Horticulture

भारतातील आणि महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केल्यास येथील समशीतोष्ण हवामान हरितगृहातील फुलशेती साठी तसेच विविध प्रकारचे भाजीपाला व इतर फळपिकांच्या उत्पादनाचा अतिशय उपयुक्त आहे. तसेच या हवामानामध्ये हरितगृह उभारणीसाठी येणारा खर्च देखील युरोपियन देशांमध्ये येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत फार कमी आहे.

Updated on 30 December, 2021 12:37 PM IST

भारतातील आणि महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केल्यास येथील समशीतोष्ण हवामान हरितगृहातील फुलशेती साठी तसेच विविध प्रकारचे भाजीपाला व इतर फळपिकांच्या उत्पादनाचा अतिशय उपयुक्त आहे. तसेच या हवामानामध्ये हरितगृह उभारणीसाठी येणारा खर्च देखील युरोपियन देशांमध्ये येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत फार कमी आहे.

जर आपण इतर देशांचा विचार केला तर हिवाळ्यात अतिशय कमी तापमानामुळे येथे पिके चांगली येत नाही व जर फुले किंवा भाजीपाला पिके घेण्याचा प्रयत्न केला तर उत्पादन खर्च भरमसाठ येतो परंतु आपल्या देशात नेमके याच्या उलट आहे. आपल्याकडील हवामानात हरितगृहाच्या सर्व प्रकारची फळे, फुले व भाजीपाल्याचे उत्पादन उत्कृष्ट येते. या लेखामध्ये आपण हरितगृह उभारणीसाठी लागणाऱ्या जागेची निवड कशी करावी याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊ.

 हरितगृह उभारणीसाठी जागेची निवड करायची पद्धत व त्यासाठी असलेल्या महत्त्वाच्या बाबी..

1- शेतकऱ्यांनी हरितगृह उभारणीसाठी शेतावरील उंच-सखल व सपाटीकरण केलेली जागा निवडावी.

 मोठ्या झाडांच्या सावलीतील किंवा इमारतीच्या सावलीतील किंवा एखाद्या झाडाच्या किंवा इमारतीच्या  आडोशाची  जागा हरितगृहासाठी निवडू नये.

3- ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणी जागेची निवड करणे उपयुक्त ठरते.

4- पाणीपुरवठा च्या सुविधा जवळपास असणे अत्यावश्यक आहे. तसेच उपलब्ध पाण्याचा सामू साडेसहा ते साडेसात च्या दरम्यान व पाण्याच्या क्षारतेचे प्रमाण 0.2 ते 0.5 असावे.

5- हरितगृहासाठी निवड केलेल्या जमिनीचा सामू जर साडे सात पेक्षा जास्त असेल व क्षारतेचे प्रमाण 0.5 मिली पेक्षा जास्त असेल व जमीन लाल रंगाची वालुकामय पाण्याचा निचरा होणारी नसेल व काळी चिकन, पाण्याचा निचरा न होणारी, शार युक्त असेल तर बाहेरून लाल रंगाची पाण्याची निचरा होणारी वालुकामय  माती वाफे तयार करण्यासाठी आणणे गरजेचे असते.

 काळी तसेच पाण्याचा निचरा न होणारी जमीन असेल तर 45×45 सेंटीमीटर आकारमानाचा चर काढावा. तसेच पाच सेंटीमीटर जाडीचा वाळूचा संपूर्ण हरितगृहाच्या जागेवर थर देऊन त्यावर वाफे तयार करावेत. जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल.

6- हरितगृहासाठी पाणथळ जागेचा वापर करू नये.

7- हरितगृहा पासून 30 मीटर अंतरावर पश्चिम व दक्षिण बाजूस वारा रोधक झाडे लावावे. त्यामध्ये शक्यतो सुरू, सिल्वर ओक, अशोक इत्यादी झाडांचा समावेश करावा. निलगिरी, साग आणि सुबाभूळ सारखे झाडे लावू नयेत. कारण या झाडांवर बऱ्याच किडींचा व रोगांचा अवस्था पूर्ण होतात.

English Summary: Selection of approprite land for set up greenhouse
Published on: 30 December 2021, 12:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)