पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचा वापर करतो. रासायनिक खतांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतोच परंतु सेंद्रिय खतांमध्ये शेतकरी जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करतात. कारण आपल्याला माहिती आहेच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेले घटक सेकी उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी तसेच जमिनीची योग्य प्रमाणात पाणी धारण क्षमता टिकून राहावी यासाठी शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु शेणखताचा वापर करण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे हे देखील तितकेच गरजेचे असते.
शेणखत व्यवस्थित कुजलेले नसेल तर होणारे दुष्परिणाम
आपण शेतामध्ये शेणखताचा वापर करतो. तेव्हा आपण ते शेणखत कुजलेले आहे किंवा नाही याच्याकडे देखील लक्ष पुरवणे तेवढेच गरजेचे आहे. जर शेणखत व्यवस्थित कुजलेले नसेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम पिकावर होऊ शकतात जसे की….
1- जेव्हा आपण न कुजलेल्या शेणखताचा वापर शेतामध्ये करतो किंवा पिकांच्या मुळांभोवती टाकतो तेव्हा त्याची कूजण्याची प्रक्रिया सुरू असते.
जेव्हा शेणखताच्या कुजण्याची प्रक्रिया सुरू असते तेव्हा त्याचे तापमान 65 ते 75 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. त्यामुळे या तापमानाचा परिणाम हा मुळावर होण्याचा दाट शक्यता असते व त्यामुळे झाडाला इजा पोहोचते व साहजिकच उत्पादनात घट येऊ शकते.
2- दुसरी गोष्ट सांगता येईल ती म्हणजे जेव्हा शेणखताची कुजण्याची प्रक्रिया सुरू असते तेव्हा त्यासाठी त्याला ऑक्सिजनची गरज भासते.
त्यामुळे शेणखत न कुजलेले पिकांना टाकले तर ते जमिनीतील ऑक्सिजन कुजण्यासाठी घेत असते व नेमके झाडाच्या मुळांना देखील ऑक्सीजन आवश्यक असतो.
त्यामुळे त्याचा परिणाम हा जमिनीतील ऑक्सिजनचा साठा कमी होण्यावर होतो आणि झाडाच्या मुळांना हवा तेवढा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झाडाच्या अंतर्गत भागांमध्ये काही चुकीची संप्रेरके स्त्रवतात आणि त्या झाडाच्या उत्पादनक्षमतेला मारक ठरतात.
3- तिसरा दुष्परिणाम म्हणजे कूजणाऱ्या शेणखतामध्ये म्हणजेच शेणखत सडताना त्यामध्ये काही उपद्रवी बुरशी वाढतात व त्यांचा धोका पिकांना निर्माण होतो.
त्यामुळे न कुजलेल्या शेणखताचा फायदा होणे तर दूरच राहते परंतु त्याचा पिकांना नुकसान जास्त होते व रासायनिक औषधांचा खर्च वाढतो. तसेच अशा प्रकारचे शेणखत टाकल्यानंतर पीक काही दिवस पिवळे पडते म्हणूनच शेणखत टाकताना ते पूर्ण कुजलेले असायला हवे.
नक्की वाचा:हळद पिकासंदर्भात लागवड पश्चात सद्यस्थितीत अंगीकार करावयाच्या काही महत्त्वाच्या बाबी
Published on: 25 July 2022, 04:12 IST