नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं आहे आपल्या शेतामध्ये कीटक व बुरशी यांचा प्रामुख्याने आपलं पीक वाचवण्यासाठी आपले प्रयत्न कमी पडतात.
कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी कोणत्या कीटकनाशका सोबत कोणत्या संजिवकांची फवारणी करावी आपण या गोष्टींत तंत्र समजून घेणे आवश्यक आहे.आपल्या पिकांवरील कीड रोगांचे सर्वेक्षण करून त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी आमचं के व्ही के घातखेड प्रतिबद्ध आहे तेथील कृषी विस्तार व पीक संरक्षण विभागाचे श्री संजय पाचकवडे सर यांच्या कडून शेतकर्यांना आपलं पिकं कीडी पासून कसे वाचवले पाहिजे या गोष्टी वर सल्ला देतात. योग्यवेळी व योग्य प्रमाणात वापर केला तर कसा फायदा होतो व पिकाचं रक्षण करण्यासंबंधी शेतक-यानां किटकनाशक व कीडनाशकांचा अमर्याद आणि गैरवापर होऊ नये या उद्देशाने ते समजून सांगतात.
नक्की वाचा:राज्यातील शिल्लक उसाला मिळणार अनुदान
पिकावर होणारे दुष्परिणाम पीक उत्पादन, पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर दिसून येऊ लागले. त्याचप्रमाणे किंडींमध्ये कीटकनाशकांसाठी प्रतिकारशक्ती निर्माण होऊन अपेक्षित नियंत्रण मिळणे अशक्य झाले. सरसकट सर्व किटकांना मारणा-या किडनाशकांच्या वापरामुळे किडींच्या नैसर्गिक शत्रू म्हणून आपले मित्र किटक यांचा देखील हास झाला आणि किडींच्या वाढीसाठी अनुकूल असे वातावरण तयार झाले. नवनवीन किडींचा प्रादुर्भाव पिकांवर दिसून येऊ लागला.
हे शेतकरी यांना नेहमी समजावून सांगतात.कधितर आपण केलेल्या त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्या उपायांना किट दाद देत नाहीत आणि येणारे किड हे वरचढ झालेल्या दिसून येतात. त्यांचापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी आपन नियंत्रणाच्या उपलब्ध पद्धतींचा एकत्रितपणे वापर करणे म्हणजेच एकात्मिक किट नियंत्रणाशिवाय पर्याय नाहीं.
असे ते मार्गदर्शना ते सतत सांगत असतात. त्यांनी एक मुद्दा महत्त्वाचा समजून सांगितला तो म्हणजे शेतकरी पिकांची फेरपालट बरेच किडी,किटक व बुरशी रोग हे एकाच पिकापुरतेच म्हणजे हंगामापुरते मर्यादित असतात आपन त्याच पिकाची लागवड सतत केली,
तर तिथे रोग आणि किडींचे प्रमाण वाढते म्हणून पिकांचा फेरपालट करून रोग आणि कीड यांचे नियंत्रण करता येते हे या तंत्राची सर्वांना माहीती दीली......
धन्यवाद मित्रांनो
*आपला मित्र मिलिंद जि गोदे*
*Mission agriculture soil information*
Published on: 10 April 2022, 11:38 IST