Horticulture

कुठलेही फळपीक किंवा पीक म्हटले तर त्याच्या कलमा किंवा रोप जेवढे सुदृढ आणि निरोगी असेल तेवढेच पुढे येणारे फळझाड किंवा पिक हे निरोगी असते. फळ पिकांमध्ये फळांच्या कलमांना फार महत्व असते. कलमा जेवढ्या शास्त्रीयदृष्ट्या तयार केलेले असतील तेवढे उत्तम असते. कलमांची निवड करताना ती फार व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करावी लागते. कलमांची निवड करताना बरेच बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. या लेखात आपण संत्रा लागवडीसाठी कलमांची निवड कशी करावी कोणती काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated on 06 July, 2021 1:19 PM IST

 कुठलेही फळपीक किंवा पीक म्हटले तर त्याच्या कलमा किंवा रोप जेवढे सुदृढ आणि निरोगी असेल तेवढेच पुढे येणारे फळझाड किंवा पिक  हे निरोगी असते. फळ पिकांमध्ये फळांच्या कलमांना फार महत्व असते. कलमा जेवढ्या शास्त्रीयदृष्ट्या  तयार केलेले असतील तेवढे उत्तम असते. कलमांची निवड करताना ती फार व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करावी लागते. कलमांची निवड करताना बरेच बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. या लेखात आपण संत्रा लागवडीसाठी कलमांची निवड कशी करावी कोणती काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेणार आहोत.

 संत्रा पिकांच्या कलमांची लागवड हे पावसाळा सुरू होताना करणे कधी चांगले असते. संत्रा कलमांची लागवड करताना जर पावसाळा संपून गेला किंवा किंवा संपण्याचा काळ आहे तेव्हा संत्रा पिकाच्या कलमांची लागवड करणे टाळावे.

 संत्रा पिकांच्या कलमांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी?

  • कुठल्याही फळाचे कलम तयार करताना मातृवृक्ष कसा आहे यावर सगळे अवलंबून असते. म्हणून संत्रा पिकासाठी कलमे निवडताना ती निरोगी, जास्त उत्पादन व दर्जेदार फळे देणाऱ्या मातृवृक्षाचे डोळे वापरूनच करावे.
  • संत्रा पिकासाठी कलम निवडताना संत्र्याचा डोळा कोणत्या खुंटावर बांधलेला आहे हे व्यवस्थित पहावे. कारण खुंटाचा झाडाची शारीरिक वाढ, फळधारणा शक्ती, फळांचे गुणधर्म आणि झाडांच्या आयुष्यावर परिणाम पडत असतो.
  • संत्रा कलमे हे रोग प्रतिकारक्षम खुंटावर तयार केलेली असावीत.
  • मध्यम ते हलक्‍या जमिनीसाठी जबेरीव भारी जमिनीसाठी रंगपूर लिंबू या खुंटावरील कलमांची निवड करावी.
  • संत्र्याच्य कलमा या किकरपानी, वेलिया किंवा पानसोट असलेल्या मातृ वृक्षापासून तयार केलेली नसावीत.

 

 संत्रा कलमा लागवडी विषयी अजून काही माहिती

 ज्या कलमांची निवड करायला त्यांची लागवड प्रामुख्याने मान्सूनचा तीन ते चार वेळा पाऊस पडून गेल्यानंतर व जमिनीत तेव्हा योग्य ओलावा राहील तेव्हा करावी. संत्रा कलमांची लागवड करताना ते मुख्यत्वेकरून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळलेले असताना किंवा खड्ड्यात पुरेशी ओल असताना  लावावेत. कलम लावताना कलमे चा डोळा पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवावा. त्यामुळे जर जोराचा वारा चालू असेल तर डोळा खचण्याचा संभव नसतो. कलम जेव्हा खड्ड्यात लागवडीसाठी ठेवाल तेव्हा ती  मूळ स्वभाविक अवस्थेत ठेवून माती हळू हळू खड्ड्यात टाकावी. नंतर माती हलक्या हाताने दहावी जोरात मातीवर दाब दिल्यास तंतूमुळे तुटण्याची दाट शक्यता असते. कलम पन्हेरीतून काढताना काही मुळे तुटतात. त्यामुळे कलमा वरील पाण्याचे शोषण होत नाही अशा वेळी सर्व पाने ठेवल्यास कलम वाळण्याची दाट शक्‍यता असते. म्हणून कलमांची लागवड करण्यापूर्वी कलमाच्या खालच्या बाजूची अर्धी पाने काढून टाकावीत. खुंटावर आलेली फूट जोमाने वाढतात. म्हणून ती वरचेवर काढावीत. कलम लावल्यानंतर कलमांना अंदाज एक लिटर पाणी देणे योग्य राहील.

तसेच त्या लावणे अगोदर त्याअगोदर सावलीत ठेवाव्यात. पॅकिंगच्या मुळाचा भाग थोडा वेळ पाण्यात बुडवून काढावा किंवा त्यावर पाणी शिंपडावे. तसेच कलम जमिनीत लागवड यापूर्वी त्याची मुळे तीन ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड प्रति लिटर द्रावणात बुडवून लावावीत. कलम लागवडीपूर्वी खड्डे शेणखत अधिक माती  आणि दोन किलो सिंगल सुपर फास्फेटने भरून ठेवलेले असावेत. तसेच ती लावताना खड्ड्याच्या मध्यभागी जमिनीत  लावावीत. तसेच कलम लावताना ती स्वभाविक अवस्थेमध्ये ठेवावीत. नंतर मुळाचा माती बरोबर घनिष्ठ संबंध यावा यासाठी माती घट्ट दाबावी. कलमांचा डोळ्याचा भाग जमिनीत जमणार नाही याची काळजी घ्यावी.. प्रत्येक कलमांचाडोळ्यांचा सांदा जमिनीपासून 20 सेंटिमीटर उंचीवर राहील अशा पद्धतीनेच कलमांची लागवड करावी. कलमांना जोमदार फुटवे आल्यावरच रासायनिक खताची मात्रा द्यावी.

 

English Summary: santra kalme nivad
Published on: 06 July 2021, 01:19 IST