पेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची उत्पादकता घटत जाते. तसेच फळांची गुणवत्ता व आकारही कमी होतो. अशा परिस्थितीत त्याच बागांचे उत्पादन वाढवण्यासाठी छाटणी तंत्राचा अवलंब करावा. अशा बागांचं शास्त्रीय पद्धतीने पुनर्जीवन केल्यास बागेपासून दर्जेदार व चांगले उत्पन्न मिळू शकते.
महाराष्ट्र मध्ये बहुतेक पेरू लागवड ही पारंपारिक पद्धतीने 6 मीटर X 6 मीटरअंतरावर केली जाते. साधारणत: 20 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या बागांमध्ये झाडातील शरीर क्रियांशी गती कमी होते. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा वाढल्यामुळे झाडे वेडीवाकडी वाढतात.उत्पादकता घटते त्याबाबत कारणांचा अभ्यास करून छाटणीचे नियोजन करावे.
- पुनर्जीवनाची पद्धत :-
- पुनर्जीवन म्हणजे छाटणी करून झाडांचा विस्तार आटोपशीर व मर्यादित ठेवून पाने व फांद्या सशक्त व जोमदार बनवणे पुनर जीवनामुळे झाडांपासून अधिक व दर्जेदार उत्पन्न मिळते. केवळ झाडांची खरड छाटणी करणे म्हणजेच पुनर्जीवन असा सर्वसाधारण समज आहे. झाडांची छाटणी करणे ही पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेमधील मधील पहिली पायरी आहे.
- बागांमध्ये मध्येच असलेले एका दुसऱ्या झाडाची निवड न करता सलग झाडे छाटणी साठी निवडावेत.त्यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळून नवीन फुटव्यांची वाढ उत्तम होते.
- छाटणी:-
- झाडांच्या विस्तारावर छाटणी किती उंचीवर व कोणत्या फाद्यापर्यंत करायची हे ठरवावे. साधारणात : शिफारशीप्रमाणे 1ते 1.5 मीटर झाडांची उंची ठेवून झाडांच्या वरील भागांची छाटणी केलेली उत्तम ठरते.
- फांद्या तोडताना झाडाची साल निघणार नाही फांदी पिचणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी छाटणी तीक्ष्ण अवजाराने करावी. झाडांची योग्य उंचीवर चेन स्वा किंवा लांब दांडा असलेल्या यांत्रिक करवतिच्या सहाय्याने छाटणी करावी. यांत्रिक करवतीच्या सहाय्याने छाटणी केल्यास काप एक सारखा व फांदीत जास्त इजा न होता घेता येतो. यांत्रिक करवती उपलब्ध नसतील तर, पारंपारिक करवतीसारखे अवजार वापरून देखील छाटणी करता येते.
- बाहेरील बाजूकडे निमुळता तिरकस काप दिल्यामुळे पावसाचे किंवा दवाचे पाणी सहजपणे निथळवून जाण्यास मदत होते छाटणी करताना सपाट किंवाबुध्याकडे पाणी निथळून येईल, असा तिरकस काप देऊ नये.
- छाटणीचा हंगाम : शक्यतो पेरूची छाटणी ही मे जून या महिन्यात करावे सध्यास्थितीत 30 जून अखेरपर्यंत छाटणी पूर्ण करावी. परिणामी पावसामुळे नवीन पालवी लवकर येते. ती निरोगी किंवा सदृढ ही असते छाटणीनंतर पावसाळ्यात येणाऱ्या नवीन पालवीचे योग्य नियोजन करून रोग व किडींपासून संरक्षण सहजपणे करता येते.
- फुटव्यांचे व्यवस्थापन :-
- जुन्या पेरू बागेची छाटणी केल्यानंतर लगेचच खोड्या तील सुप्त डोळे जागृत होण्याची प्रक्रिया सुरू होते. चटणी पासून सर्वसाधारणपणे 30 ते 40 दिवसांनी नवीन फुटवे येण्याची प्रक्रिया सुरू होते. नवीन फुटवे येण्यासाठी लागणारा कालावधी झाडाचे वय व जमिनी मध्ये असलेला ओलावा यावर अवलंबून असते. खूप जुन्या झाडांची छाटणी केल्यास नवीन फुटवे येण्यासाठी चा कालावधी यापेक्षा जास्त असू शकतो.
- छाटणी केलेल्या जागे भोवती असंख्य नवीन फुटवे येतात. त्या फुट व्या यांपैकी सशक्त असलेले 34 फुटवे फांदीच्या चारही बाजूस रा खावेत. उर्वरित फुटव्यांची विरळणी करावी. अशी विरघळणीआणि 20 ते 25 दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळा करावे. त्यानंतर खोडावर खालील बाजूस सही फुटवे येऊ लागतात. या फुटव्यांची देखील आवश्यकता प्रमाणे विरळणी करून दर अर्ध्या ते एक फुटावर फांदीच्या चारही बाजूस एक- एक जोमदार फुटवा राहील. याची दक्षता घ्यावी. अशा पद्धतीने विरळणी केल्यावर संपूर्ण खोडावर नवीन फांद्या विकसित होतात.
- विरघळणी केल्यानंतर राखलेले फुटवे बळकट करण्यासाठी फुटव्यावर दोनदा नवीन फूट आल्यावर दुसऱ्या नवीन फुटी चा डोळा खुडावा. त्यामुळे ही फूट सशक्त व जाड होण्यास मदत होते. तसेच खुंटलेल्या डोळ्यापासून दोन ते तीन नवीन फांद्या फुटतात. अशा रीतीने झाडाचा विस्तार वाढण्यास मदत होते. अशाप्रकारे तिसऱ्या वर्षापासून चांगल्या प्रतीची फळे मिळण्यास सुरुवात होऊन उत्पादनातही वाढ होत जाते.
- जुन्या पेरू बागांची उत्पादकता घटण्याची कारणे :-
- जुन्या बागांमध्ये झाडांचा घेर मोठा झाल्याने सूर्यप्रकाश आत्तापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. परीणामी प्रकाश संश्लेषणातअडथळा निर्माण होतो.
- नवीन पालवी फारच कमी येते. बागांमधील झाडे फार दाटीने वाढलेली असल्याने फळे काढणे व तत्सम कामे करणे जिकरीचे होते.
- झाडांच्या फांद्या एकमेकात घुसतात;घासतात. परिणामी किडींचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन उत्पादनात घट होते. जुन्या बागांमध्ये कीडनाशके व संजीवके यांची फवारणी करणे ही कठीण जाते. परिणामी रोग व किडींचे नियंत्रण योग्य प्रकारे न झाल्याने फळे गळतात.
- छाटणी नंतर घ्यावयाची काळजी :-
- कापलेल्या फांद्या ताबडतोब गोळा करून बागेबाहेर काढून बाग स्वच्छ करावी. छाटणी केलेल्या फांद्यांना बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये
म्हणून कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट(10 टक्के) लावावी .
- छाटणी केल्यानंतर पालवी लवकर पक्व होण्यासाठी झाडावर दोन टक्के नत्रयुक्त खताची फवारणी करावी. पाणी व्यवस्थापन यावर विशेष लक्ष द्यावे.
- 2 ते 3 महिन्यानंतर नवीन पालवीतील जोमदार फांद्या ठेवून साधारणपणे 50 टक्के पालवीची विरळणी करावी.
Published on: 15 February 2022, 05:13 IST