मोसंबी (sweet orange)फळ जे की खाण्यास अगदी स्वादिष्ट आणि शरीरासाठी सुद्धा चांगले. आपल्या शरीरात जर पाण्याची कमतरता असेल तर मोसंबी खाल्याने आपल्याला त्यातून पोषक घटक तर भेटतातच त्याशिवाय पाण्याची कमतरता सुद्धा भरून काढते. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये मोसंबी या फळ पिकाला विविध प्रकारच्या किडींचा तसेच रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो जसे की सिल्ला, मावा , पाने खाणारी अळी , पिठ्या ढेकूण ,खवले कीड , पायकुज आणि डिंक्या ,शेंडे मर इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
तसेच मोसंबी तील फळगळ सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे चित्र आहे. फळगळ जर होत असेल तर त्यावर एक उपाय आणि योजना जी लक्षात घेता तुम्ही आंतर मशागतीची कामे वेळेवर करा आणि तण नियंत्रण करावे तसेच किडींचा प्रादुर्भाव बघता तुम्ही सापळे लावले पाहिजेत आणि अन्न तसेच नत्र या घटकांची कमतरता लक्षात घेऊन ती पूर्ण केली पाहिजे.
एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन:-
मोसंबी फळ पिकावर जर मावा कीड पडली असेल तर त्या किडीच्या नियंत्रणासाठी तुम्ही २० मिली डायमिथोएट घेऊन ते १० लिटर पाण्यात मिसळावे आणि त्या मिश्रणाची फवारणी करावी त्यामुळे मावा कीड नियंत्रणात येईल तसेच पाने खाणाऱ्या अळ्या चे नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही २० मिली क्विनॉलफॉस १० लिटर पाण्यात मिसळावे आणि ते मिश्रण करून फवारणी करा त्यामुळे पाने खाणारी अळी नियंत्रणात येईल.
हेही वाचा:अशी करावी नवीन द्राक्ष बागेतील रिकटची पूर्वतयारी व व्यवस्थापन
पिठ्या तसेच ढेकूण या किडीला जर तुम्हाला नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही २५ मिली क्लोरोपायरीफॉस किंवा २० मिली डायमेथोएट १० लीटर पाण्यात मिसळावे आणि त्या मिश्रणाची फवारणी करावी त्यामुळे ढेकूण व पिठ्या कीड नियंत्रणात येईल.खवले कीड जर नियंत्रणात आणायची असेल तर तुम्ही २५ मिली क्लोरोपायरीफॉस + ५० मिली दूध किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी 40 ग्राम घेऊन ते १० लिटर पाण्यामध्ये मिसळावे आणि त्या मिश्रणाची फवारणी करावी त्यामुळे खवले कीड नियंत्रणात येईल.
मोसंबी वर पडणारी शेंडे मर रोखायची असेल तर तुम्ही पावसाळा आधी किंवा पावसाळा नंतर रोगग्रस्त फांद्या छाटव्या आणि त्याच्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी. मॅन्कोझेब 20 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम तुम्ही १० लिटर पाण्यात मिसळावे आणि वर्षातून तीन ते चार वेळा त्याची फवारणी करावी.
Published on: 17 August 2021, 06:46 IST