Horticulture

सिलिकॉन हे अन्नद्रव्य ऊस हे पीक इतर पिकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शोषून घेते. शोषलेले हे सिलिकॉन वनस्पती सिलिसिक आम्लाच्या स्वरूपात विसरण व प्रवाही वस्तुमान पद्धतीने शोषून घेऊन त्याची साठवण खोडात व पानात करतात. ऊस पिकाचा विचार केला तर हे पीक हेक्टेरी 700 किलो सिलिकॉन शोषून घेते.

Updated on 28 December, 2021 5:26 PM IST

सिलिकॉन हे अन्नद्रव्य ऊस हे पीक इतर पिकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शोषून घेते. शोषलेले हे सिलिकॉन वनस्पती सिलिसिक आम्लाच्या स्वरूपात विसरण व प्रवाही वस्तुमान पद्धतीने शोषून घेऊन त्याची साठवण खोडात व पानात करतात. ऊस पिकाचा विचार केला तर हे पीक हेक्‍टरी 700 किलो सिलिकॉन शोषून घेते.

उसाला सिलिकॉन चे होणारे फायदे

पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी उपयुक्त- सिलिकॉन हे वनस्पतीच्या पानांच्या पेशीभित्ति वर सिलिका जेल या स्वरूपात साठून राहते. त्यामुळे त्याचा पानांवर जाड थर निर्माण होतो. या साचलेल्या थरामुळे वनस्पतींमध्ये यांत्रिक शक्ती निर्माण होऊन वनस्पती सरळ वाढतात. त्यामुळे त्यांचे जमीनीवर लावण्याचे प्रमाण कमी होते. पाणी सरळ वाढल्याने एकमेकांचे सावलीत पानांवर पडत नाही. या सर्वांमुळे प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेत मदत होऊन पिकाची उंची, खोडा ची जाडी व फुटव्यांची संख्या वाढते

  • ऊस पिकात साखर तयार होऊन त्याची साठवण होऊन त्याच स्वरूपात ती टिकून राहते यासाठी सिलिकॉन चा उपयोग होतो.
  • सिलिकॉन आर्थिक दृष्ट्या फायदेशीर- सिलिकॉन चा यासर्व उपयोगामुळे सिलिकॉन पुरवठा करण्यासाठी पारंपारिक तसेच वनस्पतीच्या अवशेषांचा फेरवापर व रासायनिक घटकांचा वापर केला जातो. रासायनिक स्त्रोतांमध्ये कॅल्शियम सिलिकेट  ( 14 ते 19 टक्के सिलिकॉन व 17 टक्के पालाश ) व मॅग्नेशियम सिलिकेट (14.5 टक्के सिलिकॉन ) यांचा समावेश होतो. 

उसामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शिफारशीनुसार मध्यम खोल काळ्याजमिनीत उसाची लागण आणि खोडव्याचे अधिक ऊस व साखर उत्पादन घेण्यासाठी कॅल्शियम सिलिकेट 832 किलो प्रति हेक्‍टरी ऊस लागवडीच्या वेळेस एकदाच वापरले असता चारशे किलो प्रति हेक्‍टरी सिलिकॉन ऊसाला मिळते तसेच बगॅसऐशचा वापर केला तर सिलिकॉनउसासाठी  उपलब्ध होऊ शकते. तसेच जिवाणू खतांचे मिक्स कल्चर वापरून उसाच्या पाचटाचे कंपोस्ट ऊसाला दिल्यास त्याद्वारे देखील ऊसाला सिलिकॉनचा पुरवठा होतो.

English Summary: silicon is more benificial miccro nutruients for cane crop
Published on: 28 December 2021, 05:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)