Horticulture

कोरडवाहू जमिनीत देखील सिताफळ पीक चांगले येते असे म्हटले जाते. परंतु यामध्ये तुम्ही केलेल्या परफेक्ट नियोजन आणि व्यवस्थापन तसेच अगदी उशिरा न करता अचूक वेळेला केलेले नियोजन खूप उपयोगी पडते. या लेखात आपण सिताफळ बागेविषयी अशा दोन गोष्टी जाणून घेऊ की त्या जर शेतकऱ्यांनी अचूकपणे केल्या तर मिळणारे उत्पादन नक्कीच बंपर स्वरूपात मिळेल.

Updated on 21 April, 2023 10:38 AM IST

कोरडवाहू जमिनीत देखील सिताफळ पीक चांगले येते असे म्हटले जाते. परंतु यामध्ये तुम्ही केलेल्या परफेक्ट नियोजन आणि व्यवस्थापन तसेच अगदी उशिरा न करता अचूक वेळेला केलेले नियोजन खूप उपयोगी पडते. या लेखात आपण सिताफळ बागेविषयी अशा दोन गोष्टी जाणून घेऊ की त्या जर शेतकऱ्यांनी अचूकपणे केल्या तर मिळणारे उत्पादन नक्कीच बंपर स्वरूपात मिळेल.

परंतु यामध्ये तुम्ही केलेल्या परफेक्ट नियोजन आणि व्यवस्थापन तसेच अगदी उशिरा न करता अचूक वेळेला केलेले नियोजन खूप उपयोगी पडते. या लेखात आपण सिताफळ बागेविषयी अशा दोन गोष्टी जाणून घेऊ की त्या जर शेतकऱ्यांनी  अचूकपणे केल्या तर मिळणारे उत्पादन नक्कीच बंपर स्वरूपात मिळेल.

दिवसा वीज देण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

सिताफळ बागेला नियमित पाण्याची गरज नसते. अगदी तुम्ही पावसाळ्यात पडणार्‍या पाण्यावर देखील सिताफळाचे  चांगले उत्पादन मिळवू शकतात परंतु संरक्षित पाण्याच्या पाळ्या या सीताफळाच्या झाडाची वाढ आणि उत्पादनासाठी व फळधारणा इत्यादी गोष्टीसाठी खूप उपयुक्त आहेत.

सीताफळाच्या झाडाला पहिली तीन-चार वर्ष  जर पाण्याचे व्यवस्थित नियोजन विशेषतः उन्हाळ्यात चांगले केले तर झाडांची वाढ चांगली होण्यास मदत होते व फळधारणा देखील चांगली होते. त्यासोबतच फळधारणा झाल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात एक ते दोन पाणी दिल्यास येणाऱ्या फळाची प्रत व त्याचा आकार खूप उत्तम असतो.

एक हात मदतीचा! शेतकऱ्यांना राजपत्रित अधिकारी एक दिवसाचे वेतन देणार...

सीताफळाच्या झाडाला योग्य वळण यावे यासाठी वाढीच्या सुरवातीच्या काळामध्ये हलक्या छाटणीची गरज असते. जर तुम्ही झाडाला योग्य वळण दिले व झाड एका बुंध्यावर वाढवले तर झाडाची वाढ डौलदारपणे होते.

नाहीतर अनेक फांद्या असलेले एक झुडुपवजा झाड तयार होते. त्यामुळे झाडाची वाढ कमी होते व साहजिकच मिळणारे उत्पादन देखील कमी मिळते.

त्यासाठी एक मीटर खोडावरील सर्व फुटवे काढून त्याच्या चारही बाजूने फांद्या विखुरलेल्या राहतील, अशा मोजक्याच फांद्या ठेवाव्यात. जुन्या, वाळलेल्या, अनावश्‍यक आणि गर्दी करणाऱ्या फांद्या काढून टाकून सीताफळ बागेत भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.

कमी गुंतवणुकीत सुरु करा लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग, होईल फायदा, जाणून घ्या...
आता शेतातील दगडांची अडचण होणार दूर, स्टोन पिकर येणार मदतीला, जाणून घ्या..
मालक वाचला पण बैल जोडीने साथ सोडली, मालक ढसाढसा रडला...

English Summary: Sitaphal will give bumper production, just do 'like' planning
Published on: 21 April 2023, 10:38 IST