Horticulture

शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान आल्यामुळे पीक उत्पादनात वाढ आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील चांगली वाढ झालेली आहे.

Updated on 30 May, 2022 3:54 PM IST

शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान आल्यामुळे पीक उत्पादनात वाढ आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील चांगली वाढ झालेली आहे.

विविध प्रकारचे तंत्रज्ञान शेती येऊ घातल्याने शेतकऱ्यांना शेतीचे कामे बऱ्याच अंशी सोपी आणि फायदेशीर ठरली आहेत. तंत्रज्ञानाच्या वापराने शेती करणे तर सोपे झालीच परंतु कमी कष्ट मध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध पिकांचे उत्पादन घेणे देखील शक्य झाले.

आता आपल्याला माहित आहेस की शेतीमध्ये पॉलिहाऊस तंत्रज्ञान खूप उपयोगी ठरत आहे. पॉलीहाऊस मध्ये घेतलेले पिकांची उत्पादनक्षमता ही नक्कीच  जास्त असते. असाच एक पॉलिहाऊस मधील एक प्रगत तंत्रज्ञान लुधियाना येथील केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील कृषी यंत्रे उत्कृष्टता केंद्राचे संचालक प्रो. डॉ. हरीश हिराणी यांनी पॉलिहाऊस साठी एक नाविन्यपूर्ण रिट्रेक्टबल छत विकसित केले आहे.

हे छत हवामानाची स्थिती आणि पिकांची गरज यानुसार ऑटोमॅटिक कार्यरत असते. हवामानाची स्थिती आणि पिकाला काय लागणार याची गरज त्याला पीएलसी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध केली जाईल. असे हे शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक असून त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 काय आहे नेमके हे तंत्रज्ञान

 हे तंत्रज्ञान सध्याच्या पॉलिहाऊस स्ट्रक्चर मधील सुधारणा असून यामध्ये नैसर्गिक वातावरण आणि पारंपारिक हरित घरातील उपयुक्त घटकांचे समावेश केला आहे.

या पॉलिहाऊस वरील छत हे आपल्या गरजेनुसार अंशतः किंवा पूर्णतः उघडता किंवा बंद करता येते. त्यामुळे हरितगृहाच्या आत मध्ये ताजी हवा किंवा अधिक सूर्यप्रकाश हवा असल्यास छत पूर्णपणे उघडले जाते.

हवामानातील बदलांमुळे होणारे पिकांचे उत्पादन आणि दर्जा वरील परिणाम यामध्ये कमी होतो. यात प्रामुख्याने काकडी, टोमॅटो, कोबी, मिरची, ढोबळी मिरची, कारले, फुलकोबी, पालकांनी कोथिंबीर सारख्या पिकांवर प्रयोग करण्यात येत आहेत. परंतु यामध्ये सर्व प्रकारची पिके घेणे शक्‍य आहे.

यामध्ये बाजूच्या झडपांच्या साह्यानेआतील आद्रतेचे प्रमाण योग्य ठेवता येते. योग्य प्रकाश आणि आद्रता यांच्यातील बदलाच्या माध्यमातून पिकांची वाढ योग्यरीत्या करून घेता येते.

 या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना होतो हा फायदा

 

1-पिकांचे हंगामी आणि बिगर हंगामी असे वर्षभर उत्पादन घेता येते.

2- पिकांचे जास्त उत्पादन मिळते.कीड व रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो त्यामुळे कीटकनाशकांवरील खर्चामध्ये बचत होते.

3- अंतर्गत सूक्ष्म हवामान पिकांच्या वाढीसाठी अधिक उत्तम बनवले असते. त्यामुळे दर्जेदार उत्पादनात वाढ होते.

4- हवामान नियंत्रणासह अनेक बाबी या स्वयंचलितपणे करणे शक्य असल्याने मजुरांची आवश्यकता कमी होते.

5-पिकांच्या व्यवस्थापनावरील अनेक प्रकारचे खर्च वाचतो.

6-रोपवाटिकेसाठी खूपच उत्तम आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:या' जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींमध्ये बसणार पिझोमीटर, गावाची भूजल पातळीची नोंद समजेल अवघ्या 12 तासाला

नक्की वाचा:Humni Control: 'या'साखर कारखान्याचा हुमणी नियंत्रणासाठी विशेष मास्टर प्लान, शेतकऱ्यांना प्रतिकिलो भुंगेरेमागे मिळतील 350 रुपये

नक्की वाचा:ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना एफआरपी पोटी मिळेल 42 हजार कोटींच्या आसपास रक्कम

English Summary: refrectabe roof polyhouse is benificial for farmer for more production
Published on: 30 May 2022, 03:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)