कीटकनाशकांची निवड करताना किडीचा प्रकार, किडींचा प्रादुर्भाव यानुसार करावी. कीडनाशके हे विषारी असतात त्यामुळे त्यांचे फवारणी करतांना व हाताळतांना योग्य ती काळजी घ्यावी लागते. या लेखामध्ये आपण कीडनाशकांची निवड कशी करावी आणि कीडनाशकांच्या बाटल्यावरून त्यांचे विषकारकताकशी ओळखावी याबद्दल माहिती घेऊ.
अशा पद्धतीने करावी कीडनाशकांची निवड
- कोणत्याही कीडनाशकांची फवारणी करण्यापूर्वी किडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता, आर्थिक नुकसानीचे संकेत पातळी जाणून घ्यावी.
- त्यानंतर किडींचा नुकसानीचा प्रकार, अवस्था आणि किडीच्या तोंडाची रचना कशी आहे यावरून कीडनाशकांची निवड करावी. उदा. सर्वसाधारणपणे पाणी, फुले आणि फळे खाणाऱ्या यांच्या व्यवस्थापनाकरिता उदर विष रसशोषक किडीच्या व्यवस्थापनाकरिता आंतरप्रवाही आणि जमिनीत वास्तव्य करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनाकरिता धुरीजन्य किंवा जमिनीतून द्याव्या लागणाऱ्या कीडनाशकांची निवड करावी.
- लाल त्रिकोण असलेले कीडनाशके सर्वात विषारी असतात. त्यानंतर क्रमाने पिवळा, निळा हिरवा असा उतरता क्रम लागतो.
- एकच एक किंवा एकाच गटातील कीडनाशकांची वारंवार फवारणी करू नये. आवश्यकतेनुसार केंद्रीय कीटकनाशक मंडळाने संमत केलेल्या कीडनाशकांचा वापर करावा.
- तणनाशके, बुरशीनाशके व इतर कोणतेही घटक शिफारस असल्याशिवाय मिसळून फवारू नयेत.
कीडनाशकांचे विषकारकता अशी ओळखावी-
- अतितीव्र विषारी कीडनाशकाच्या वेष्टनावर उलटा लाल त्रिकोण असून त्रिकोणाच्या वरील बाजूस धोक्याचे चिन्ह व लाल अक्षरात poison असे लिहिलेले असते.
- फारविषारी कीडनाशकांच्याआवेइष्टनावरपिवळा त्रिकोण व त्यावरील भागात अक्षरात poison असे लिहिलेले असते.
- मध्यम विषारी कीडनाशकाच्या वेष्टनावर निळा त्रिकोण व त्यावरील भागात अक्षरातDanger असे लिहिलेले असते.
- कमी विषारी कीडनाशकाच्या वेस्टनावर हिरवा त्रिकोण व त्यावरील भागात अक्षरातcaution असे दर्शविले असते.
English Summary: selection of insecticide and identified of intensity of insecticide
Published on: 27 November 2021, 01:22 IST
Published on: 27 November 2021, 01:22 IST