15 किलो, कॅल्शियम 15 किलो, मॅग्नेशियम 15 किलो, गंधक 10 किलो, 200 ते 250 लिटर पाणी द्यावे. या तयार मिश्रणाला दोन वेळेस चांगले हलवावे. सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य स्लरी मध्ये दहा ते बारा वर्षाचे अंतर ठेवावे.
नक्की वाचा:उन्हाळी सोयाबीन लावला खरा पण, 'या' कारणामुळे उत्पादन खर्च काढणे देखील मुश्कि
6) कडधान्य स्लरी :
ताजे सेन 20 किलो, गोमूत्र 10 लिटर, ह्युमिक ऍसिड व व्हर्मीवॉश दोन लिटर, भर्डा कडधान्य प्रत्येकी एक किलोग्रॅम मुग, मठ, चवळी, हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद, इ एम द्रावण दोन लिटर व 200 ते 250 लिटर पाणी.
स्लरी बनवल्यानंतर हे द्रावण पाच ते सहा दिवस ठेवावे. तसेच दररोज सकाळी दोन मिनिट ठरवायचे व सातव्या दिवशी वापश्यावर जमिनीतून पीकाला आळवणी करावी. हे माप एक एकर क्षेत्रासाठी आहे.
Published on: 28 March 2022, 09:46 IST