Horticulture

वातावरणामध्ये झालेला जो बदल असतो त्याचा परिणाम फक्त हंगामातील पिकांवरच होत नाही तर फळबाग पिकांवर सुद्धा होतो. यंदाच्या जोरदार पाऊसामुळे शेतकऱ्यांसह फळबागायतदारांवर सुद्धा नामुष्की आलेली आहे. बागेतील झाडांना सापळा लावला असेल त्यांची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल नाहीतर त्यावरती किडींचा प्रादुर्भाव होईल असे कृषी तज्ञांनी सांगितले आहे. जोरदार पाऊस पडल्याने फळबागेत पाणी साचले आणि यामुळे धोका निर्माण झाला असे केंद्रीय कृषी विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले आहे.

Updated on 23 November, 2021 4:49 PM IST

वातावरणामध्ये झालेला जो बदल असतो त्याचा परिणाम फक्त हंगामातील पिकांवरच होत नाही तर फळबाग पिकांवर सुद्धा होतो. यंदाच्या जोरदार पाऊसामुळे शेतकऱ्यांसह (farmer) फळबागायतदारांवर सुद्धा नामुष्की आलेली आहे. बागेतील झाडांना सापळा लावला असेल त्यांची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल नाहीतर त्यावरती किडींचा प्रादुर्भाव होईल असे कृषी तज्ञांनी सांगितले आहे. जोरदार पाऊस पडल्याने फळबागेत पाणी साचले आणि यामुळे धोका निर्माण झाला असे केंद्रीय कृषी विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले आहे.

फळांच्या पानांमध्ये मोठा प्रादुर्भाव:

शेतातील फळबागांमध्ये योग्य ती आद्रता व हालचाल नसल्याने कोळी व कीटक बागेतील झाडांचा नाश करत आहेत. यामुळे झाडे कोरडी पडण्यास सुरू होते आणि फळ सुद्धा लागत नाही. मागील दोन वर्षांपासून वातावरणामध्ये जी वाढलेली आद्रता आहे त्यामुळे पानवेबर हा एक प्रमुख कीटक निर्माण झाला.या नवीन किटकामुळे बागेतील आंबा, पेरू आणि लीची या फळांच्या पानांमध्ये मोठा प्रादुर्भाव दिसून आला. आता पर्यंत याचा एवढा तरी परिणाम दिसला नव्हता पण बदलत्या वातावरणामुळे जास्त परिणाम दिसून येत आहे.

आगामी महिन्यात अधिकचा धोका:-

डॉ. एस. के. सिंग यांनी असे सांगितले आहे की हा जो नवीन कीटक उदयास आलेला आहे तो जुलै पासून ते डिसेंम्बर महिन्यापर्यंत नुकसान करत असतो. पानवेबर हा कीटक  झाडांच्या पानांवर अंडी घालतो त्यामुळे एका आठवड्यात पाने नष्ट होतात.इतर ज्या आळ्या आहेत त्यांच्या प्रादुर्भावाने पाने तरी गळतात मात्र या अळीने पाने नष्ट होतात. तुम्ही जर योग्य प्रकारे व्यवस्था नाही केली तर त्यामध्ये हा कीटक जास्त प्रमाणात आढळून येतो. व्यवस्थापण नाही केले तर घट तर होतेच मात्र फळकाढणी सुद्धा होत नाही.

असे करा फळबागांचे व्यवस्थापन:-

तुम्ही कोणत्याही उपकरणाचा वापर करून झाडाची झालं कापून ती जाळली पाहिजे त्यामुळे त्या कीटकांची तीव्रता कमी होते आणि हे काम  काही  दिवसांचे  अंतर  राखून  कायम  केले पाहिजे.तुम्हाला लम्बाडायशोथ्रिन 5 ईसी 2 मिली हे १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागेल जे की पहिली फवारणी झाली की १५ - २० दिवसांनी दुसरी फवारणी करावी लागेल. तुमच्या बागेचे व्यवस्थापन योग्य असेल तर बी. टोरुंगीन्सिसची ची फवारणी करा ते योग्य ठरेल. जर तुमच्या बागेवर जास्त किडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर तुम्ही कृषी विभागाशी लगेच संपर्क साधा.

English Summary: Rainwater harvesting in the orchards can be dangerous. Take care of the mango orchard in this way
Published on: 23 November 2021, 04:49 IST